Friday, September 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ : आपल्या नवीन भव्य पर्वासह पुन्हा येत आहे;

झी टीव्हीने आज मुंलोकप्रिय आणि प्रतिष्ठित गायन रिअॅलिटी शो ‘सा रे ग म प’ च्या नवीन पर्वाची घोषणा केली. संगीताचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ या संकल्पनेवर आधारित या नवीन पर्वाची झलक यावेळी माध्यमांना दाखवण्यात आली. तसेच, अत्याधुनिक व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) अनुभवाच्या माध्यमातून ‘सा रे ग म प 2026’ च्या भव्य आणि आकर्षक नव्या सेटचे प्रथम दर्शनही घडवण्यात आले. ह्या शो चा प्रीमियर 19 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून हा कार्यक्रम दर शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता झी टीव्ही आणि हिंदी झी5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जवळपास तीन दशकांची समृद्ध परंपरा, अस्सल संगीत आणि विलक्षण गायक प्रतिभेला व्यासपीठ देण्याचा वारसा जपणाऱ्या ‘सा रे ग म प’च्या नव्या पर्वात प्रेक्षकांना पारंपरिक गायन स्पर्धेपलीकडचा एक भव्य संगीत अनुभव मिळणार आहे. नेत्रदीपक 360 अंशांचा मंच, 100 हून अधिक संगीतकार आणि विशाल कोरस समूहाच्या सहभागामुळे हा कार्यक्रम दूरचित्रवाणीवरील एका भव्य लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव देणार आहे. त्याचबरोबर भारतीय संगीत परंपरेचे वैभव, विविधता आणि समृद्ध सांगीतिक वारसा नव्या पर्वातून प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर सादर केला जाणार आहे.

सुमारे तीन दशकांपासून ‘सा रे ग म प’ हा कार्यक्रम गायन क्षेत्रातील नवोदित प्रतिभेचा शोध घेणारे, त्यांना घडवणारे आणि त्यांच्या कलेचा गौरव करणारे विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमाची लोकप्रियता टिकून राहण्यामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे बदलत्या काळानुसार आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडींनुसार स्वरूपात बदल झाले तरी अस्सल संगीत आणि खऱ्या गायक प्रतिभेला त्यांनी दिलेले सातत्यपूर्ण प्राधान्य हे आहे. याच समृद्ध वारशाला पुढे नेत झी टीव्ही आता संगीताला पूर्णपणे समर्पित असे एक स्वतंत्र विश्व उभारत आहे. येथे ध्वनी, संगीतकौशल्य, सादरीकरण आणि दृश्यरचना अशा प्रत्येक घटकाची सांगड घालून संगीतकलेचा भव्य उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यंदाच्या पर्वात देशातील विविध भागांतील समृद्ध संगीत परंपरांचा सुरेल संगम पाहायला मिळणार आहे. मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणांद्वारे भारतीय संगीताची विविधता, समृद्धता आणि सांस्कृतिक वारसा अधिक प्रभावीपणे उलगडला जाणार आहे, तर त्याचवेळी कार्यक्रमाच्या मूळ आत्म्याशीही प्रामाणिक राहण्यात येणार आहे. या अनुभवाला आणखी भव्यता देण्यासाठी विशेष 360 अंशांचा आकर्षक सेट उभारण्यात आला आहे. भारतीय संगीत रिअॅलिटी शोच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा सेट साकारण्यात आला असून त्याच्या माध्यमातून ‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ हे अनोखे संगीतविश्व प्रेक्षकांसमोर जिवंत होणार आहे.

या पर्वात संगीतविश्वातील चार दिग्गज गुरु – शंकर महादेवन, कुमार सानू, नीति मोहन आणि जावेद अली यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे. विविध संगीतप्रकारांतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ स्पर्धकांना मिळणार असून ते केवळ सादरीकरणांचे परीक्षण करणार नाहीत, तर संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि दृष्टीकोनाचा खजिना स्पर्धकांसोबत वाटून त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता श्रेयस तळपदे करणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे या भव्य संगीतसोहळ्याला आणखी रंगत प्राप्त होणार आहे.

‘सा रे ग म प 2026’चा प्रीमियर होत आहे 19 सप्टेंबर 2026 रोजी; दर शनिवार आणि रविवार रात्री 9:30 वाजता फक्त झी टीव्ही आणि हिंदी झी5 वर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading