पुणे: शिक्षक दिनाच्या निमित्ताने टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने ३० शिक्षकांचा सत्कार केला. हे शिक्षक डोअरस्टेप स्कूल फाउंडेशन, झेप फाउंडेशन, कामायनी स्कूल आणि खिंवसरा पाटील स्कूल या शाळांमधील असून शिक्षण क्षेत्र आणि एकंदरीत समाजाच्या कल्याणाप्रती निष्ठा अढळ ठेवून सक्रिय राहिल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वंचित समुदाय, महिला आणि मुले यांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर विशेष लक्ष केंद्रित करत, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तनाला चालना देत, टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने #shelterforall ही चळवळ सुरु केली आहे. भटक्या विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणारे, प्रसिद्ध समाजसेवक, पद्मश्री गिरीश प्रभुणे, बांधकाम मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कार्यरत असलेल्या डोअरस्टेप स्कूलच्या संस्थापिका व अध्यक्ष प्रोफेसर रजनी परांजपे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. गिरीश प्रभुणे यांनी सांगितले, “महान राष्ट्राच्या निर्मितीचा पाया शिक्षक रचत असतात. प्राचीन काळातील ऋषींपासून ते आधुनिक काळातील दृष्ट्या शिक्षणतज्ञांपर्यंत, भारतातील गुरुशिष्य परंपरेने आजवर अनेक यशस्वी व्यक्ती घडवल्या आहेत. ज्ञान ही देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे आणि ज्ञान प्रदान करण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आपले शिक्षक पार पाडत असतात. टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने या शिक्षकांचा सन्मान केला ही खूप कौतुकास्पद बाब आहे, त्यामुळे या शिक्षकांना देशाच्या भविष्याचे पोषण करण्यासाठी प्रेरणा मिळत राहील. शिक्षणाचा हा वारसा असाच पुढे चालवत राहू या आणि समृद्ध ज्ञान परंपरेचे पालन करत राहू या.” टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टरअनूप कुमार त्रिवेदी यांनी सांगितले, “शाळेपासून आयआयटीपर्यंतच्या माझ्या प्रवासाला ज्यांनी दिशा दिली, त्या माझ्या सर्व शिक्षकांचा मी कायम ऋणी राहीन. शिक्षक विचारांना चालना देतात, ज्यातून महान गोष्टींची निर्मिती होते. शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत, त्यांचा प्रभाव हा वर्गापुरता मर्यदित नसतो. युवा विचारांचे पोषण करण्याप्रती शिक्षकांची अढळ निष्ठा समाजावर सखोल प्रभाव निर्माण करते. उत्कृष्टता, करुणा आणि नेतृत्व या मूल्यांचे प्रतीक असलेल्या या शिक्षकांचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.” ज्या शाळांमधील शिक्षकांना सन्मानित केले गेले ते समाजासाठी, विशेषतः शिक्षण व समुदाय विकासाच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत आहेत. डोअरस्टेप स्कूल फाउंडेशनची स्थापना १९८९ साली करण्यात आली, “स्कूल ऑन व्हील्स“च्या माध्यमातून ही शाळा अतिशय उपेक्षित समाजातील मुलांना निरक्षर राहण्यापासून वाचवते. त्यांच्या बसेसमध्ये स्थलांतरितांच्या तात्पुरत्या वस्त्यांमधील तीन ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोबाईल वर्ग चालवले जातात. कामायनी स्कूलची सुरुवात १९६४ साली करण्यात आली, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देणारी ही संस्था बालमार्गदर्शनापासून प्रौढांसाठी डे केयर सुविधा देखील पुरवते. या व्यक्तींना समाजात सन्मानाने सामावून घेतले जावे हा त्यांचा उद्देश आहे. झेप फाउंडेशन शिकण्यात अक्षम असलेल्या मुलांना एकाच ठिकाणी शिक्षण व उपचार पुरवते. टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने या शाळांना सक्रिय साहाय्य प्रदान केले आहे. प्रत्येक शिक्षकाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या जमशेदपूर प्लान्ट परिसरात त्यांच्या नावाने झाडे लावण्यात आली आहेत. त्यांच्या कार्याचा वारसा सदैव पुढे चालवला जावा हा यामागचा उद्देश आहे. अधिक उज्वल भवितव्य निर्माण केले जावे यासाठी टाटा ब्ल्यूस्कोप स्टील वचनबद्ध आहे आणि या शिक्षकांचा सन्मान करून कंपनीने समाजामध्ये शिक्षण, सक्षमीकरण आणि शाश्वतता यांना प्रोत्साहन देण्याप्रती कंपनीची बांधिलकी अधोरेखित केली आहे. सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी, समुदायांच्या प्रगतीसाठी आणि समग्र समाजाच्या कल्याणामध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने #shelterforall हा उपक्रम सुरु केला आहे. करुणा हे या उपक्रमाचे मूलभूत मूल्य असून पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन व्यवसायात चांगली कामगिरी बजावण्याबरोबरीनेच सत्कृत्य करणे महत्त्वाचे आहे यावर या उपक्रमामध्ये भर देण्यात आला आहे.
Like this:
Like Loading...
Read More