fbpx

जोंधळे चौकात पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी; ७ जण पोलिसांच्या ताब्यात

पुणे,: पुण्यात टिळक रोडवरील जोंधळे चौकात पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले आहे.आणि इतरांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळक रस्त्यावर दोन गटात अचानक हाणामारीला सुरुवात झाली. चार – पाच तरुण एकाला बेदम मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. त्यामधील एक तरुण हातात दगड घेऊन दहशत देखील निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच एक युवती फोनवर बोलत त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांना ही घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे तरुण सिंहगड रस्त्यावरून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच या घटनेत एक पोलिसही हजखमी झाला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: