Global Celebrations Honour Dada J.P. Vaswani’s Legacy of Forgiveness and Peace
Pune : On August 2, the 108th Birth Anniversary of Dada J.P. Vaswani was observed worldwide as Global Forgiveness Day. Through week-long
Read MorePune : On August 2, the 108th Birth Anniversary of Dada J.P. Vaswani was observed worldwide as Global Forgiveness Day. Through week-long
Read MorePune : Hungama OTT recently premiered its latest original series, Service Girl, a gripping crime thriller that explores the devastating consequences of
Read MorePune : With Friendship Day set to be celebrated on August 2, Airtel has introduced a new way for customers
Read MorePune – Cognizant (NASDAQ: CTSH), a leading AI Builder and technology services provider, announced that it hosted its first-ever global
Read Moreपुणे : अवघ्या सहा महिन्यांत ४११ फाउंडर्स क्लब हा पुण्यातील वेगाने वाढणाऱ्या उद्योजक समुदायांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. आतापर्यंत
Read Moreफ्रेंडशिप डे निमित्त आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीच्या नात्याचा गौरव करण्यासाठी डी बिअर्स इंडियाने ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ या खास मोहिमेची घोषणा केली
Read Moreपुणे : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, प्रशासकीय कारकिर्दीतील धाडसी निर्णयांचा आणि जनहितासाठी केलेल्या कामांचा
Read Moreगुरुग्राम : दिल्ली-टोरंटो मार्गावर एअर इंडियाने आपले अगदी नवीन B787-9 विमान आज सेवेत रुजू केले. यामुळे एअरलाइनची अद्ययावत केबिन सुविधा आणि प्रवासादरम्यानचा उत्कृष्ट अनुभव पहिल्यांदाच कॅनडापर्यंत पोहोचणार असून, प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आधारित, एअर इंडियाने 2026-27 च्या हिवाळी हंगामासाठी कॅनडातील आपल्या सेवांचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: मुंबई आणि टोरंटो दरम्यान नवीन थेट (नॉन-स्टॉप) सेवा भारत आणि कॅनडा दरम्यानच्या एकूण प्रवासी क्षमतेत दरमहा 4,400 जागांची (सीट्सची) वाढ टोरंटोसाठीच्या प्रीमियम श्रेणीतील जागांच्या क्षमतेत 71% वाढ नवीन, हंगामी मुंबई–टोरोंटो सेवा, सुधारित अंतर्गत सजावटीसह 25 ऑक्टोबर 2026 ते 26 मार्च 2027 दरम्यान एअर इंडिया मुंबई आणि टोरोंटो दरम्यान आठवड्यातून तीन वेळा थेट विमानसेवा सुरू करणार आहे. यामुळे भारत आणि कॅनडासाठी दर आठवड्याला जवळपास 2,000 जागांची भर पडेल. तसेच या दोन शहरांदरम्यान थेट विमानसेवा चालवणारी ही एकमेव विमान कंपनी ठरेल. एअर इंडियाच्या बोईंग 777-300ईआर विमानाद्वारे ही सेवा चालवली जाईल, ज्याच्या केबिनच्या अंतर्गत सजावटीत लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रायव्हसी स्लाइडिंग डोअर्ससह 8 आलिशान फर्स्ट क्लास स्वीट्स, बिझनेस क्लासमध्ये 40 फ्लॅट बेड्स आणि इकॉनॉमीमध्ये 280 जागांचा समावेश आहे. मुंबई आणि टोरोंटो दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुधारित B777-300ER विमानात वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीचाही लाभ मिळेल. एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली येथील प्रमुख केंद्रांच्या माध्यमातून, कॅनडाला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद, कोची, लुधियाना आणि वडोदरा यांसारख्या अनेक भारतीय शहरांशी सहजपणे जोडले जाणे शक्य होते. जानेवारी 2027 पासून टोरोंटोसाठी 100% नवीन किंवा सुधारित उत्पादनांचा वापर या हिवाळ्यात एअर इंडियाच्या दिल्ली-टोरोंटो मार्गावरील 10 साप्ताहिक उड्डाणांपैकी, 7 साप्ताहिक सेवा नवीन बोईंग 787-9 विमानांद्वारे चालवल्या जातील, ज्यात एअरलाइनची नवीन केबिन प्रॉडक्ट्स असतील. उर्वरित 3 साप्ताहिक सेवा सुरुवातीला बोईंग 777-300ईआर विमानांद्वारे चालवल्या जातील आणि ताफ्यात अधिक विमाने आल्यावर जानेवारी 2027 पासून त्या नवीन बोईंग 787-9 विमानांमध्ये रूपांतरित होतील. त्यामुळे, टोरोंटोला येणाऱ्या आणि जाणाऱ्या एअर इंडियाच्या सर्व उड्डाणांमध्ये पूर्णपणे नवीन किंवा लक्षणीयरित्या सुधारित केबिन इंटिरियर्स असतील, ज्यामुळे प्रवाशांना एकसारखा प्रीमियम अनुभव मिळेल. दिल्ली आणि मुंबईहून टोरोंटोसाठी नवीन तसेच अद्ययावत विमाने तैनात केल्यामुळे, एअर इंडियाला या हिवाळ्यात टोरोंटो मार्गावरील प्रीमियम श्रेणीतील जागांची क्षमता 71 टक्क्यांनी वाढवणे शक्य झाले आहे; परिणामी प्रवाशांना फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास आणि प्रीमियम इकॉनॉमीचे अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. एअर इंडियाचे मुख्य कमर्शिअल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले: “कॅनडा ही एअर इंडियाच्या सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपैकी एक आहे. येथील लोकांचे एकमेकांशी असलेले घनिष्ठ संबंध प्रवासाची मोठी मागणी निर्माण करतात, विशेषतः सणांचे दिवस आणि सुट्ट्यांच्या काळात. या हिवाळ्यात सुरू होणारी आमची हंगामी मुंबई-टोरंटो सेवा प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोय उपलब्ध करून देईल; हा असा काळ आहे जेव्हा अनेक लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्र-परिवाराला भेटण्यासाठी प्रवास करत असतात. त्याच वेळी, उत्तर अमेरिकेच्या मार्गावर आम्ही आमची अत्याधुनिक विमाने आणि विमानातील अद्ययावत सुविधा टप्प्याटप्प्याने सादर करत आहोत. जगातील सर्वात स्पर्धात्मक अशा लाँग-हॉल अर्थात दीर्घ पल्ल्याच्या बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेत सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा संकल्प यातून सिद्ध होतो. एकत्रितपणे, हे उपक्रम एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा कंपनी बनवण्यासोबतच भारताला जगाशी जोडणारे पसंतीचे माध्यम म्हणून प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.” टोरोंटोला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमानांचे वेळापत्रक: उड्डाण #
Read More