fbpx

 इन्शुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेहिंसाठी गोदरेज इन्शुलिकूल हे नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा उत्पादन सादर

मुंबई : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉयसची व्यवसाय शाखा असलेली गोदरेज अप्लायन्सेस देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सक्रियपणे योगदान देत आहे. या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आपला वैद्यकीय रेफ्रिजरेशन पोर्टफोलिओ मजबूत करत गोदरेज अप्लायन्सेसने नवीन इन्शुलिकूल उत्पादन श्रेणी – गोदरेज इन्शुलिकूल आणि गोदरेज इन्शुलिकूल + सादर केली आहे. शिफारस केलेल्या तापमानात इन्शुलिन साठवणे यासंदर्भात मधुमेहाच्या रुग्णांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी इन्शुलिन साठवणुकीसाठी डिझाइन केलेली ही नाविन्यपूर्ण कूलिंग सोल्यूशन्स सुविधा आहे.

डेटा सूचित करतो की भारतात जवळपास ७४  दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संख्या आहे आणि २०३० पर्यंत १०% पेक्षा जास्त वाढण्याचा अंदाज आहे. यापैकी किमान १०% मधुमेहींना तोंडाने औषध घेण्याच्या पलीकडे इन्शुलिनच्या उपचारांची आवश्यकता आहे. हे देखील वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले आहे की इन्शुलिनची परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी ते नेहमी २-८°C तापमानाच्या श्रेणीमध्ये साठवून  ठेवावे लागते. या श्रेणीच्या खाली किंवा त्यापेक्षा जास्त तापमानाचे कोणतेही उल्लंघन केल्याने त्याची परिणामकारकता कमी होते.

भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये देखील एक मोठे आव्हान म्हणजे या श्रेणीतील तापमान राखण्यासाठी इन्शुलिनच्या नियमित दैनंदिन साठवणुकीसाठी स्वीकारल्या जाणार्‍या स्टोरेज पद्धती. या अडचणी कोणत्याही प्रवासादरम्यान आणखी वाढतात त्यामुळे इन्शुलिनवर अवलंबून असलेल्या मधुमेहिंच्या गतिशीलतेवर मर्यादा येतात. इन्शुलिन स्टोरेजसाठी सर्वसाधारणपणे रुग्ण वापरत असलेले आइस पॅक हे खरे तर इन्शुलिनच्या साठवणुकीसाठी अजिबात नसतात. घरांमध्ये वापरले जाणारे रेफ्रिजरेटर देखील आदर्श नाहीत कारण वारंवार दरवाजा उघडल्याने तापमानात चढ-उतार होतात आणि इन्शुलिनला अचूक कूलिंगची आवश्यक असते. इन्शुलिनची अयोग्य प्रकारे साठवण केल्यामुळे त्याची क्षमता कमी होते आणि परिणामी कालांतराने डोस वाढू शकतो. शिफारस केलेल्या तपमानावर इन्शुलिनचे योग्य संचयन मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गाने जाऊ शकते. सामान्यतः ही रुग्णांमध्ये दीर्घकाळ चालणारी स्थिती असते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णता वापरत गोदरेज इन्शुलिकूल उत्पादन श्रेणी प्रगत सॉलिड स्टेट थर्मोइलेक्ट्रिक कूलिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. अगदी प्रचंड उष्ण अशा ४३°C  वातावरणीय तापमानात देखील कार्य करण्यासाठी या प्रणालीचे अंतर्गत तापमान नेहमी २-८°C राहील अशा प्रकारे डिझाइन केलेले आहे. युनिटच्या समोरील डिस्प्ले इंडिकेटरवर इन्शुलिन योग्य तापमानात साठवले जात असल्याचे दिसते. ५६० एमएलच्या साठवणूक क्षमतेसह ते सहजपणे ९ कुपी साठवू शकते. व्हायल होल्डर काढून ठेवला तर २ पेन्स आणि ५ कारट्रेजही साठवून  ठेवता येऊ शकतात.

तंतोतंत  अचूक कूलिंग सुनिश्चित करण्याच्या जोडीलाच दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची पोर्टेबिलिटी. इन्शुलिकूल हे वजनाने हलके,  सुटसुटीत (कॉम्पॅक्ट)आणि खांद्याला अडकवून नेता येईल अशा पट्ट्यासह येते. युनिटसोबत पुरवलेल्या पॉवर अॅडॉप्टर व्यतिरिक्त, पूर्ण चार्ज झाल्यावर ४ तासांचा बॅकअप देण्यासाठी बाह्य पॉवर बँक किंवा वाहनाने प्रवास करताना जाता जाता चार्जिंगसाठी कार अॅडॉप्टर किट यांसारखी अतिरिक्त उपकरणे देखील खरेदी करता येऊ  शकतात. त्यातील अजून प्रगत प्रकार इन्शुलिकूल + उत्पादन किटमध्ये समाविष्ट असलेल्या बाह्य पॉवर बँकसह येतो. विचारपूर्वक डिझाइन केलेले आणि गहन वैज्ञानिक प्रयत्नांचा परिणाम म्हणून उत्पादनामध्ये मऊ बाह्य कंटुर आहेत ज्यामुळे ते वाहून नेणे सोपे होते. त्याची समर्पित अंतर्गत जागा व्हायल होल्डर सह येते. त्यामुळे प्रवासात असतानाही म्हणजेच गतीशील असतानाही कुपी सुरक्षित ठेवल्या जातात आणि कारट्रेज साठवणुकीसाठी जागा तयार करण्यासाठी सहजपणे काढताही येते. सुरक्षित डोअर लॅचमुळे योग्य गॅस्केट सीलिंगची खात्री मिळते आणि त्यामुळे वाहतुकीदरम्यानही थंडपणा कमी होत नाही. या उपकरणात तापमान संवेदनशील लस, औषधे, थेंबांसाठी कुपी, इतर वैद्यकीय नमुने साठवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि परिणामकता टिकवून ठेवण्यासाठी नमुने २-८ °C दरम्यान अचूक तापमानात साठवण्याची आवश्यकता असलेले विस्तृत अनुप्रयोग देखील आहेत.

गोदरेज अँड बॉयसच्या कार्यकारी संचालक नायरिका  होळकर  यांनी गेल्या काही वर्षांतील ब्रँडच्या नवकल्पनांबद्दल बोलताना सांगितले की, “आज आरोग्यसेवा पायाभूत सुविधा ही देशाच्या वाढीच्या प्रमुख स्तंभांपैकी एक आहे आणि आमचा ठाम विश्वास आहे की सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि नाविन्यपूर्ण सादरीकरण आपल्या सध्याच्या आरोग्य सेवा प्रणालीला तोंड द्यावे लागणारी अनेक आव्हाने, समस्या सोडवण्यास मदत करू शकतात. त्याद्वारे सार्वजनिक आरोग्याला चालना देत राष्ट्रीय समृद्धीसाठी खूप पुढे जाता येत आहे. इन्शुलिनसाठी योग्य शीतकरण सुविधा उपायांच्या अभावामुळे आपल्या देशात मधुमेहावर उपचार करताना कसा त्रास होत आहे याचा आम्ही अभ्यास केला. वैद्यकीय शीत साखळीतील आमच्या कौशल्याने या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि इन्शुलिनवर अवलंबून असलेल्या लाखो मधुमेहींचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्हाला नाविन्यपूर्ण उपाय – गोदरेज इन्शुलिकूल मालिका सादर करण्यास सक्षम केले.”

भारतातील इन्शुलिन साठवण सुविधांच्या कमतरतेच्या समस्येवर आपले विचार मांडताना  प्रख्यात एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील एंडोक्राइनोलॉजीच्या  प्रमुख तसेच स्पिहरच्या संस्थापक डॉ. वैशाली देशमुख म्हणाल्या, “सामान्यपणे लोक घरात इन्शुलिन साठवण्यासाठी रेफ्रिजरेटर वापरतात. परंतु अनेकदा दरवाजे उघडल्यामुळे घरगुती रेफ्रिजरेटरमधील चढ-उतार तापमान इन्शुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते आणि त्याची क्षमता गमावते. पुढे, प्रवास करताना बहुतेक लोक इन्शुलिन साठवण्यासाठी योग्य उपाय वापरत नाहीत. इन्शुलिन नेहमी २-८ अंश सेल्सिअस तापमानातच साठवले गेले पाहिजे आणि असे होत  नसेल तर त्यामुळे परिणामकता कमी होऊ शकते. जेव्हा एखादा रुग्ण मोजलेल्या डोसद्वारे इन्शुलिन घेत असतो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी राखण्याचे परिणाम इन्शुलिनच्या कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे बदलू शकतात.”

गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट कमल नंदी म्हणाले, “गोदरेज अप्लायन्सेसमध्ये आम्ही ग्राहकांना भेडसावणाऱ्या अनोख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अथकपणे काम करतो. मधुमेहाच्या रुग्णांना भेडसावणाऱ्या सर्वात महत्वाच्या समस्यांचा मागोवा घेताना लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे योग्य तापमानात योग्य पद्धतीने इन्शुलिन साठवून ठेवण्याच्या क्षमतेचा अभाव. त्यामुळे त्याची क्षमता कमी होते. त्यामुळेच आम्ही शिफारस केलेल्या २-८°C तापमानात इन्शुलिन साठवणूक क्षमता प्रदान करण्यासाठी खास डिझाइन केलेली इन्शुलिकूल उत्पादन श्रेणी सादर केली आहे. हे अचूक तापमानात इन्शुलिन साठवण्याच्या आव्हानांना पूर्ण करते आणि घरी किंवा कार्यालयात किंवा प्रवासादरम्यान वापरण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. आम्हाला असे वाटते की यामुळे भारतात मधुमेह व्यवस्थापनावर सकारात्मक परिणाम होईल आणि मधुमेही ग्राहकांचे जीवनमान सुधारण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठता येऊ शकेल.”

उत्पादन श्रेणी संपूर्ण भारतात ब्रँडच्या ई-स्टोअरद्वारे आणि अमेझॉन सारख्या लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे तसेच केमिस्टच्या दुकानांमध्ये ५९९९ रु. एमआरपी पासून उपलब्ध होईल. अॅक्सेसरीजची स्वतंत्र किंमत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: