Saturday, July 4, 2026

ENTERTAINMENT

ENTERTAINMENTLatest News

पहिल्या दिवसाच्या शूटिंगमध्ये मला थोडी धाकधूक होती, कारण…- एकता लब्दे

अभिनेत्री एकता लब्दे हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, एकता ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत ‘शारदा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि निरागस व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या एकताने याआधीही अनेक भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ मधील शारदा ही समजूतदार, जबाबदार आणि कुटुंबासाठी स्वतःच्या भावनांनाही बाजूला ठेवणारी मुलगी असून, या भूमिकेद्वारे एकता प्रेक्षकांसमोर एका नव्या रूपात येत आहे. “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शारदा आहे. शारदा ही शांत आणि अबोल आहे. शारदा मनातलं मनात ठेवणारी, शांत आणि समजूतदार आहे, शारदाच्या भूमिकेसाठी मला बऱ्याच गोष्टी अॅडजस्ट कराव्या लागत आहेत, कारण माझे आणि शारदाचे स्वभावगुण खूपच वेगळे आहेत. शारदा कृष्णाईची सावली आहे. त्यामुळे तिला तिच्या दोन बहिणींचाही आईसारखाच सांभाळ करावा लागतो. याआधीची माझी भूमिका प्रेमळ होती, त्यामुळे मला ही भूमिका साकारताना थोडं सोपं जात आहे.  थोडासा कृष्णाईसारखा स्वभाव जुळवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. मला या भूमिकेसाठी कॉल आला होता आणि माझं ऑडिशन ठाण्यात झालं. मुळात त्यांना प्रेमळ, सौजन्यशील, साधी, सुंदर आणि समजूतदार असा चेहरा हवा होता. शारदाच्या भूमिकेसाठी मी त्यांना योग्य वाटले, याचा मला आनंद आहे. जेव्हा मला समजलं की ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये कृष्णाईच्या मुलीच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली आझाली आहे, ते ऐकून मला फार आनंद झाला. खूप महिन्यांनंतर मी पुन्हा कॅमेरा फेस करत होते. शूटिंगचा पहिला दिवस खूप छान होता. अभिनय ही माझी आवड आहे. आज माझ्याकडे काम आहे. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. फार कमी लोकांना असं भाग्य लाभतं. पहिल्या दिवसाच्या शूटिंगमध्ये मला थोडी धाकधूक होती, कारण या भूमिकेसाठी कोल्हापूरकडची भाषा वापरायची होती, माझी या आधीची भूमिका वेगळ्या ढंगाची होती. मुळात मी कोकणातील असल्यामुळे मला भाषेवर काम करावे लागले. मी स्थानिक लोकांचे निरीक्षण मी करत असते. मला फक्त भाषेचं टेन्शन होतं की मी योग्य बोलते आहे का. पण सेटवर सगळे कलाकार आणि दिग्दर्शक इतके कमाल आहेत की ते सगळं समजावून सांगतात आणि सांभाळून घेतात. मुंबईच्या बाहेर शूटिंग करणं माझ्यासाठी कठीण आहे. कुटुंबाला सोडून शूटिंगसाठी मुंबईबाहेर राहणं अवघड वाटत. पण सुरुवातीचं शूटिंग साताऱ्यात होत  आणि सुदैवाने माझी टीम खूप चांगली आहे. आमचं प्रॉडक्शन हाऊस खूप सपोर्टिव्ह आहे आणि सहकलाकारही कमाल आहेत. त्यामुळे मुंबईबाहेर राहून शूटिंग करणं  सोपं  वाटलं . सहकलाकार आणि टीम उत्तम आहेत. माझं, नारायणीचं आणि ट्विंकलचं खूप कमी वेळात छान बॉण्डिंग झालं आहे. मी आणि नारायणी आधीपासून एकमेकींना ओळखत होतो. आम्ही तिघी सेटवरही सख्या बहिणींप्रमाणे वावरतो. निवेदिता ताई आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतात.  पहिल्या दिवशी मला खूप टेन्शन होतं की माझ्यामुळे सीनचे रिटेक्स नको व्हायला. पण सगळे खूप समजूतदार आहेत. मुंबईबाहेर शूट असल्यामुळे एकत्र राहिल्यामुळे आमची खूप छान टीम तयार झाली आहे. निवेदिता ताई कृष्णाईची भूमिका साकारणार आहेत हे कळल्यावर माझा आनंद अनावर झाला होता. मला निवेदिता सराफ, अश्विनी भावे आणि अलका कुबल या मराठीतील दिग्गज अभिनेत्री खूप आवडतात. मराठीत निवेदिता ताई आणि हिंदीत नीतू सिंग या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यांचे चित्रपट पाहत मी लहानाची मोठी झाले. अभिनय करण्यासाठी प्रेरणा मला त्यांच्या भूमिकांमधून मिळाली आहे.निवेदिता ताई स्वभावाने खूप छान आहेत. मी त्यांच्यासोबत सातारा एक्सप्लोर केल आहे. एक दिवस शूटिंगला सुट्टी होती, तेव्हा आम्ही एकत्र फिरलो, शॉपिंग केलं आणि खूप छान वेळ घालवला. एवढ्या उंचीवर पोहोचूनही इतकं सौजन्यशील, समजूतदार आणि प्रेमळ राहणं हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. शारदाची भूमिका साकारताना मी निवेदिता ताईंकडून भरपूर काही शिकून घेणार आहे. आम्ही कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळे त्या आमची अगदी आईसारखी काळजी घेतात. ‘कृष्णाईच्या लेकी’ ही अशा स्त्रियांची आणि मुलींची गोष्ट आहे ज्या आयुष्यात आलेल्या संकटांवर आणि दुःखांवर मात करून जिद्दीने पुढे जात राहतात. कृष्णाईच्या तिन्ही लेकी खूप खास आहेत. एक बेधडक आहे, एक खेळाडू आहे आणि एक खूप जबाबदार, आईला व बहिणींना सांभाळणारी आहे आणि तुम्हाला यांचा हा प्रवास पाहायला नक्की मज्जा येणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘कृष्णाईच्या लेकी’, १५ जूनपासून दररोज संध्या ७ वा., सदैव तुमच्या झी मराठीवर.

Read More
ENTERTAINMENTLatest News

भिलवडीशी असलेल्या नात्यामुळे गौरीचं पात्र मनापासून जवळचं वाटलं – ट्विंकल यादव

झी मराठीच्या नव्याने दाखल होणाऱ्या ‘कृष्णाईच्या लेकी’, या मालिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव ही ‘गौरी’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. कृष्णाईच्या

Read More
ENTERTAINMENTLatest News

रोहित परशुरामचा नवा प्रवास ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साकारणार दमदार भूमिका

अप्पी आमची कलेक्टर मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता रोहित परशुराम पुन्हा एकदा झी मराठी वर पुनरागमन

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

कोल्हापूर  : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

Read More
ENTERTAINMENTLatest News

शर्वरी आणि वेदांगच्या ‘मस्कारा’ने इंटरनेटवर घडवला व्हायरल जलवा

  इम्तियाज अली दिग्दर्शित मैं वापस आऊंगा या चित्रपटातील प्रेमगीत मस्कारा ने प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप पाडली असून हे गाणं

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

पुणे माझी कर्मभूमी; पुरस्कार कौतुकाची थाप : अमृता खानविलकर

पुणे : पुणे ही माझी कर्मभूमी आहे. मी पुण्यात आले नसते तर कलेच्या क्षेत्रातही आले नसते. यासाठी पुणेकरांना मानाचा मुजरा करते.

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

16 बा पुणे लघुपट महोत्सव 7 जून रोजी

पुणे : नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञान साठी व्यासपीठ म्हणून आयोजित करण्यात येणारा पुणे लघुपट महोत्सव यंदा सात जून रोजी आयोजित

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

दिवस तिसरा – श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सव

  पुणे – नृत्याविष्कार आणि आशयघन नाट्याविष्कार, हे श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. बोल सखी या

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

निर्माता गटात आठ, दिग्दर्शक गटातून नऊ उमेदवार ! अभिनेता गटात पाच जणांमध्ये लढत !

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सात जून २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

करमणुकीच्या पलीकडे नेणार्या कलात्मक रंगभूमीची दिशा अपेक्षित

  श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवात ‘मराठी रंगभूमी – काल, आज, उद्या’ या विषयावरील परिसंवादात उमटला सूर पुणे  – मराठी

Read More
BusinessENTERTAINMENTLatest NewsTECHNOLOGY

अग्रगण्य व्‍हीएफएक्‍स स्टुडिओ फिल्‍मसीजीआयची व्‍हीएएम आणि स्क्रीन अवॉर्ड्समध्ये मोठी झेप; ‘धुरंधर’ चित्रपटासाठी दिले १००० पेक्षा जास्त शॉट्स

  पुणे : पुणे-स्थित व्‍हीएफएक्‍स स्‍टुडिओ फिल्‍मसीजीआय या भारतातील अग्रगण्य अॅनिमेशन व व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ आणि टीपीएन गोल्ड-प्रमाणित कंपनीने ‘धुरंधर’

Read More
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

एआयचा विपरीत परिणाम रंगभूमीवर होणार नाही; नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल या ज्येष्ठ रंगकर्मींनी व्यक्त केला विश्वास

पुणे – कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितीही शिरकाव झाला, तरी रंगभूमीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त

Read More
ENTERTAINMENTLatest News

सायली संजीव च्या ‘जनक’ चित्रपटाचे चित्रीकरण अवघ्या १९ दिवसांत पूर्ण!

गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून जागतिक स्तरावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. या

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNETOP NEWS

निळू फुले यांच्या हाती घ्याल ते तडीस न्या या शिकवणीने दिली पुढे जाण्याची ऊर्जा – अमृता सुभाष

पुणे : हाती घ्याल ते तडीस न्या, ही जेष्ठ अभिनेते निळू फुले यांनी दिलेल्या शिकवणूक आपण कायम लक्षात ठेवल्यामुळे आपल्याला

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

‘अंतर्नाद’च्या प्रयोगाने रंगभूमीवर उभा केला भक्तिरसाचा जिवंत वारीसोहळा

पुणे  : भाऊसाहेब भोईर यांच्या ‘मोरया थिएटर्स’ निर्मित ‘अंतर्नाद – अ जर्नी टू द सोल’ या संगीत नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाने

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार जाहीर

पुणें :  बेलवलकर सांस्कृतिक मंच व निळू फुले कुटुंबीय  यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार यावर्षी

Read More
ENTERTAINMENTLatest News

स्टार प्रवाहच्या आनंदी मालिकेत धमाकेदार वळण

स्टार प्रवाहच्या आनंदी मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आनंदी आणि युगंधर यांचं लग्न पार

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना.

सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. पण याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकारांचा सन्मान करण्याची परंपराही या कार्यक्रमाने जपली आहे. येत्या भागात ‘देऊळ बंद २’ चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर उपस्थित राहणार आहे. या विशेष भागात मराठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘सोनी मराठी’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तर्फे मान वंदना देण्यात आली. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील मोहन जोशी आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या प्रभावी भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जेव्हा जेव्हा उद्योगातील ज्येष्ठ कलाकार उपस्थित राहतात, तेव्हा त्यांचा सन्मान करण्याची परंपरा कार्यक्रमाने कायम ठेवली आहे. याच परंपरेचा भाग म्हणून निर्माता-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी ‘सोनी मराठी’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या वतीने मोहन जोशी यांचा विशेष सत्कार केला. यावेळी हास्यजत्रेची संपूर्ण टीम आणि सर्व कलाकार मंचावर उपस्थित होते. सर्व कलाकारांनी मानाचा मुजरा करत मोहन जोशी यांना अभिवादन केले. यावेळी भावना व्यक्त करताना मोहन जोशी म्हणाले, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा एक अल्टिमेट कार्यक्रम आहे. इथले सगळे कलाकार एकापेक्षा एक आहेत. उत्तम कलाकार, उत्तम लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे देखील तितकेच दिग्गज आहेत. हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आणि या कार्यक्रमाला कधीच पर्याय नाही, हे नक्की.” हास्य, धमाल आणि भावनांनी भरलेला हा विशेष भाग पाहायला विसरू नका — ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, येत्या सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.  

Read More
ENTERTAINMENTLatest News

एकाच भूमिकेसाठी शिकाव्या लागल्या अनेक भाषा- पायल जाधव

‘तारिणी’ मालिकेत आता एका नव्या आणि रहस्यमय पात्राची एन्ट्री झाली आहे. हरप्रीत कौर चढ्ढा ही मुलगी नक्की कोण, या प्रश्नाचे उत्तर आता

Read More