Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

आजी केअर तर्फे कल्याणी नगरमध्ये ४९ खाटांच्या सर्वात मोठ्या ‘असिस्टेड लिव्हिंग सेंटर’ चे उद्घाटन

पुणे  : मुंबई, पुणे आणि गोवा येथे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित आजी केअर या संस्थेने नुकतेच पुण्यातील कल्याणीनगर येथे आपल्या सहाव्या असिस्टेड लिव्हिंग सेंटरचे (निवासी सहाय्यक केंद्र ) आणि पुण्यातील दुसऱ्या केंद्राचे उद्घाटन केले. हे नवीन केंद्र भारतातील वाढत्या ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येसाठी संवेदनशील, सर्वसमावेशक आणि सन्मानपूर्वक काळजी घेणारे वातावरण निर्माण करण्याच्या आजी केअरच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

४९ खाटांची क्षमता असलेल्या आणि विशेषतः उभारण्यात आलेल्या सात मजली इमारतीत हे नवे केंद्र आजी केअरचे आजपर्यंतचे सर्वात मोठे केंद्र आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बदलत्या शारीरिक, वैद्यकीय, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊन या केंद्राची विशेष रचना करण्यात आली आहे. येथे विविध प्रकारच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृद्धांच्या गरजांमधील बदलांनुसार त्यांना सातत्यपूर्ण आधार मिळणे शक्य होईल.

या केंद्राचे उद्घाटन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक डॉ. विठ्ठल कामत तसेच लेखक आणि सामाजिक विचारवंत अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन समारंभाला डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक , सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींसह १७५ हून अधिक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading