‘वी’ने भारतामध्ये पोस्टपेड अनुभवाची नवी व्याख्या रचली; ग्राहकांना दिले ‘चॉईस’चे सामर्थ्य
· वी मॅक्स पोस्टपेड प्लॅन्समध्ये युजर्सना मनोरंजन, खानपान, प्रवास आणि मोबाईल सुरक्षा यामधून त्यांना हवे असलेले लाभ निवडता येणार आपल्या युजर्सच्या गरजा, आवडीनिवडी समजून घेऊन त्यानुसार तयार करण्यात आलेले विशेष लाभ प्रस्तुत करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतर्गत वी या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने ‘चॉईस‘ या अतिशय अनोख्या आणि या उद्योगक्षेत्रात प्रथमच सादर केल्या जात असलेल्या उपक्रमाची घोषणा केली. यामध्ये वी च्या पोस्टपेड युजर्सना मनोरंजन, खानपान, प्रवास आणि मोबाईलची सुरक्षा यामधून आपल्याला हवे असलेले एक्सक्लुसिव्ह लाइफस्टाइल लाभ निवडता येतील. आपल्या पोस्टपेड ग्राहकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने इतका आगळावेगळा प्रस्ताव सादर करणारी आणि त्यामार्फत युजर्सना त्यांना हवे असलेले लाभ निवडण्याची संधी देऊन पोस्टपेड लाभांचा उपयोग सर्वांना घेता येईल हे पाहणारी वी ही पहिलीच टेलिकॉम कंपनी आहे. या नव्या प्रस्तावानुसार, वी चे व्यक्तिगत व फॅमिली पोस्टपेड युजर्स चार विशेष विभागांमधून त्यांना हव्या असलेल्या प्रीमियम पार्टनरकडून लाभ मिळवू शकतील. · मनोरंजन – ओटीटी: ऍमेझॉन प्राईम, डिस्ने+हॉटस्टार, सोनीलिव आणि सनएनएक्सटी · खानपान – इझीडायनरची सहा महिन्यांची सबस्क्रिप्शन; ज्यामध्ये प्रीमियम रेस्टोरंट व बारमध्ये ५०% पर्यंत सूट मिळते. · प्रवास – ईझमायट्रिपची १ वर्षाची सबस्क्रिप्शन; दर महिन्याला राऊंड ट्रिप बुकिंगवर ७५० रुपयांची सूट किंवा वन–वे फ्लाईट तिकिटांवर ४०० रुपयांची सूट · प्रगत सुरक्षा आणि हँडसेटच्या सुविधाजनक अनुभवासाठी स्मार्टफोनची सुरक्षा – एका मोबाईल डिव्हाईससाठी नॉर्टन अँटी–व्हायरस प्रोटेक्शनची १ वर्षाची सबस्क्रिप्शन युजर/ग्राहक जे पालन निवडतील त्यावर या ऑफर अवलंबून असतील. वीचे सीएमओ अवनीश खोसला यांनी सांगितले,”नावीन्य आणि ग्राहककेंद्री धोरणाप्रती आमच्या बांधिलकीमध्ये वी मॅक्स हे खूप महत्त्वाचे पाऊल आहे.’चॉईस‘ हा प्रवर्तक उपक्रम सादर करून आम्ही पोस्टपेड प्लॅनमधून किती लाभ मिळू शकतात याची नवी संकल्पना रचत आहोत. युजर्सनी त्यांचा मोबाईल अनुभव हा त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजांनुसार स्वतः निवडावा याचे स्वातंत्र्य देऊन ग्राहकांना सक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे. वी मॅक्स हे फक्त कनेक्टिव्हिटीबद्दल नाही तर जास्तीत जास्त चांगला अनुभव आणि किमतीचे जास्तीत जास्त मूल्य मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी वैशिष्ट्ये निश्चित करण्यासाठी आमच्या ग्राहकांना सक्षम बनवावे यासाठी ते डिझाईन करण्यात आले आहे. सर्वाधिक प्राधान्य दिल्या जाणाऱ्या ओटीटी सबस्क्रिप्शन्स, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि जीवनशैलीशी निगडित लाभ यांचा समावेश करून आम्ही अशी सर्वसमावेशक सुविधा देत आहोत जी आजच्या काळातील युजर्सच्या डिजिटल लाइफस्टाइलला अनुरूप आहे. आमच्या ग्राहकांना मूल्य, शक्ती व सुविधा प्रदान करून या डिजिटल युगात पुढे जाण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे पुन्हा एकदा वी मॅक्समधून दिसून आले आहे.” इतकेच नव्हे तर, वी युजर्सना वी गेम्स, वी म्युझिक, वी जॉब्स अँड एज्युकेशन, वी मुव्हीज अँड टीव्ही यासारख्या इतर विशेष लाभांचा देखील आनंद घेता येईल. त्याशिवाय सेट युअर ओन क्रेडिट लिमिट आणि प्रायॉरीटी कस्टमर सर्व्हिस यासारखे अनोखे लाभ देखील मिळतील.
Read More