Wednesday, October 7, 2026
Latest NewsPUNE

तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय प्रवासाचा उलगडा होणार; ८ ऑगस्ट रोजी पुण्यात प्रकट मुलाखत

पुणे  : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, प्रशासकीय कारकिर्दीतील धाडसी निर्णयांचा आणि जनहितासाठी केलेल्या कामांचा उलगडा करणारी विशेष प्रकट मुलाखत शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. “भविष्यवेध – संवाद भविष्याचा” या उपक्रमांतर्गत “अनस्टॉपेबल तुकाराम” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या मुलाखतीत तुकाराम मुंढे आपल्या बालपणापासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) केलेल्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधणार आहेत. विविध पदांवर कार्यरत असताना घेतलेले कठोर निर्णय, आलेली आव्हाने, प्रशासनातील अनुभव, पारदर्शक कारभाराची भूमिका तसेच समाजहितासाठी केलेल्या उपक्रमांबाबत ते उपस्थितांशी संवाद साधतील. ही विशेष मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप घेणार असून, त्यांच्या प्रश्नांमधून तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणार आहेत.

पुणे लोकल कनेक्ट आणि माय जनसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून होणारी गर्दी लक्षात घेता, पूर्वनोंदणी करण्यासाठी. https://myjansevak.com/event/unstoppable-tukaram या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन आयोजक अमित रुके आणि विरेश आंधळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading