Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

‘स्वरउन्मेष’मध्ये रसिकांनी अनुभवला युवाकालाकारांचा कलाविष्कार

पुणे : युवाकालाकारांच्या बहारदार गायनाने रंगलेली एक अनोखी सांगीतिक मैफल रसिकांनी शनिवारी अनुभविली. स्वर-सुरांच्या तालात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या रात्रीच्या मैफिलीत रसिक श्रोते भारावले होते.
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्यावतीने भारतीय शास्त्रीय संगीताचा उदय साजरा करण्यासाठी आणि तरुण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वरउन्मेष’ या दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

कार्यक्रमात पहिल्या दिवशी युवा गायक ईश्वर घोरपडे, रुजुता लाड आणि आदित्य मोडक यांनी गायन सादर केले. कार्यक्रमाची सुरवात ईश्वर घोरपडे याच्या गायनाने झाली. त्याने राग मियां की मल्हारमध्ये विलंबित आणि दृत एक तालातील ‘घुमड घुमडगरजे गरजे’ ही बंदिश सादर केली. त्यांना तबल्यावर प्रणव गुरव, हार्मोनियमवर अभिषेक शिनकर आणि तानपुरासाठी शिवानंद प्रधान व अभिषेक राजू यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमात दुसऱ्या सत्रात जयपूर घराण्याची गायिका रुजुता लाड यांनी गायन सादर केले. तिने राग नायक कनडामध्ये ‘मेरो पिया रसिया’ ही तीनातालातील बंदिश सादर केली. त्यानंतर काहेरवा तालातील ‘ कहनवा मानो’ ही ठुमरी सादर केली. तिला तबल्यावर प्रणव गुरव, हार्मोनियमवर अभिषेक शिनकर आणि तानपुरासाठी दुर्गा कविमंदन यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीचा समारोप आदित्य मोडक याच्या गायनाने झाला. त्याने राग मालकंसमध्ये विलानाबित तीलवाडा तालातील ‘पीर न जाने’ ही बंदिश सादर केली. दृत तीन तालातीला ‘राम भक्त हनुमान’ या रचनेच्या सादरीकरणाने त्याने कार्यक्रमाचा समारोप केला. त्याला तबल्यावर प्रणव गुरव, हार्मोनियमवर अभिषेक शिनकर आणि तानपुरासाठी वैभव देशपांडे व योगेश दिवे यांनी साथसंगत केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading