Wednesday, October 7, 2026
BusinessLatest NewsPUNE

पुण्यात प्रथमच ‘ट्रायोरा’चा अनोखा संगम; तीन दिग्गज ब्रँड्सची भव्य फॅशन पर्वणी

पुणे : पुण्याच्या फॅशन, विवाह आणि उत्सवी विश्वात प्रथमच तीन प्रतिष्ठित ब्रँड्स एका व्यासपीठावर येत असून, ‘ट्रायोरा – व्हेन थ्री लेगसीज मीट’ या दोन दिवसीय भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राया एथनिक, पल्लोड आणि राठोड ज्वेलर्स हे तीन नामांकित ब्रँड्स प्रथमच एकत्र येत असून, ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी शेरेटन ग्रँड, पुणे येथे हा विशेष सोहळा रंगणार आहे.

पुण्यातील सण-समारंभ आणि विवाहसोहळ्यांच्या फॅशनमध्ये आपापल्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या या तिन्ही ब्रँड्सच्या कलाकुसरीचा आणि परंपरेचा अनोखा संगम ‘ट्रायोरा’मध्ये पाहायला मिळणार आहे. राया एथनिकतर्फे आकर्षक फेस्टिव्ह आणि वेडिंग मेन्सवेअर, पल्लोडतर्फे ब्रायडल आणि फेस्टिव्ह वुमन्सवेअर, तर राठोड ज्वेलर्सतर्फे काळाच्या कसोटीवर उतरलेले दागिन्यांचे कलेक्शन सादर केले जाणार आहे.

या दोन दिवसांत विविध आकर्षक रॅम्प वॉकच्या माध्यमातून यंदाच्या फेस्टिव्ह आणि ब्रायडल कलेक्शनचे सादरीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर फॅशन आणि स्टायलिंग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वन-ऑन-वन स्टायलिंग सेशन्सचे आयोजन करण्यात आले असून, लग्नसमारंभापासून विविध उत्सवी प्रसंगांसाठी योग्य पेहराव आणि दागिन्यांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.

‘ट्रायोरा’चे वैशिष्ट्य केवळ खरेदीपुरते मर्यादित नसून, अभ्यागतांना फॅशन, कारागिरी आणि वारशाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे हे एक इमर्सिव्ह सेलिब्रेशन असणार आहे. पोशाखातील पहिल्या धाग्यापासून ते दागिन्यांच्या अंतिम कलाकुसरीपर्यंत प्रत्येक बारकावा अनुभवता यावा, यासाठी विशेष स्वरूपाची मांडणी करण्यात आली आहे.

पुण्यातील आगामी लग्नसराई आणि उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रायोरा’ हा फॅशनप्रेमी, नववधू-वर आणि कुटुंबांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. तीन पिढ्यांपासून विश्वास संपादन केलेल्या या तीन ब्रँड्सचा एकाच छताखाली प्रथमच होणारा संगम ही पुण्याच्या फॅशनविश्वातील उल्लेखनीय घटना ठरणार आहे.

हा सोहळा सर्वांसाठी खुला असून, फॅशन, परंपरा, दागिन्यांची कलाकुसर आणि उत्सवी जल्लोषाचा अनोखा अनुभव पुणेकरांना या निमित्ताने घेता येणार आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading