Tuesday, October 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे पदवीधर मतदारसंघातून मिलिंद संपगावकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल 

 

पदवीधर तरुणांना न्याय मिळवून देणार –  मिलिंद संपगावकर

पुणे दि. 6 (प्रतिनिधी)  : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मिलिंद भरत संपगावकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला , यावेळी शेकडोच्या संख्येने त्यांचे सहकारी आणि हितचिंतक उपस्थित होते. पुणे पदवीधर मतदार संघातील पाच जिल्ह्यांमध्ये 88 हजारांहून अधिक पदवीधर मतदारांचा मला पाठिंबा आहे, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास संपगावकर यांनी यावेळी व्यक्त केला. निवडून आल्यानंतर केवळ अधिवेशनापुरते किंवा निवडणुकीपुरते मर्यादित न राहता, दर तीन महिन्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पदवीधर मेळावा घेऊन मतदारांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणार असल्याचे संपगावकर यांनी जाहीर केले.

बेरोजगारी, परीक्षेतील अनियमितता, IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थिती, रोजगार हक्क आणि कंपन्यांकडून होणाऱ्या संभाव्य अन्याय आधी विविध समस्यांनी सध्याचा पदवीधर तरुण ग्रस्त आहे. या समस्या सोडवण्यासाठी सुशिक्षित उमेदवाराची गरज आहे ते ओळखूनच मी पदवीधर मतदार संघाचा अर्ज दाखल केला असून पदवीधरांचा आवाज विधान परिषदेमध्ये बुलंद करून न्याय मिळवून देणार अशी ग्वाही मिलिंद संपगावकर यांनी दिली.

विकसित पश्चिम महाराष्ट्राच्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून शिक्षण, उद्योग, शेती, माहिती तंत्रज्ञान, सहकार, पर्यटन, कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये व्यापक काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त करून संपगावकर यांनी यावेळी पुणे पदवीधरांसाठी वचननामा जाहीर केला
प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक गोडाऊन, शीतगृह शेतमालासाठी गोडाऊन, शीतगृह आणि प्रक्रिया उद्योग
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिकवलेल्या मालाची योग्य साठवणूक करता न आल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक गोडाऊन, शीतगृह आणि कृषी साठवणूक व्यवस्था उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे संपगावकर यांनी सांगितले.
# पुण्याबाहेर आयटी क्षेत्राचा विकास करणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या संधी केवळ पुण्यापुरत्या मर्यादित न ठेवता सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्येही IT कंपन्यांची कार्यालये व विकास केंद्रे सुरू व्हावीत, यासाठी विशेष धोरणात्मक प्रयत्न करणार असल्याचे संपगावकर यांनी सांगितले.
# स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ठोस भूमिका
MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संपगावकर यांनी स्पष्ट केले. पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता किंवा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय याबाबत कठोर उपाययोजना आणि पारदर्शक परीक्षा प्रणालीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
# किल्ले संवर्धनातून पर्यटन आणि रोजगारनिर्मिती
पुणे पदवीधर मतदारसंघातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन करून त्यांचा जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये विकास शक्य आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना केवळ ऐतिहासिक वास्तू म्हणून न पाहता, त्यांचे संवर्धन, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा एकत्रित विचार झाला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
# सर्वांना सहज उपलब्ध होणारा आमदार हवा’
पुणे पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांशी संवाद साधताना निवडून आल्यानंतर आमदार उपलब्ध होत नसल्याची भावना वारंवार व्यक्त केली जाते. त्यामुळे आपण सर्वसामान्य पदवीधरांना सहज उपलब्ध असलेला आमदार म्हणून काम करणार असल्याचे संपगावकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading