Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले

मुंबई-पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.संजय राऊत यांना पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी 7.30 वाजता ईडीचे पथक पोहोचले. टीमने राऊत यांचा दादर येथील फ्लॅट सील केला आहे. हा फ्लॅट राऊत यांनी 83 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.

राऊत यांची तब्बल साडे सात तासांपासून चौकशी सुरू आहे. राऊत यांच्या खोलीचीही झडती घेण्यात आली. या टीममध्ये सुमारे 10 ते 12 अधिकारी असून त्यापैकी सात अधिकारी राऊत यांच्या घरी आहेत, तर उर्वरित त्यांच्या दोन जवळच्या मित्रांच्या घरी कारवाई करत आहेत. राऊत यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली आहे.

संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांची देखील चौकशी सुरू आहे. दादरमध्ये जप्त केलेला फ्लॅट आणि अलिबागमधील जमीन या संदर्भात आता ईडी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. जमीन आणि फ्लॅट हे वर्षा राऊत यांच्यावर नावावर असून, त्यापार्श्वभूमीवर त्यांची चौकशी सुरू आहे.

महाराष्ट्रातील 1034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची चौकशी करत आहे. त्याचबरोबर ईडी कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. राऊत यांना ताब्यात घेऊन येथे आणले जाण्याची शक्यता आहे.

राऊत यांना ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावले होते. ते अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाही. यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. संजय राऊत आणि त्यांचे आमदार बंधू सुनील राऊत हे दोघेही सध्या त्यांच्या भांडुप बंगल्यावर मैत्री येथे आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान 4 टविट केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असे टविट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading