Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धर्माचा अभिमान असावा, पण झिंग नको; सोशल मीडियातून राग भडकवण्याचा प्रयत्न : राज ठाकरे

ठाणे : सरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणे आवश्यक आहे, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, राष्ट्रपुरुष आणि महापुरुषांच्या छायाचित्रांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो लावण्याऐवजी तो स्वतंत्र ठिकाणी लावला जावा, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली.

सरकारी कार्यालये, शाळा, न्यायालये आणि अन्य सरकारी आस्थापनांनी यासंदर्भातील नियमांचे पालन केले पाहिजे. यामध्ये काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या तातडीने करण्यात याव्यात, असेही ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी देशातील वाढत्या धार्मिक ध्रुवीकरणावरही चिंता व्यक्त केली. काही महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक वेगळ्या मुद्द्यांमध्ये गुंतवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
“धर्माचा अभिमान असण्यात काही गैर नाही; मात्र धर्माची झिंग असता कामा नये. धर्माभिमानी असावे, धर्मांध नव्हे,” असे ठाकरे म्हणाले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने काही प्रकारचे संदेश पसरवले जात असून, त्यातून लोकांच्या मनात संताप आणि राग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. अशा वातावरणामुळे जनतेचे लक्ष इतर गंभीर प्रश्नांपासून दूर जावे, यासाठी हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असल्याचेही राज ठाकरे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading