ईडी ची कारवाई कोणावर होते आणि कोणावर होत नाहीये.आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे -रूपाली चाकणकर
पुणे : मुंबई मधील पत्राचाळ प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी हजर झाले आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरतर आपल्याला माहीत आहे की ईडी ची कारवाई ही कोणावर होते आणि कोणावर होत नाहीये.आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. असे राष्ट्रवादीचे नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या असता पत्रकारांना दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका महिलेला शिवीगाळ केली आहे याबाबत चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या,की संबंधित महिलेची कोणतीही तक्रार अजूनही राज्य महिला आयोगाला आलेली नाही.तरी सुद्धा आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस चौकी येथून अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहे.अस देखील यावेळी चाकणकर म्हणाले.
राज्यपाल यांच्या वक्तव्याबाबत रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या,की राज्यपाल हे पद सांविधनिक पद आहे.आणि या पदावर असताना त्यांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाही अशी वक्तव्य करू नये.महारष्ट्र हा एक संघ असून विविध वक्तव्य करून राज्यपाल यांना काय साध्य करायचं आहे.हाच प्रश्न आहे.
एखादी क्लिप आली किंवा एखादा ऑडियो आला की त्यावर विश्वास ठेवता येत नाही.पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दखल झाल्यावर त्याची शहानिशा केली जाते.राज्यात अनेक विषय आहे.रायगड चा विषय आहे.खासदार राहुल शेवाळे यांचं विषय आहे.तसेच सोलापूर येथील जिल्हाध्यक्ष यांचा विषय आहे.या सगळ्यांच्या बाबतीत पोलिसांना निर्देश देण्यात आल आहे.खासदार राहुल शेवाळे यांच्या बाबतीत एप्रिल महिन्यात संबंधित महिलेने पोलीस स्टेशन येथे जाऊन 4 वेळा तक्रार दाखल केलेली आहे.तरी ती तक्रार दखल झालेली नाही.म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने संबंधित पोलिसांना बोलावून आजपर्यंत तक्रार का दाखल केली नाही.म्हणून अहवाल मागविण्यात आला होता. पण दुर्दैवाने त्यांनी तक्रार दाखल केलेली नाही का तर त्यांचा आयो हा आजारी होता.पण आम्ही 4 दिवसात तक्रार दाखल करा अनाई अहवाल सादर करा.अस सांगितल आहे.अस देखील यावेळी चाकणकर म्हणाल्या.
