fbpx

जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी झेडएस केअर्स तर्फे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संचलित स्टेम रोबोटिक्स लॅब


पुणे : रोबोटेक्स इंडिया स्वयंसेवी संस्था,जागतिक दर्जाची सेवा पुरवणारी झेडएस कंपनी व रोटरी क्लब ऑफ पुणे – सिंहगड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्यावहिल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संचालित स्टेम रोबोटिक्स लॅबचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. सर्वसामान्यांपर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI ), मशीन लर्निंग व स्टेम एज्युकेशन पोचावे याकरिता हि लॅब बांधण्यात येणार आहे.
लोणीकंद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे अद्ययावत ज्ञान आता विद्यार्थ्यांना मिळणार असून रोबोटेक्स नॅशनल व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी नव्या युगाचे तंत्रज्ञान व माहितीचा खजिनाच या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी खुला होणार आहे. या लॅब चे लाभार्थी असणाऱ्या तब्बल १५०० विद्यार्थ्यांना यावर्षीच्या झेडएस प्रस्तुत रोबोटेक्स नॅशनल या स्थानिक व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच या स्पर्धांतून विजयी झालेल्या स्पर्धकांना पुढे रोबोटिक्स आशिया व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी केले जाईल. 

रोबोटेक्स इंडिया च्या पायल राजपाल यांनी “समाजाच्या सर्व स्तरांत अद्ययावत तंत्रज्ञान पोहचवणे व मुलांना भविष्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. या स्टेम रोबोटिक्स लॅबमुळे आमच्या या ध्येयाप्रत पोहचण्यात आम्हाला निश्चित मदत मिळेल व भविष्यात या मुलांना मिळू घातलेल्या रोजगार संधींची ओळख त्यांना घडेल” असे म्हंटले.
” झेडएस या आमच्या कंपनीमार्फत समाजातील विविध स्तरांवरील संस्थांशी संलग्न होत अधिकाधिक जणांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख घडून भविष्यातील उज्वल संधींची कवाडे खुली होतील असा आम्हाला विश्वास वाटतो.” असे मत झेडएस च्या एचआर पार्टनर हर्षा पीटर यांनी व्यक्त केले.
झेडएस केअरच्या समन्वयक अनया पाटील म्हणाल्या, की ” झेडएस च्या माध्यमातून आम्ही नेहमीच समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असतो. अशातच  विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ करत नवनवीन माहितीचा खजिना व मार्गदर्शन देता येऊ शकणारा असा हा उपक्रम आहे.”
“बदलत्या विश्वाची हाक ऐकता मुलांना कोडिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग इत्यादी गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक बनले आहे. त्याच पार्श्वभूमीवर रोबोटेक्स इंडिया यांच्यासोबत घडत असलेल्या या संयुक्त प्रकल्पातून अत्यंत प्रतिभावान असे भावी तंत्रज्ञ् आम्ही घडवू शकू असा विश्वास जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

%d bloggers like this: