गणेश आगमनाचा लोभस प्रोमो चर्चेत; ‘आई तुळजाभवानी’मध्ये एआय – व्हीएफक्सची कमाल
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानीच्या गणेश आगमनाच्या प्रोमोची सध्या विशेष चर्चा सर्वत्र सुरू आहे, या प्रोमोत दिसणारे गजमुख हुबेहुब साकारले असून या गणेशाची हलणारी सोंड आणि सोंडेचा वापर करून गणेशाने ग्रहण केलेले मोदक हा भाग खास जमून आला असून तंत्रज्ञानाची ही कमाल प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. नक्की पहा, ‘आई तुळजाभवानी’, ‘चातुर्मास पर्व’ दररोज, रात्री ८.५० वा. फक्त कलर्स मराठीवर
आई तुळजाभवानी ही मालिका व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार सातत्याने घडवत असून टेलिव्हिजन विश्वातले अनेक नवे तांत्रिक चमत्कार या मालिकेने घडवले आहेत. एआयच्या माध्यमातून व्यक्तिरेखा साकारणे,प्रत्यक्ष कलाकार आणि एआय व्यक्तिरेखा यांच्यात संवाद घडवून व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करत पूर्ण लांबीचा प्रसंग उभा करण्याचे मराठी टेलिव्हिजन मधले पहिले आणि एकमेव यशस्वी उदाहरण आई तुळजाभवानी मालिकेने नुकतेच पूर्ण केले होते. तसेच पौराणिक दैवी गोष्टी एआयच्या माध्यमातून साकार करून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात ही मालिका यशस्वी ठरली आहे. आता अत्यंत लोभस विलोभनीय गजमुख, एआय तंत्रज्ञानाचा वापर करत तयार करून आई तुळजाभवानी मालिकेने व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा नवा मानंदंड निर्माण केला आहे.
पहिल्या भागपासून आता ६८० हून अधिक भाग, आई तुळजाभवानी ही मालिका तिच्या व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक वापरासाठी ओळखली जाते. याचे श्रेय मालिकचे व्हीएफक्स दिग्दर्शन करणाऱ्या फ्लेमिंगोज व्हीएफक्स या निर्मिती संस्थेला जाते ज्यांनी विक्रम वेधा, राधा रमण यांसारख्या चित्रपटांचे, ‘असुर’, ‘फर्जी’, ‘ताज’, ‘सिटाडेल’ आणि ‘गन्स अँड गुलाब्स’ यांसारख्या वेबसिरीजचे आणि ‘स्वराज’, ‘इमली’, ‘नजर’, ‘जादू है जिन्न का’ आणि ‘विद्रोही’ यांसारख्या हिंदी मालिकांचे VFX चे काम केले आहे. मराठीतील ही त्यांची पहिली मालिका आहे.
गजमुखाच्या निर्मितीबद्दल मालिकेचे व्हीएफक्स दिग्दर्शक प्रदीप भगत म्हणाले, *“आई तुळजाभवानी ही आमचे कुलदैवत असलेल्या देवीवर आधारित मालिका असल्यामुळे हा प्रकल्प आमच्यासाठी केवळ व्यावसायिक काम नाही, तर श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. या मालिकेत सातत्याने व्हीएफक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करत देवीचे तेज, तिचे दैवी स्वरूप आणि तिच्या कथांचा प्रभावी अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्यासाठी हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देवीची भक्ती करण्यासारखेच आहे.
गणेश आगमनाचा प्रसंगही आमच्यासाठी अत्यंत विशेष होता. गजमुखाचे रूप प्रेक्षकांना जिवंत, लोभस आणि नैसर्गिक वाटावे, यासाठी त्याच्या रचनेपासून सोंडेच्या हालचालींपर्यंत प्रत्येक तपशीलावर बारकाईने काम करण्यात आले. एआयच्या माध्यमातून विविध रूपे तयार करून त्यातील योग्य रूप निवडण्यात आले आणि व्हीएफक्सच्या सहाय्याने त्याला जिवंतपणा देण्यात आला.
विशेषतः गणेशाने सोंडेच्या सहाय्याने मोदक ग्रहण करण्याचा प्रसंग नैसर्गिक आणि विश्वासार्ह दिसावा, यासाठी अत्यंत मेहनत घेण्यात आली. एआयची कल्पकता आणि व्हीएफक्सचे तांत्रिक कौशल्य यांचा योग्य संगम साधत हे लोभस गजमुख साकारण्यात आले आहे. प्रेक्षकांना केवळ एक दृश्य नव्हे, तर गणेश आगमनाचा प्रत्यक्ष दैवी अनुभव मिळावा, हाच आमचा प्रयत्न आहे.”
आई तुळजाभवानी मालिकेत बालगणेशाचा हा गोड प्रवेश आणि त्यानंतर घडणाऱ्या रंजक घडामोडी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार असून, मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता यामुळे आणखी वाढली आहे. तुळजापुरात बालगणेशाचे खट्याळ आगमन तर होणारच आहे पण कथेत देखील अजून तंत्रज्ञानाचा कोणता नवीन आविष्कार बघायला मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा, ‘आई तुळजाभवानी’, ‘चातुर्मास पर्व’ दररोज, रात्री ८.५० वा. फक्त कलर्स मराठीवर.
