fbpx
Thursday, December 7, 2023

Day: July 15, 2022

BusinessLatest NewsLIFESTYLE

 इन्शुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेहिंसाठी गोदरेज इन्शुलिकूल हे नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा उत्पादन सादर

मुंबई : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉयसची व्यवसाय शाखा असलेली गोदरेज अप्लायन्सेस देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

पर्यावरण संरक्षणासाठी कृतिशील योगदानाची आवश्यकता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नवी दिल्ली :  पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना वंदन करतानाच त्यांचे अनुकरण करून पर्यावरण संरक्षणासाठी कृतिशील योगदान देण्याचे

Read More
BusinessLatest News

अमेरिकेतील टेक कंपनी ‘मॅंटिक इन्क’चे भारतात विस्ताराचे नियोजन

पुणे : मॅंटिक इन्क या अमेरिकेतील अग्रगण्य अशा ग्लोबल आयटी सोल्युशन्स कंपनीने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे नवीन अत्याधुनिक ‘ऑफशोअर डेव्हलपमेंट

Read More
BLOGLatest News

बहुआयामी शिक्षण … काळाची गरज!

काही वर्षांपूर्वी पर्यंत असा एक समज जनमानसात होता की ‘मुलांना  इंजिनीअर बनायचं असेल तर त्याने किंवा तिने Biology विषय १०वी नंतर घेऊच नये. उगाच कशाला अभ्यासाला विषय वाढवा….’  परंतू २०२० साल उजाडले आणि असे सर्वच (गैर)समज कोलमडून पडले. कोरोना ची लागण नक्की कशी होतीये… आयसोलेट व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि काय करायचं नाही? हे करोना प्रकरण नक्की कधी संपणार? एक ना अनेक शंका आणि भीती नागरिकांना मध्ये पसरली.  जीवशास्त्रज्ञांचा सुद्धा सुरुवातीचा काही काळ कोरोना चा प्रसार कसा होतो ह्याचा अंदाज बांधण्यात आणि अभ्यासात गेला. कालांतराने जशी नागरिकांमधील भीती कमी होत गेली तसं ‘चाय पे चर्चा’ मध्ये क्रिकेट मधल्या डावपेचांवर भाष्य करणारे “घरोघरचे जाणकार” आता हर्ड इम्युनिटी कशी आणि कधी येईल आणि शासनाने नक्की काय धोरण राबवावे ह्यावर आपली परखड मतं मांडू लागले. “आता हर्ड इम्म्युनिटी येईल रे दोन महिन्यात ….. थांब तू जरा…. तापमान ४० अंश सेल्सिअस च्या वर जाऊदेत एकदा…. मग करोना कसा मरतो बघ….” ह्या आणि अशा अनेक संवादाचे पेव फुटले. नुसतेच भारतात नाही तर अगदी जगभर हीच परिस्थिती होती. आम्हाला दहावी नंतर जीवशास्त्राचा काही उपयोग नाही असे म्हणणारे लोक, जीवशास्त्रातल्या अगदी क्लिष्ट संकल्पना सुद्धा समजून घेऊ लागले. आपल्या शरीरामध्ये अवयवांचे कार्य कसे चालते? नक्की काय केल्याने समाजाला आपली मदत होऊ शकेल ह्याचे विचार होऊ लागले. कोणी शास्त्रज्ञ कोरोना टेस्टिंग किट्स बनवायला लागले, काही संगणक आणि भौगोलिक शास्त्रज्ञांनी मिळून नवीन प्रणाली विकसित केली ज्यामुळे कोरोना रुग्ण आपल्या आजूबाजूला कुठे आहेत, त्यांची तब्बेत कशी आहे? ह्याचा मागोवा घेणे शक्य झाले, तर काहींनी अगदी अविरत पणे लोकांची सेवा केली, अन्नदान केले नवनवीन पद्धतीने मनोरंजन केले. जे सांगून सुद्धा शक्य झाले नव्हते ते एका सूक्ष्मजीवाने नकळत पणे घडवून आणले. ह्या दोन वर्षांच्या कालावधीत काही काळासाठी का होईना, शास्त्र, वित्त आणि कला शाखांच्या मधल्या सीमारेषा धूसर झाल्या. इथून पुढे अनेक रोगांच्या साथी येतील आणि जातील. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने माणूस त्यावर नक्की मात करू शकेल ह्यात शंका नाही. असं म्हणतात की  निसर्ग हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे. ह्या निसर्गाकडे जर आपण सजगतेने पाहिले तर आपल्या लक्षात येते की अभ्यासांमधल्या सीमारेषा ह्या मानवनिर्मित आहेत. इतर कुठलीच प्रजाती अशा सीमारेषा बाळगत नाही. उदाहरणादाखल आपण हिमालयात आढळणारे आयबेक्स प्राणी बघुयात. हिमालयातील तीव्र डोंगर उतारांवरून बखूबी बागडताना गणितातील अनेक प्रमेयांचा वापर ते अगदी नकळतपणे करतात. तसेच इतक्या थंड प्रदेशात शरीरातील उष्णता कायम ठेवण्यासाठी उष्मागतिकी सिद्धांत त्यांना अंगीभूत असतात. वनस्पतींमध्ये देखील हवामातील बदल ओळखून त्यानुरूप अन्नाचे साठे करणे किंवा विशिष्ठ प्रकारची रसायने बनवणे याचे ठोकताळे ठरलेले असतात. सूक्ष्मजीव आपल्या भोवतालची परिस्थिती ओळखून रासायनिक संदेशां मार्फत आजूबाजूच्या नातेवाईकांशी संभाषण प्रस्थापित करतात. थोडक्यात काय, तर कुठल्याही भाषेच्या अथवा सीमारेषेच्या पलीकडे खरे शास्त्र सुरु होते आणि फुलते. अनेक द्रष्ट्या संशोधकांनी हे हेरले आणि आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन आपला अभ्यास सुरु ठेवला. उपलब्ध असलेल्या सोयी  सुविधा, पैसा अडका ह्या कशाचाही अडसर न आणता अविरतपणे आपले काम केले आणि अशातूनच एखादा जॉर्ज कार्व्हर निर्माण झाला. विज्ञानाच्या रुंदावणाऱ्या कक्षा आणि माहिती-तंत्रज्ञानाचे वाढते जाळे ह्यांमुळे जवळपास सर्वच विषयातील माहिती आता सहज उपलब्ध होऊ शकते. परंतु एखादी गोष्ट नुसतीच माहित असणे आणि त्या गोष्टीची अभ्यासपूर्वक मीमांसा करणे ह्यातील फरक केवळ शास्त्रशुद्ध शिक्षणानेच भरून काढता येऊ शकतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, आता शिक्षण पद्धती मध्ये सुधार करणे ही काळाची गरज बनली आहे. इथून पुढे शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती पुरवण्या पेक्षा सुद्धा, उपलब्ध माहितीचा वापर कसा करता येईल ह्यावर भर देणे जास्ती महत्वाचे ठरेल. किंबहुना उपलब्ध माहितीचा बहुआयामी विचार आणि समांतर विस्तार ह्याचा वापर अभ्यासक्रमात करणे उपयोगी ठरेल. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान विषयात शिक्षण हे अशाच संकल्पनेतून पुढे आले आहे. सदर अभ्यासांमध्ये, जीवशास्त्रामधील संकल्पनांचा उपयोग करून आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक जीवनावश्यक गोष्टींची निर्मिती केली जाऊ शकते. तसेच निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. उदाहरणादाखल सांगायचे तर बिया विरहीत द्राक्ष उत्पादन, lnsulin सारख्या रसायनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन किंवा विक्रमी वेळेत कोरोना virus प्रतिबंधाच्या लसीचे उत्पादन हे नमूद करता येईल. तात्पर्य असे की इथून पुढचा येणारा काळ हा आंतरविद्याशाखीय अभ्यासाचा असणार आहे. हे हेरून आता विविध विद्यापीठे आपल्या अभ्यासक्रमांमध्ये जास्तीत जास्त अंतर्विद्या विषयांचा समावेश करत आहेत. ह्याच संकल्पनेतून पुण्यातील MIT-WPU ह्या विद्यापीठाने सर्व इंजिनियरींग च्या शाखांना जीवशास्त्र विषय बंधनकारक केला आहे. विद्यापीठामध्ये आगामी काळात जीवशास्त्र विषयातील अनेक नवनवीन पदवी आणि पद्व्युत्तर शिक्षणाच्या संधी तसेच देशातल्या आणि विदेशातल्या नावाजलेल्या संस्था, विद्यापीठे, संशोधक आणि सक्षम शिक्षकांकडून मार्गदर्शन उपलब्ध करण्यासाठी एक स्वतंत्र जीवशास्त्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. ह्या विभागाअंतर्गत बायोटेक्नोलॉजी विषयात बीएससी तसेच एमएससी आणि पीएचडी च्या संधी उपलब्ध होतील. शिवाय सूक्ष्मजीवशास्त्र विषयात एमएससी आणि पीएचडी करणे पण शक्य होईल. चालू काळाची गरज ओळखत, MIT-WPU मधील सर्व जीवशास्त्राचे अभ्यासक्रम नावाजलेल्या विदेशी संशोधन संस्थांबरोबर संयुक्त विद्यमाने घेण्याचे प्रयत्न विद्यापीठ करीत आहे. ह्यामुळे विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षासाठी संयुक्त संस्थेमध्ये राहून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पर्याय खुला राहील. अखेरीस असे म्हणता येईल की विविध शाखांमधल्या सीमारेषा काढून टाकून एकत्रित अभ्यासाला प्रोत्साहन देण्याचं मोलाचं काम आणि संशोधक आणि व्यावसायिकांकडून थेट शिक्षण घेणे शक्य असल्याने, वरील सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाचे काम करतील ह्यात शंका नाही.   Dr. Neha Shintre Assistant Professor Ph.D. Microbiology School of Biology, MIT World Peace University

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

शहरातील रस्त्यावपरील कामासंदर्भात भाजपने श्वेतपत्रिका काढावी -सुप्रिया सुळे

पुणे: जोरदार पावसामुळे पुण्यातील बहुतांश भागात रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या

Read More
Latest NewsPUNE

नंदकिशोर कल्चरल सोसायटी च्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी

पुणे, : नंदकिशोर कल्चरल सोसायटी ची बहारदार गुरुपौर्णिमा नामवंत नृत्य संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटी च्या वतीने यमुनानगर, निगडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त

Read More
Latest NewsPUNE

अजिंक्य सोशल फौंडेशन कडून कोविड योद्धाचा सन्मान.

पुणे- सामाजिक बाधिलकीतून 2020-21 या वर्षामध्ये कोविड सारख्या महामारी मध्ये कोरोना काळात वेगवेगळयाआरोग्य,रक्तपेढी,न्यूज , एनजीओ, या सामाजिक क्षेत्रात आपले कर्तव्य

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

औरंगाबादचे संभाजीनगर होणारच! नामांतराला स्थगिती नाही; फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पवारांच्या बोलण्यावर दिल्लीत राजकारण चालत नाही -खासदार गिरीश बापट

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्या देशात केंद्राची हुकूमशाही चालू आहे असं विधान केले होते. पवारांच्या या विधानावर भाजपचे

Read More
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृतीसाठी ‘पुणे क्लायमेट वॉरिअर्स’ उपक्रम

पुणे : पर्यावरण आणि तापमानवाढ यातील बदलासंदर्भात माहिती देत त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती पोहचण्यासाठी ‘पुणे

Read More
Latest NewsPUNE

जोंधळे चौकात पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी; ७ जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे,: पुण्यात टिळक रोडवरील जोंधळे चौकात पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले

Read More
Latest NewsPUNE

पाणी उकळून व गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

पुणे: पुणेकरांना महापालिकेने पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. मागील काही दिवसंपासून पडणाऱ्या पावसामुळे धरणातून गढूळ पाणी येत

Read More
Latest NewsPUNE

एनआयआरएफ रँकिंग’ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात १२ व्या स्थानी

पुणे: राष्ट्रीय पातळीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ २०२२ ची क्रमवारी जाहीर झाली असून सावित्रीबाई फुले

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘त्या’ 3 नामांतराला स्थगिती दिल्यानंतर शरद पवार म्हणाले…

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘रेड अलर्ट’ वरुन कोसळलेल्या ‘मिम्स’च्या पावसाला IMD संचालकांचे उत्तर

पुणे : भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरुवारी पुणे, नाशिक, कोकण विभागासाठी ‘रेड अलर्ट’ दिला होता. मात्र बहुतांश ठिकाणी पाऊस

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

१५ ऑगस्टला विदर्भ राज्याची घोषणा करा, देशात ७५ राज्यांची गरज ; माजी आमदाराचं पंतप्रधानांना पत्र

नागपूर : नागपूरचे माजी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लहान राज्यांच्या निर्मिती, सुरुवात विदर्भापासून

Read More
ENTERTAINMENTLatest News

वहिनीसाहेब पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत

वहिनीसाहेब पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत

Read More
Latest NewsPUNE

जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी झेडएस केअर्स तर्फे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संचलित स्टेम रोबोटिक्स लॅब

पुणे : रोबोटेक्स इंडिया स्वयंसेवी संस्था,जागतिक दर्जाची सेवा पुरवणारी झेडएस कंपनी व रोटरी क्लब ऑफ पुणे – सिंहगड रोड यांच्या

Read More
Latest NewsPUNE

कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा पगार द्या – सुनील शिंदे

पुणे :-पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी चालकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पुणे महानगरपालिकेतील विविध आस्थापनांमध्ये काम काय करणारे कंत्राटी चालक

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

दोन ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानामुळे सात तासाच्या आत तिघांना मिळाले नवजीवन.

पुणे : सोलापूर येथील रुग्णालयात ५६ वर्षीय रुग्ण रास्ता अपघातात गंभीररित्या जखमी झाले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांना मेंदू मृत (ब्रेन

Read More
%d