Sunday, April 5, 2026

Day: June 2, 2024

ENTERTAINMENTLatest News

अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे रोमँटिक गिफ्ट

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपतीचा वाढदिवस साजरा होतोय. अक्षरा अत्यंत प्रेमाने त्याला शर्ट गीफ्ट देते, त्याला औक्षण करते. दुसरीकडे भुवनेश्वरीने अधिपतीला ओवाळायचं म्हणून सगळी तयारी केलेय.  तिने सुद्धा अधिपतीसाठी गिफ्ट आणलंय. अधिपती भुवनेश्वरीचा आशीर्वाद घ्यायला येतो तेव्हा भुवनेश्वरी त्याला बघुन चिडते. आपल्या आधी अक्षराने त्याला ओवाळलं आणि अधिपतीने अक्षराने दिलेला शर्ट घातला हे बघून तिने आणणलेल्या गिफ्टला आग लावते.  भुवनेश्वरी रडायचं नाटक करते अखेर अधिपती अक्षराने दिलेला शर्ट काढतो. चारुहास अक्षराला येऊन सांगतो की भुवनेश्वरी तुमचा संसार कधीच सुखाने होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही दोघं ४-५ दिवस कुठेतरी बाहेर जाऊन या आणि त्याचवेळेस तुझ्या मनातलं प्रेम त्याच्याकडे व्यक्त कर. वाढदिवसाच्या निमिताने अधिपती शाळेत वृक्षारोपण करत असताना त्याच्या पायावर कुदळ लागते आणि अधिपतीला दुखापत होते. घरी वाढदिवसाची जंगी तयारी करणारी भुवनेश्वरी संतापते.  घराबाहेर पडायचं नाही हे सांगितलं असताना सुद्धा अक्षरा अधिपतीला बाहेर घेऊन जाते ह्याचा भुवनेश्वरीला राग येतो. अधिपतीच्या दुखापतीचं खापर ती अक्षरावर फोडते. अक्षराकडून अधिपतील वाढदिवसाचं एक खास गिफ्ट मिळणार आहे. आता काय आहे हे खास गिफ्ट? अधिपती अक्षरा एकमेकांजवळ येऊ शकतील ? जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

रविंद्र धंगेकरच पुण्याचे खासदार होतील! -माजी आमदार मोहन जोशी

पुणे – पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हेच खासदार होतील. एक्झिट पोलचे अंदाज चुकतील, असा

Read More
ENGLISH

Global Centenary Conference on Dr. B. R. Ambedkar’s Thesis, ‘The Problem of the Rupee’ at LSE London’.

The Global Centenary Conference on Dr. B. R. Ambedkar’s seminal Doctoral Thesis, “The Problem of the Rupee: Its Origin and

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या ‘द प्रॉब्लम ऑफ रूपी’ च्या शंभरी निमित्त लंडन येथे परिषद 

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ११ जून 1923 रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्समध्ये ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी :

Read More