Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा

पुणे : शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट चा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा आणि चालता बोलता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हजारो महिलांनी विविध मनोरंजक खेळांमध्ये सहभाग घेतला. तसेच लकी ड्रॉ आणि पैठणी जिंकण्याच्या स्पर्धेत महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली. पेशवाई क्रिएशनचे संचालक राहुल येमूल यांच्या हस्ते पैठणीचे वितरण करण्यात आले.

महिलांसाठी आयोजित या विशेष कार्यक्रमाला जेष्ठ अभिनेत्री उषा कुलकर्णी, कलाकार शाल्व किंजवडे, तन्वी मुंडले, शामला सोनवणे, भाग्यश्री साळुंके, नगरसेविका रुपाली धाडवे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २ लाख ५१ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

अश्विनी वैभव निकम यांनी होम मिनिस्टर खेळातून मानाची पेशवाई पैठणी जिंकली. तर, स्नेहल चंद्रकांत मोहिते यांनी सलग दुसऱ्या वर्षी टीव्हीचे बक्षीस जिंकले. याशिवाय लकी ड्रॉमध्ये लक्ष्मी हरी दंडवते यांना स्टील कढई, वनिता दत्ता मोरे (गणेश पेठ) यांना इअरबड्स, ललिता सुदाम पिसाळ यांना केटल, तर सदाशिव पेठेतील सारिका अमित सावंत यांना इलेक्ट्रिक गिझर मिळाला. कसबा पेठेतील रेणुका राजेंद्र सुपेकर आणि सविता नितीन हुले यांच्यासह अन्य महिलांनाही विविध बक्षिसे देण्यात आली.

श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान श्री क्षेत्र वीर चे भाकनूककार गुरु माऊली पिंटू महाराज शिंगाडे यांच्या हस्ते महाआरतीने उत्सवाची सांगता झाली. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading