कृष्णजन्माचा जल्लोष… गुन्हेगारांचा हाहाकार! साक्षात ब्रह्मांडनायकाच्या अपहरणाने अक्कलकोट हादरणार!!
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत कृष्णजन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे परंतु याक्षणी काहीतरी अघिटत घडणार आहे. भक्तीचा जल्लोष… दिव्य प्रकाशाने उजळलेलं स्वामी स्थान… आणि त्याच क्षणी सुरू होणार एक अशी घुसळण, जी अक्कलकोटच्या प्रत्येकाच्या आयुष्याला हादरवून सोडणार आहे! कृष्णजन्माच्या पूर्वसंध्येला स्वामी स्वतः दही घुसळून लोणी काढतात. पण या साध्या कृतीमागे दडलेला संकेत काय? बासरीच्या सुरांनी स्वामी स्थानात अवतरते एक अद्भुत दिव्यता… गाई-वासरांचे आवाज, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि स्वामींच्या भोवतीची दिव्य प्रभा पाहून भक्त भारावून जातात. मात्र स्वामींच्या शब्दांतून एक गूढ इशारा मिळतो “कृष्णजन्मोत्सव हा आनंदाचा सण आहेच, पण शिकवणीचाही सण आहे.” आणि मग सुरू होते कर्माची घुसळण. कृष्णजन्माचा पवित्र क्षण! पाळण्यात विराजमान होतो बाळकृष्ण. पंचामृताचा अभिषेक होतो. आरतीचे सूर घुमतात. संपूर्ण स्वामी स्थान भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघतं. पण अचानक…“कृष्णाची गोकुळातून मथुरेला जायची वेळ झाली!” स्वामींच्या या अनपेक्षित उद्गाराने सगळेच चकित होतात. क्षणात स्वामी स्थानातील सगळे दिवे आणि मशाली विझतात! अंधार… गोंधळ… किंकाळी…आणि त्या काळोखात ऐकू येते इराची आर्त किंकाळी! दिवे पुन्हा लागतात… पण इरा गायब! आणि स्वामींचे देखील अपहरण झाले आहे असे कळते. आता पुढे घडणार ? पहा, ‘जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.१० वा. फक्त कलर्स मराठीवर.
गोवर्धन आणि सुलभा वेड्यासारखे इराचा शोध घेतात. आणि तेवढ्यात सुंदरा स्वामींच्या आसनाकडे पाहते…स्वामीही गायब! एकाच वेळी इरा आणि स्वामी कुठे गेले? हा योगायोग आहे? सावळ्याचा डाव आहे? की स्वामींच्या आधीच आखलेल्या एखाद्या अद्भुत लीलाची ही सुरुवात आहे? कारण ज्यांना वाटतंय की ते इराचं अपहरण करणार आहेत, त्यांनाच कदाचित स्वामी एका मोठ्या खेळात ओढून घेत आहेत! कृष्णाने कंसाच्या कारागृहातून जन्म घेतला आणि अत्याचाराच्या साम्राज्याला आव्हान दिलं… आता अक्कलकोटमध्येही एका नव्या संघर्षाची सुरुवात झाली आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न एकच— खरंच साक्षात ब्रह्मांडनायक स्वामींचं अपहरण झालंय… की स्वामीच गुन्हेगारांना त्यांच्या कर्माच्या जाळ्यात ओढून घेऊन गेले आहेत? कृष्णजन्माष्टमीच्या या जल्लोषात उलगडणार आहे एक थरारक, अद्भुत आणि रहस्यमय अध्याय!
एकीकडे दरोडेखोर सावळ्या आणि सदानंद व्यापाऱ्यांच्या वेशात अक्कलकोटमध्ये घुसण्याचा डाव आखतात. पण स्वामींच्या अक्कलकोटमध्ये गुन्हेगारांचा हा डाव इतका सहज यशस्वी होणार का? क्षणार्धात सावळ्या पकडला जातो, तर सदानंदच्या पायात अचानक साखळदंड अडकतो. पळून जाणारा सावळ्या खरोखर सुटतोय की नियतीच्या आणखी मोठ्या जाळ्यात अडकतोय? दरम्यान, स्वामी स्थानावर एकापाठोपाठ एक गूढ संकेत दिसू लागतात. माठावर उमटतं गोवर्धनचं नाव… त्यानंतर इराचं… आणि शेवटी सावळ्याचं! नेमका या तिघांचा काय संबंध? गोवर्धनच्या घरात अचानक दिसणारं एक गूढ शस्त्र… आणि हात लावण्याआधीच त्याचं होणारं रहस्यमय अदृश्य होणं… ही केवळ सुरुवात आहे की येणाऱ्या संकटाची चाहूल?
पहा… कारण यावेळी अक्कलकोटमध्ये संकट गुन्हेगारांवर आहे… की खुद्द गुन्हेगारांचाच वापर करून स्वामी काही मोठं घडवणार आहेत?
