Wednesday, August 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Assembly Election : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने घटक पक्षांमधील जागावाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित करी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी आघाडी घेतली आहे. जागा वाटपाच्या प्राथमिक सूत्रानुसार काँग्रेस 100 जागा लढविणार आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गट 90 ते 95 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागांवर निवडणूक लढविणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाला विलंब झाल्यामुळे अनेक उमेदवारांना फटका बसला. या निवडणुकीत तसे होऊ नये यासाठी महायुतीने जागा वाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित केले आहे. त्यानुसार  लोकसभा निवडणुकीत एका खासदारावरून 13 जागांपर्यंत झेप घेणाऱ्या काँग्रेसला सर्वाधिक 100, लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ठाकरे गटाला 90 ते 95 तर 80% चा सर्वाधिक स्ट्राइक रेट नोंदविणाऱ्या शरद पवार गटाला 80 ते 85 जागा दिल्या जाणार आहेत.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस, कोकण आणि मुंबईत शिवसेना तर पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे.. मागील आठवड्यात पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपाचे प्राथमिक सूत्र ठरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading