fbpx

शहरातील रस्त्यावपरील कामासंदर्भात भाजपने श्वेतपत्रिका काढावी -सुप्रिया सुळे

पुणे: जोरदार पावसामुळे पुण्यातील बहुतांश भागात रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर आणि 23 गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन सुळे यांनी महापालिकेला इशारा दिलाय. शहरातील रस्त्यावरील खड्डे 7 दिवसाच्या आत भरुन काढावेत. अन्यथा आंदोलन करण्याचा. पुणे शहरातील रस्त्यावपरील कामासंदर्भात भाजपने श्वेतपत्रिका काढावी ही राष्ट्रवादीची मागणी आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुणे शहरातील एवढ्या घाई घाईत सरकार पाडलं, ना अता ना पता, मंत्री नाहीत, कुणाचं काय चाललंय हेच कळत नाही. स्वत:च्या इगोसाठी निर्णय रद्द करणं चुकीचं आहे. मागच्या सरकारमध्ये त्यांचेच लोक होते, अशी प्रतिक्रियाही सुप्रिया सुळे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर दिलीय.

Leave a Reply

%d bloggers like this: