fbpx

अजिंक्य सोशल फौंडेशन कडून कोविड योद्धाचा सन्मान.

पुणे- सामाजिक बाधिलकीतून 2020-21 या वर्षामध्ये कोविड सारख्या महामारी मध्ये कोरोना काळात वेगवेगळयाआरोग्य,रक्तपेढी,
न्यूज , एनजीओ, या सामाजिक क्षेत्रात आपले कर्तव्य पार पाडत असताना आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता समाज कसा वाचेल,लोकांचे प्राण कसे वाचेल यासाठी अहो रात्र काम केले असे हे कोविड योद्धा म्हणून कार्य केलेल्या , डॉक्टर,नर्स, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, यांचा अजिंक्य सोशल फौंडेशन कडून सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये संगीता भालेराव,प्रवीण घुले,अमित बाळसराफ, पत्रकार विशाल सातपुते, किशोर खंडागळे, यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला,यावेळी संस्थेचे संस्थापक – सचिन पवार, प्रवक्ते सुदाम बारकडे, आकाश पवार,सोनाली करपे, सारिका कडूस्कर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नगरसेवक विनायक गायकवाड, प्रमुख पाहुणे दत्तात्रय इंगळे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब राठोड यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: