ईडी मला अटक करणार मी झुकणार नाही मी सच्चा शिवसैनिक – खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत ‘झुकेंगे नही’, असं ईडीच्या कारवाईवर म्हटलं आहे. 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने त्यांच्या दादर येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. यानंतर त्यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले आहेत की, ‘तुम्ही त्या व्यक्तीला घाबरू शकत नाही, जो कधीही हार मानत नाही. झुकेंगे नही, असं ते म्हणाले आहेत.
राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, ”शिवसेनेला त्रास देण्यासाठी महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सर्व सुरु आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचा. मी लढणार, आम्ही लढू. महाराष्ट्र इतका कमजोर नाही आणि शिवसेनाही इतकी कमजोर नाही. खरी शिवसेना काय आहे, हे आज तुम्ही पाहत आहे.” मरेन पण संजय राऊत झुकणार नाही आणि पक्षही सोडणार नाही, असं ही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटालाही लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ”शिंदे गटाला लाज वाटली पाहिजे.”
आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते..
जो कभी हार नहीं मानता!
झुकेंगे नही!
जय महाराष्ट्र pic.twitter.com/lp7VXzqtmj— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
