fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

लोकमान्य टिळकांना रंगावली व दिव्यांतून मानवंदना

पुणे : भारताच्या स्वातंत्र्याकरिता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच… अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्य टिळकांना भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १०१ दीप प्रज्वलित करुन त्यांच्या कार्याचे स्मरण देखील उपस्थितांनी केले.

निमित्त होते, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट, न-हे तर्फे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त साकारलेल्या भव्य रंगावलीचे. टिळकांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगणारी व सार्वजनिक गणेशोत्सवाची बीजे रुजविण्यात टिळकांचे असलेले योगदान दर्शविणारी ही रंगावली २० बाय २० फूट आकारामध्ये साकारण्यात आली. जाधवर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रंगावलीकार सुनील सोनटक्के व वैशाली सोनटक्के यांनी दोन तासांमध्ये ही रंगावली साकारली.

सुरेखा जाधवर म्हणाल्या, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सवातून समाजाला एकत्र केले. त्यातून स्वातंत्र्याचा लढा उभारता येतो, अशी प्रेरणा सामान्यांना दिली. त्यामुळे रंगावलीमध्ये गणेशोत्सव साकारत आणि १०१ दीप प्रज्वलित करुन त्यांना मानवंदना देण्यात आली. पुढील दोन दिवस ही रंगावली संस्थेच्या प्रांगणात पाहण्यासाठी सर्वांना खुली राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading