fbpx

पाणी उकळून व गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

पुणे: पुणेकरांना महापालिकेने पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. मागील काही दिवसंपासून पडणाऱ्या पावसामुळे धरणातून गढूळ पाणी येत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाकडून याबबत परीपत्रक काढण्यात आले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून काढण्यात आलेल्या परीपत्रकात म्हटले आहे की, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातून येणाऱ्या पाण्यात गढुळपणा वाढला आहे. हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध होऊन येत आहे तरी खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. त्यामुळे संभाव्य आजारांची भीती नागरिकांना राहणार नाही.
पावसाने काही काळ पुणे व आसपासच्या परिसरात विश्रांती घेतली असली तरी धरणातील गढूळ पाणी आणखी काही दिवस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: