अस्सल कथाकथनाच्या माध्यमातून लोकप्रिय झी टीव्ही मालिकांमध्ये गूगल सर्चच्या एआय मोडच्या एकीकरणासाठी ‘झी’ आणि ‘गूगल’ यांचा संयुक्त उपक्रम
~ या उपक्रमाअंतर्गत झी टीव्ही मालिकांतील व्यक्तिरेखा‘दिलफ्लुएन्सर्स’च्या रूपात एआयचा नाविन्यपूर्ण आणि अभिनव पद्धतीने वापर करत अधिक स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण दैनंदिन निर्णय घेण्याचा मार्ग दाखवणार आहेत. ~
भारतभरात काही सर्वांत अर्थपूर्ण नाती कहाण्यांमधून निर्माण होतात. टेलीव्हिजनवरील मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. या मालिकांमधील महत्त्वाकांक्षी व्यक्तिरेखांची स्वप्ने, संघर्ष आणि जीवनप्रवास अनेकदा प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. प्रेक्षक आणि कथाकथन यांच्यातील याच अनोख्या नात्यामुळे झी आणि गूगल यांनी एकत्र येत भारतात प्रथमच फिक्शन आधारित एआय सर्च एकीकरणाची सुरुवात करत आहेत. या उपक्रमाद्वारे झी टीव्हीची लोकप्रिय मालिका ‘गंगा माई की बेटियॉं’ यांच्या कथाविश्वात गूगल सर्च एआय मोडला समाविष्ट करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुरू होणारा हा उपक्रम पारंपरिक ब्रँड प्लेसमेंटच्या चौकटीपलीकडे जात गूगल सर्च एआय मोडला मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखांच्या प्रवासाचा नैसर्गिक भाग बनवणार असून त्यामुळे कथाकथन सहज बनेल. दैनंदिन जीवनातील आपलेसे वाटणारे क्षण आणि सर्वसामान्यांच्या समस्या यांमध्ये गूगल सर्च एआय मोड त्याला विचारलेले गुंतागुंतीचे प्रश्न कसा समजून घेतो आणि आत्मविश्वासाने निर्णय घेण्यासाठी त्यांना हवी असलेली माहिती शोधण्यास कसा मदत करतो याचा अनुभव मिळणार आहे.
या सहकार्यामध्ये झीच्या ‘दिलफ्लुएन्सर मोमेंट्स’ या विशेष संकल्पनेचा फायदा उठवण्यात आला आहे, जो एक अनोखा उपक्रम असून यात ब्रँडची तत्त्वे वास्तविक तसेच नैसर्गिक कथाकथनात गुंफत विविध स्क्रीन्स आणि फ़ॉर्मेट्सवर प्रेक्षकांशी अधिक प्रभावी संवाद साधला जातो. प्रेक्षकांचा सर्वाधिक भावनिक संबंध त्यांच्या विश्वासातील कथा, पात्रे आणि प्रसंगांशी निर्माण होतो आणि याच विश्वासावर आधारित ‘दिलफ्लुएन्सर मोमेंट्स’ ब्रँड्सना कथानकाचाच अर्थपूर्ण भाग बनण्याची संधी देतात . याची सुरुवात झी टीव्हीच्या विश्वासार्ह काल्पनिक मालिका विश्वातून होत असून त्याचा विस्तार विविध संपर्क माध्यमांपर्यंत केला जातो. या सहकार्यामध्ये गूगल सर्चचा एआय मोड हा अशाच प्रसंगांचा नैसर्गिक भाग म्हणून समोर येतो आणि कथानकातील व्यक्तिरेखा विविध आव्हानांचा सामना करताना, नवीन शक्यता शोधताना आणि पूर्ण माहितीसह निर्णय घेताना त्यांना मार्गदर्शन करतो. हे सर्व कथेशी सुसंगत आणि नैसर्गिक वाटेल अशा पद्धतीने सादर करण्यात आले आहे.
या भागीदारीचा भाग म्हणून झी आणि गूगल यांनी ‘गंगा माई की बेटियां’ मालिकेत ‘स्नेहा’ची भूमिका साकारणाऱ्या अमनदीप सिद्धूचा सहभाग असलेली एक विशेष ब्रँड फिल्मही सादर केली आहे. पडद्यामागील सहज आणि नैसर्गिक दृश्यांवर आधारित असलेल्या या फिल्मची सुरुवात अमनदीप आणि तिची मेकअप आर्टिस्ट आरती (राजसी भावे) यांच्यातील साध्याशा संवादाने होते. जेव्हा आरती स्वतःचे ब्युटी सलून सुरू करण्याचे तिचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघणार असल्याचे सांगते, तेव्हा अमनदीपला आश्चर्य आणि उत्सुकता वाटते. जशी त्यांची बातचीत पुढे सरकते तसे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले अनेक प्रश्न, अनिश्चितता आणि महत्त्वाचे निर्णय तिने कशा प्रकारे हाताळले याबद्दल आरती सांगते. या संपूर्ण प्रवासात तिच्यासोबत एक विश्वासार्ह मार्गदर्शक होता गूगल सर्च एआय मोड. उबदार, सहज आणि प्रेरणादायी संवादाद्वारे ही फिल्म एआय मोड संदर्भ कशाप्रकारे समजून घेतो, जटिल परिस्थिती सोपी कशी करतो आणि लोकांना हवी असलेली माहिती मिळवून देण्यासाठी कसा मदत करतो हे प्रभावीपणे दाखवून देते.
या मोहिमेच्या “गूगल सर्च का नया एआय मोड, समझे, समझाए और राह दिखाए” संकल्पनेवर आधारित हा उपक्रम गूगल सर्च एआय मोड पारंपरिक आणि विश्वासार्ह सर्च अनुभवाला अधिक संवादात्मक स्वरूप कसा प्रदान करतो हे दर्शवतो. ब्रँड फिल्मद्वारे या संकल्पनेची ओळख प्रेक्षकांना करून दिल्यानंतर, ही कथा ‘तुम से तुम तक’ आणि ‘गंगा माई की बेटियाँ’ या मालिकांच्या आगामी भागांमधून पुढे नेली जाणार आहे. या भागांमध्ये प्रेक्षकांना एआय मोड पात्रांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रभावी भूमिका बजावताना पाहायला मिळेल. पात्रांच्या गरजा आणि परिस्थिती समजून घेणे, विविध पर्यायांचा विचार करण्यास मदत करणे आणि अधिक स्पष्टता व आत्मविश्वासाने योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करणे अशा स्वरूपात त्याचा उपयोग दाखवला जाणार आहे. आगामी कथानकांमधून गूगल सर्चचा नवीन एआय मोड वापरकर्त्यांच्या गरजा खऱ्या अर्थाने कशा समजून घेतो आणि त्यांना पुढील दिशा कशी दाखवतोहे प्रेक्षकांना अनुभवता येईल. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना, द्विधा मनःस्थितीतून मार्ग काढताना आणि दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना तो या पात्रांचा सहजसोपा आणि विश्वासू साथीदार बनलेला दिसणार आहे.
या फिल्मचा शेवट अमनदीप थेट प्रेक्षकांशी संवाद साधत आणि त्यांना गूगल सर्चच्या एआय मोडचा स्वतः अनुभव घेण्याचे आमंत्रण देत होतो. ही फिल्म मालिकांमधील व्यापक कथानकात्मक एकत्रीकरणाकडे नेणारा एक महत्त्वाचा दुवा ठरते. ज्यामध्ये प्रेक्षकांना गूगल सर्चचा एआय मोड केवळ आगामी कथानकांमध्येच नव्हे, तर झी टीव्हीच्या विविध मालिकांमधील विस्तारित कथाविश्वातही नैसर्गिकरीत्या गुंफलेला पाहायला मिळणार आहे.
या सहकार्याविषयी बोलताना गूगल इंडियाच्या प्लॅटफॉर्म्स अँड इकोसिस्टिम्स, कन्झ्युमर मार्केटिंगच्या डायरेक्टर कनिका कालरा म्हणाल्या , “एआय मोडच्या सादरीकरणासह, भारतीय ग्राहकांसाठी ‘सर्च’ काय करू शकते याची आम्ही नव्याने व्याख्या करत आहोत. प्रगत विचारप्रक्रिया, तर्कशक्ती आणि वैयक्तिक गरजांनुसार अनुभव देण्याची क्षमता थेट सर्चमध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. झी हे आमचे भागीदार असल्यामुळे गूगल सर्चची एआय-आधारित बुद्धिमत्ता नाट्यविश्वात आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.”
या भागीदारीबद्दल बोलताना झील (ZEEL) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (जाहिरात महसूल) संदीप मेहरोत्रा म्हणाले , “आज जाहिरातदारांना केवळ दृश्यमानता पुरेशी वाटत नाही, तर ग्राहकांशी त्यांच्या विश्वासाच्या वातावरणात अर्थपूर्ण नाते जोडण्याचे प्रभावी मार्गही हवे असतात. गुगल सर्च एआय मोडसोबतची ही भागीदारी मनोरंजनाच्या माध्यमातून असे नाते कसे निर्माण करता येते याचे उत्तम उदाहरण आहे. प्रेक्षक ज्या कथांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत, त्या कथानकांमध्ये ब्रँड्सना नैसर्गिक पद्धतीने समाविष्ट करून हा संवाद अधिक प्रभावी बनवता येतो. ‘दिलफ्लुएन्सर मोमेंट्स’च्या माध्यमातून आम्ही विपणन क्षेत्रासाठी कथाकथनावर आधारित नवे आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करत आहोत. ही भागीदारी दर्शवते की तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादनदेखील कथानकात सहजपणे गुंफता येते आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर उपयुक्तता, सुसंगतता आणि प्रेक्षकांचा सहभाग वाढवता येतो.”
या घोषणात्मक फिल्मबद्दल बोलताना झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचे मुख्य विपणन अधिकारी (CMO) कार्तिक महादेव म्हणाले, “सर्वांत प्रभावी ब्रँड समावेश तेच असतात, जे कथानकाचा अविभाज्य भाग बनतात आणि त्यातील पात्रांसोबत नैसर्गिकरित्या पुढे सरकतात. गुगल सर्चच्या एआय मोडसोबत आम्ही नेमके हेच साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा पहिला चित्रपट आगामी उपक्रमांची दिशा निश्चित करणारा ठरेल. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झी टीव्हीच्या ‘दिलफ्लुएन्सर’ स्नेहासोबत ही फिल्म सादर करण्यात आली आहे. या कथेतून स्वातंत्र्य या संकल्पनेला आधुनिक आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, जो केवळ एखाद्या विशेष दिवसापुरता मर्यादित न राहता दीर्घकाळ सुसंगत राहू शकतो. झीमध्ये आमची पात्रे आणि कथाकथनाची शैली मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती आणि भावनिक नाते निर्माण करण्याची क्षमता ठेवते. ‘दिलफ्लुएन्सर मोमेंट्स’ या प्रभावाचा उपयोग करून एक पाऊल पुढे जाते. याच्या माध्यमातून प्रेक्षकांना नव्या शक्यता शोधण्यास, नव्या सवयींबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यास आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षणांना अर्थपूर्ण अनुभवांमध्ये रूपांतरित करण्यास मदत होते.”
टेलिव्हिजनच्या व्यापक पोहोच, प्रभावी कथाकथनातून निर्माण झालेला प्रेक्षकांचा विश्वास आणि गुगल सर्चच्या एआय मोडच्या विकसित होत असलेल्या क्षमतांची सांगड घालत झी आणि गूगल प्रेक्षकांना नवकल्पनांचा अनुभव देण्याचे नवे मार्ग निर्माण करत आहेत. परिचित, सुसंगत आणि सहज जोडल्या जाणाऱ्या कथांच्या माध्यमातून प्रेक्षकांना ही तंत्रज्ञानाधारित नवी दुनिया अनुभवता येणार आहे. तसेच, मनोरंजनाच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर यांच्यातील दरी कमी करण्याची क्षमता अधोरेखित करणारे हे सहकार्य ठरत आहे.
