राष्ट्रीय हॉकीपट्टू इक्रम खान यांना ‘मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अवॉर्ड प्रदान
पुणे : राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय हॉकीपट्टू ,विद्यापीठ स्तरावर हॉकीमध्ये विशेष कामगिरी असणारे ,जावेलीनमध्ये सुवर्ण पदक पटकावणारे ,नुकतेच ढाका येथे गोल्फ आंतरराष्ट्रीय चषक घेणारे ,महाराष्ट्र हॉकी संघाचे अध्यक्ष व विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आंतरराष्ट्रीय हॉकीपट्टू इक्रम खान यांची प्रतिष्ठेच्या ‘मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अवॉर्ड २०२६’साठी निवड करण्यात आली .त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
रायझिंग स्पोर्ट्स फाउंडेशन आणि साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व अनुकरणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.पुरस्कारासाठी प्राप्त नामांकनांची ज्युरीकडून काटेकोर छाननी करण्यात आली. त्यानंतर ज्युरीच्या शिफारशीनुसार इक्रम खान यांची पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्यात आली.व त्यांना आज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
इक्रम खान यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्फमध्ये केलेल्या कामगिरीमुळे पुण्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे .
पुरस्कार सोहळा आज सकाळी साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल, सेक्टर ६, स्पाइन रोड, मोशी-प्राधिकरण, पुणे येथे पार पडला.या वेळी इक्रम खान यांचा ‘मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अवॉर्ड २०२६’ने गौरव करण्यात आले .
मेजर ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याने इक्रम खान यांनी आंनद व्यक्त करी आता आमची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले तसेच भविष्यात या पुरस्काराची मान आणखी उंचावेल अशी कामगिरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
या कार्यक्रमाला साधू वासवाणी इंटरनॅशनल स्कूल, मोशीच्या प्राचार्या आरती पाटील, स्कूलचे व्यवस्थापक सुधाकर विश्वनाथ,लेफ्टनंट कर्नल दीपक रावत, आंतरराष्ट्रीय हॉकी पंच सतिंदर सिंग वालिया, आंतरराष्ट्रीय हॉकी पंच व प्रशिक्षक श्रीमती लीला वालिया तसेच रायझिंग स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव श्रीधरन थंबा यांची प्रमुख उपस्थिती होती.
