मिशलिन इंडियाच्या पुणे शहरातील विस्ताराला वेग; नवीन मिशलिन टायर्स अँड सर्व्हिसेस स्टोअर सुरू
पुणे : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय टायर तंत्रज्ञान कंपनी मिशलिनने पुणे येथील विमाननगर येथे ‘मिशलिन टायर्स अँड सर्व्हिसेस‘ स्टोअर चे उद्घाटन मिशलिन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शांतनू देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मिशलिनने टायर ट्रॅक्सच्या भागीदारीतून हे नवे स्टोअर सुरू केले आहे. पुणे ही देशातील मिशलिनच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. या नवीन स्टोअरमुळे कंपनीचा एका महत्त्वाच्या बाजारपेठेतील विस्तार वाढला आहे. यामुळे ग्राहकांना टायर्ससंबंधित सर्व उत्पादने सहज उपलब्ध होणार आहेत.
टायर ट्रॅक्स ही पुणे येथील नामांकित टायर आणि वाहन सेवा कंपनी आहे. २००४ साली टायर ट्रॅक्सची स्थापना झाली. कंपनीने स्थापना काळापासूनच ग्राहकांना दर्जेदार व उत्तम सेवा दिल्या आहेत. विमाननगर येथील नवीन स्टोअर तब्बल ३,५०० चौरस फूट विस्तीर्ण जागेत उभारण्यात आले आहे. स्टोअरला भेट देणाऱ्या ग्राहकांना उत्तम आणि समाधानकारक सेवा देणे, हेच मिशलिनचे मुख्य ध्येय आहे. या स्टोअरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली अनेक सेवा मिळतील.
मिशलिन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शांतनू देशपांडे म्हणाले, “पुणे शहर मिशलिनसाठी महत्त्वाची वाहन बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. आमचे तंत्रज्ञान आणि नव्या घडामोडींचे प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्रही याच शहरात आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे नेतृत्वही पुणे येथून चालते. टायर ट्रॅक्सच्या भागीदारीतून हे नवीन मिशलिन टायर्स अँड सर्व्हिसेस स्टोअर सुरू करणे, हे पुणे येथील आमचे स्थान मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. यामुळे आमचे अत्याधुनिक टायर तंत्रज्ञान, दर्जेदार उत्पादने आणि खास ग्राहक सेवा ग्राहकांच्या जवळ उपलब्ध होतील. भारत ही मिशलिनसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे देशभरात आमच्या दालनांचा विस्तार करणे आणि ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे, यावर आमचा नेहमीच भर राहणार आहे.“
विमाननगर येथील नव्या स्टोअरच्या निमित्ताने मिशलिनने देशभरात आपला विस्तार सुरू ठेवला आहे. हा विस्तार कंपनीच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग आहे. कंपनी देशभरातील विविध भागांत आपले स्टोअर्स उभारत आहे. तसेच, नामांकित विक्रेत्यांसोबत भागीदारी करून आपल्या ग्राहकांच्या नजीक सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या माध्यमातून कंपनीचे उत्तम दर्जाचे टायर्स आणि तज्ज्ञांकडून मिळणाऱ्या टायर देखभाल सेवा ग्राहकांसाठी सहज उपलब्ध होत आहेत.
पुणे येथे वाहन उद्योगासाठी भक्कम व्यवस्था उपलब्ध आहे. वाहनांची वाढती मागणी तसेच प्रवासाच्या गरजा लक्षात घेता पुणे हे मिशलिनसाठी नेहमीच महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे. हे शहर एक प्रमुख वाहन आणि औद्योगिक केंद्र म्हणूनही सर्वपरिचित आहे. तसेच, मिशलिनच्या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनाच्या कामातही या शहराचे महत्त्वाचे स्थान आहे. या सर्व कारणांमुळे पुणे ही मिशलिन कंपनीकरिता महत्त्वाची आणि धोरणात्मक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे.
