Tuesday, October 6, 2026
BusinessLatest News

नैसर्गिक हिऱ्यांइतक्याच दुर्मीळ असतात काही मैत्री : डी बिअर्स ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ मोहिमेद्वारे साजरा करत आहे फ्रेंडशिप डे

 फ्रेंडशिप डे निमित्त आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीच्या नात्याचा गौरव करण्यासाठी डी बिअर्स इंडियाने ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ या खास मोहिमेची घोषणा केली आहे. मैत्रीसाठी खास तयार करण्यात आलेल्या या नैसर्गिक हिऱ्यांच्या परंपरेचा (रिच्युअल) अनुभव घेण्यासाठी 1 ते 2 ऑगस्ट दरम्यान नऊ शहरांतील जिवलग मित्र मैत्रिणींना आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, पुणे, कानपूर, कोची, कोईमतूर आणि नागपूर येथील फॉरेव्हरमार्क डायमंड ज्वेलरी स्टोअर्ससह 60 रिटेल भागीदार स्टोअर्समध्ये भेट देऊन ते हा संग्रह पाहू शकतात आणि खास नियोजन करण्यात आलेल्या इन-स्टोअर अनुभवाचा भाग बनू शकतात.

या उपक्रमाच्या केंद्रस्थानी ‘बेस्टी ब्रेसलेट कलेक्शन’ आहे. यात नैसर्गिक हिऱ्यांच्या चार खास डिझाइन्सचा समावेश असून, त्या विशेषतः जोडीने परिधान करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. या नाविन्यपूर्ण डिझाइन्स सामायिक आठवणी आणि मैत्रीचे परिधान करता येण्याजोगे प्रतीक आहेत. यामध्ये बॅगेट आणि गोलाकार हिऱ्यांचा वापर करून मॉर्स कोडमध्ये “BFF” दर्शविणारी सिग्नेचर डिझाइन, तसेच एकमेकांत गुंफलेले आणि वेगवेगळे वर्तुळाकार डिझाइन्स आहेत. ते एकत्र आल्यावरच संपूर्ण आकृती तयार करतात. काही मैत्री इतकी नैसर्गिक आणि अस्सल असते की तिचे खरे सार केवळ दुर्मीळ आणि अस्सल नैसर्गिक हिराच व्यक्त करू शकतो हा या संग्रहामागील मुख्य विचार आहे.

स्टोअरमध्ये येणाऱ्या प्रत्येक जिवलग मित्र मैत्रिणींच्या जोडीसाठी हा अनुभव विनामूल्य उपलब्ध असून, तो तीन आनंददायी टप्प्यांत साकारला जातो. ‘बॉण्ड टुगेदर’ या पहिल्या टप्प्यात मित्र-मैत्रिणींना एक्स्प्रेस नेल-आर्टचा आनंद घेत एकत्र निवांत वेळ घालवता येईल. त्यानंतर ‘क्रिएट टुगेदर’ या टप्प्यात दोघेही एकमेकांसाठी बॅग चार्म तयार करतील, जे या सुंदर क्षणाची वैयक्तिक आठवण जपून ठेवेल. या अनुभवाचा समारोप ‘कॅप्चर फॉरेव्हर’ या टप्प्याने होईल. यात विविध प्रॉप्ससह मजेशीर फोटोशूट केले जाईल आणि त्यानंतर ‘बेस्टी कॉन्ट्रॅक्ट’वर स्वाक्षरी करून त्यांची कायमची जिवलग मैत्री अधिकृतपणे साजरी केली जाईल. प्रत्येक जोडी आपल्या चिरंतन मैत्रीची एक सुंदर आणि जपून ठेवण्याजोगी आठवण सोबत घेऊन जाईल.

डी बिअर्स इंडियाचे कॅटेगरी मार्केटिंगचे कंट्री हेड तोरांज मेहता म्हणाले, “खरी मैत्री ही निर्माण करता येत नाही, ती नैसर्गिकरित्या फुलत जाते. ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ या मोहिमेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. याचे कारण या मोहिमेने त्यांच्या आयुष्यभराच्या मैत्रीसारख्या नात्याचा सन्मान करण्यासाठी एक अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून दिली. यासाठी स्वतंत्र असा खास दिवस क्वचितच असतो. दुसऱ्या वर्षात डी बिअर्स या भावनेला एका अर्थपूर्ण परंपरेचे रूप देत आहे.  ग्राहक दरवर्षी फ्रेंडशिप डे निमित्त या परंपरेची आतुरतेने वाट पाहू शकतील. ब्रेसलेट्सच्या बारकाईने तयार केलेल्या डिझाइन्सपासून ते रिटेल स्टोअर्समधील खास अनुभवांपर्यंत प्रत्येक गोष्ट नैसर्गिक हिऱ्याप्रमाणेच चिरंतन आणि अस्सल अशा नात्याचा सन्मान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.”

 

जिवलग मित्र मैत्रिणींना त्यांच्या जवळच्या स्टोअरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमासाठी पुढील लिंकद्वारे नोंदणी करता येईल:

https://withlovefrombestie.netlify.app/

अधिक माहितीसाठी आणि स्टोअर्सच्या तपशीलासाठी भेट द्या:

www.adiamondisforever.com

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading