Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे  वडील रविंद्र पाटील यांचे आज सायंकाळी निधन झाले आहे. नुकतेच  त्यांना धुळ्यातील रुग्णालयातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठीही हलवले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून सध्या त्यांच्यावर धुळे शहरातील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रसारमाध्यमांत हे वृत्त  प्रसिद्ध होताच गौतमी पाटीलने याची दखल घेत आपल्या मावशीला या गोष्टीची कल्पना दिली. तसेच मावशीला सांगितले की, वडिलांची तब्येत कशी आहे याची तू विचारणा कर. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी माझ्याकडे पुण्याला घेऊन ये. असे सांगितल्यानंतर तिच्या मावशीने लागलीच धुळे गाठले. या ठिकाणी त्यांच्या मावशी आणि धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेल्या. यासंदर्भात स्वत: गौतमीने माहिती दिली होती.

दरम्यान, वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन. पुढील उपचार त्यांचे मी पुण्यालाच करीन, अशी ग्वाही गौतमी पाटील ने दिली होती.

Leave a Reply