Friday, August 28, 2026
BusinessLatest News

क्वाड्रिया कॅपिटलच्या आधाराने ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

डीआरएचपी आणि संक्षिप्त डीआरएचपीची लिंक https://www.bseindia.com/corporates/download/347004/IPO%20Prior/2DRHPNobelhygiene_20260821041616.zip

नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या) ब्रँडेड कंपनी आणि मूल्याच्या दृष्टीने भारतातील ऍब्झॉर्बन्ट हायजीन उत्पादनांच्या सर्वात मोठ्या स्वदेशी ब्रँडेड उत्पादक कंपनीने, बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. भारतात प्रौढांसाठीच्या ऍब्झॉर्बन्ट हायजीन उत्पादनांच्या श्रेणीची सुरुवात या कंपनीने केली आणि प्रौढ, लहान मुले तसेच महिलांसाठीच्या स्वच्छता उत्पादनांच्या विविध विभागांमध्ये आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.

या इश्यूमध्ये 150 कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन समभागांची विक्री आणि विद्यमान भागधारकांकडून 1,55,11,082 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. या विद्यमान भागधारकांमध्ये कमल कुमार जोहरी आणि कामिनी कमल जोहरी (प्रमोटर भागधारक) तसेच ऑर्बिट इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज प्रा. लि., सिक्स्थ सेन्स इंडिया अपॉर्च्युनिटीज III, बेनेट ट्रेडिंग एलएलपी, मनीष धरणेंद्र लाडगे, सीमा मनीष लाडगे आणि लशित लल्लूभाई संघवी (गुंतवणूकदार भागधारक) यांचा समावेश आहे.

नवीन इश्यूमधून मिळणारा निव्वळ निधी काही थकीत कर्जांची पूर्व-परतफेड/परतफेड, स्वतःची उपकंपनी नोबेल हायजीन बडोदा प्रायव्हेट लिमिटेड (NHBPL) मध्ये गुंतवणूक, हलोल येथील विद्यमान जमिनीवर ब्राउनफिल्ड उत्पादन-सह-गोदाम सुविधा उभारून आणि प्रौढ डायपर मशीन लाइनची खरेदी तसेच स्थापना करून उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अंशतः वित्तपुरवठा करणे, तसेच सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.

नोबेल हायजीनकडे दोन दशकांहून अधिक जुना वारसा आहे आणि फ्रेंड्स, बी-फिट, टेडी, स्नगी आणि रिओ या ब्रँड्सद्वारे प्रौढ, बाळ आणि महिलांसाठीच्या ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादनांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. 31 मार्च 2026 पर्यंत, तिच्या पोर्टफोलिओमध्ये 1,158 पेक्षा जास्त एसकेयू (SKUs) होते, ज्यात प्रौढ डायपर, बेबी डायपर, अंडरपॅड्स, इन्सर्ट पॅड्स, मॅटर्निटी पॅड्स, बेड बाथ टॉवेल्स, वेट वाइप्स आणि सॅनिटरी पॅड्स यांचा समावेश होता. वापराच्या दृष्टीने पाहिले तर फ्रेंड्स हा भारतातील प्रौढांसाठीच्या ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादनांचा सर्वात मोठा ब्रँड आहे, तसेच कंपनीने विविध किंमत श्रेणी आणि वापराच्या गरजांनुसार एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ विकसित केला आहे.

ऑर्गनाइज्ड ऍब्झॉर्बन्ट हायजीन बाजारपेठेत कंपनीने आपले स्थान मजबूत केले आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये, कंपनीच्या एकूण महसुलात प्रौढांसाठीच्या ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादनांचा वाटा 49.25% आणि लहान मुलांसाठीच्या उत्पादनांचा वाटा 45.32% होता. फ्रेंड्स आणि टेडी या ब्रँड्सचा महसुलातील वाटा अनुक्रमे 37.85% आणि 39.63% होता, तर बी-फिटचा वाटा 10.83% होता.

नाशिक आणि हलोल येथील प्रकल्पांमध्ये कंपनी सुमारे 19 एकर जागेवर 14 मॅन्युफॅक्चरिंग लाइन्स चालवते. प्रौढांचे डायपर्स, लहान मुलांचे डायपर्स आणि अंडरपॅड्स यांच्या उत्पादनासाठी कंपनीची एकूण वार्षिक स्थापित क्षमता 1,890.57 दशलक्ष युनिट्स इतकी आहे. संपूर्ण भारतभर कंपनीचे वितरण जाळे पसरलेले असून, त्यात 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 0.27 दशलक्ष किरकोळ विक्री केंद्रांचा समावेश आहे; या कार्यासाठी 296 हून अधिक स्टॉकिस्ट्स आणि 418 वितरकांची मदत घेतली जाते. तसेच, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशससह 19 देशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात कंपनी करते.

आर्थिक बाबींचा विचार करता, कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात 14.56% वाढ झाली असून, आर्थिक वर्ष 2025 मधील ₹739.14 कोटींवरून आर्थिक वर्ष 2026 मध्ये तो ₹846.75 कोटींवर पोहोचला आहे. याच काळात EBITDA ₹65.57 कोटींवरून ₹84.76 कोटींपर्यंत वाढला आणि EBITDA मार्जिन 8.87% वरून 10.01% पर्यंत सुधारले. कंपनी नफ्यात आली असून, वर्षाचा पुनर्रचित नफा आर्थिक वर्ष 2025 मधील ₹2.28 कोटींवरून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ₹१८.९१ कोटींपर्यंत वाढला आहे. तसेच, उत्पादनांचे मार्जिनही आर्थिक वर्ष 2025 मधील 42.13% वरून आर्थिक वर्ष 2026 मध्ये 44.43% पर्यंत सुधारले आहे.

डिस्पोजेबल पीरियड पँटीज बाजारात आणून फेमिनिन ऍब्झॉर्बन्ट हायजीन या श्रेणीतील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा कंपनीचा मानस आहे. त्याचबरोबर, बाजारपेठेत अधिक खोलवर पोहोचून उत्पादनांमध्ये नावीन्य आणून आणि उत्पादन क्षमता वाढवून प्रौढ तसेच बालकांच्या स्वच्छतेशी संबंधित व्यवसायांचा विस्तार करणे कंपनी सुरू ठेवणार आहे.

डीआरएचपीनुसार, प्रौढांसाठीच्या ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादनांची भारतातील बाजारपेठ एका महत्त्वपूर्ण वळणावर आहे. आर्थिक वर्ष 2020 पासून सुमारे 26% च्या चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने वाढल्यानंतर, आर्थिक वर्ष 2026मध्ये या बाजारपेठेचे मूल्य ₹20.5-21.5 अब्ज इतके असेल. ग्राहकांच्या संख्येत होणारी वाढ आणि उत्पादनांचा वाढता वापर यामुळे, आर्थिक वर्ष 2031पर्यंत ही बाजारपेठ ₹54-61 अब्ज इतकी वाढण्याचा अंदाज आहे; हा वाढीचा दर 21%-23% (CAGR) असेल. डीआरएचपीमध्ये नमूद केल्यानुसार, नवीन ग्राहकांकडून होणाऱ्या स्वीकारार्हतेमुळे प्रामुख्याने ही वाढ होईल आणि आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 1.5-1.8 लाख नवीन ग्राहक या श्रेणीशी जोडले जाण्याची अपेक्षा आहे. उत्पादनांचा सध्याचा कमी वापर, वाढती जागरूकता, फार्मासिस्ट आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांकडून मिळणाऱ्या शिफारशी तसेच या उत्पादनांच्या वापराबाबतचा कमी झालेला सामाजिक संकोच या गोष्टी या श्रेणीच्या स्वीकारार्हतेस चालना देतील.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading