fbpx

‘रेड अलर्ट’ वरुन कोसळलेल्या ‘मिम्स’च्या पावसाला IMD संचालकांचे उत्तर

पुणे : भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरुवारी पुणे, नाशिक, कोकण विभागासाठी ‘रेड अलर्ट’ दिला होता. मात्र बहुतांश ठिकाणी पाऊस आलाच नाही. इतकेच नव्हे तर काल या ठिकाणी सूर्याचेही दर्शन झाले. यामुळे काल दिवसभर सोशल मिडियावर IMDच्या हवामान अंदाजा विषयीच्या ‘मिम्स’चा पाऊस कोसळत होता. तसेच काही प्रसारमाध्यमांवरही IMDच्या अंदाजा विषयी खिल्ली उडवण्यात आली. यावर IMDचे संचालक के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करीत टीका करणाऱ्यांना आकडेवारितून सडेतोड उत्तर दिले आहे.

‘टीका करणाऱ्यांनी कृपया काल पालघर, रायगड, पुणे आदी ठिकाणी झालेल्या पावसाची आकडेवारी पहावी’, असे के. एस. होसळीकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटंले आहे. तसेच ‘आयएमडीमध्ये आम्ही ठामपणे काही गोष्टी सांगू शकत नाही, परंतु आम्ही केवळ सर्वोत्तम वैज्ञानिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तसे घडेल असा आमचा अंदाज असतो’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपले म्हणणे पटवून देण्यासाठी IMDचे संचालक के. एस. होसळीकर यांनी एक, दोन नव्हे तर तब्बल पाच ट्वीट करीत राज्यभरात काल पडलेल्या पावसाची आकडेवारी दिली आहे. इतकेच नव्हे तर ‘पाऊस कुठे आहे? IMDने रेड अलर्ट दिला की पाऊस गायब होते …. असे लिहीत हा पहा पाऊस..’ असे म्हटंले आहे.

रायगड जिल्हा दि. १५.७.२०२२
पेन – 160 🙄
महसला – 23
उरण – 118
खालापूर – 138
पोलादपूर – 57
सुधागड – 65
तळा – 54
पनवेल – 107.2
माथेरान – 354.2🙄🙄🙄🙄🙄
अलिबाग – 67
महाड – ३८
कर्जत – 206.8🙄🙄🙄

पालघर जिल्हा तालुकानिहाय पाऊस दि.15.7.2022
तलासरी- 131
वाडा – 160🙄🙄
विक्रमगड – 172🙄🙄
पालघर-134
वसई- ९६
जवाहर-222 🙄🙄🙄

Leave a Reply

%d bloggers like this: