एअर इंडिया एक्स्प्रेसने आपल्या ब्रँड सादरीकरणाच्या धावपळीत पुढे जाण्याचा मार्ग आखून आपला दृष्टीकोन आणि वेगळेपणा सादर केला
नवी दिल्ली : एअर इंडिया एक्स्प्रेसने आज सध्या एअरएशिया इंडिया म्हणून कार्यरत असलेल्या एआयएक्स कनेक्ट सोबत विलीनीकरण आणि एकत्रीकरणासह स्थापन होणाऱ्या संस्थेसाठीच्या दृष्टीकोनाचे सादरीकरण केले. विहान.एआय या एअर इंडिया समूहाच्या चालू असलेल्या ५ वर्षांच्या परिवर्तन प्रवासाचा भाग म्हणून आधीच साध्य केलेले महत्त्वाचे टप्पे गाठून विमान कंपनी पुढचा मार्ग आखत आहे.
‘राष्ट्रीय संस्थेचे राष्ट्रीय प्रेरणेत रूपांतर‘ करण्याच्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सामायिक ब्रँड उद्देशावर आधारित दूरदृष्टी आणि वेगळेपणा निर्माण करतात. एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एआयएक्स कनेक्ट चे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंग यांनी टाऊन हॉलमध्ये दोन्ही विमानकंपन्यांच्या कर्मचार्यांना ‘नवीन शक्यतांना प्रेरणा देणे आणि अतुलनीय आपुलकीसह अर्थपूर्ण संबंध निर्माण करणे’ या विमानकंपनीच्या दृष्टीकोनाची मांडणी केली. एकत्रीकरण, वाढ आणि परिवर्तन या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत सध्या विमानकंपनीचे सुरू असलेले काम आणि विकासाच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा स्पष्ट केल्या.
दूरदृष्टी, वेगळेपणा आणि पुढील वाटचालीबद्दल बोलताना, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एआयएक्स कनेक्टचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंग म्हणाले, “आमच्या दृढ दृष्टीमध्ये भारतीयांच्या स्नेहभावासह अर्थपूर्ण संबंध निर्माण करणे, अद्वितीय अनुभव देणे आणि सर्वोत्तम मूल्य प्रदान करणे यात आमचा मुख्य वेगळेपणा सामावलेला आहे. आमची महत्त्वाकांक्षा देशांतर्गत भारतीय बाजारपेठेत तसेच कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आमच्या प्रचंड ताफ्यावर आणि नेटवर्कच्या विस्तारावर स्वार होईल. दोन संस्थांचे विलीनीकरण आणि एअर इंडियासह नेटवर्क एकत्रीकरण यांसह समन्वय साधणे; वाढ आणि विस्तार, अर्थपूर्ण पद्धतीने बाजारपेठेतील स्थान तसेच माफक किंमत आणि सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता प्राप्त करून, आत्मविश्वासपूर्ण नवीन भारतासाठी एक प्राधान्यकृत ब्रँड बनणे ही आमची आकांक्षा आहे.”
एअर इंडिया एक्सप्रेसच्या ब्रँड लॉन्चपर्यंतच्या प्रवासात विमानकंपनीचे व्यवसाय मॉडेल आणि ब्रँड आश्वासनाचे तपशील दिले असून पुढील काही महिन्यांत त्यांचे अनावरण केले जाण्याची अपेक्षा आहे:
अर्थपूर्ण संबंध : भारतातील चैतन्य आणि विविधतेला मूर्त रूप देण्यासाठी, प्रत्येक प्रवास एक आनंददायक आणि संस्मरणीय प्रवास अनुभव बनवण्यासाठी सीमा पार करून लोक, समुदाय आणि संस्कृती यांना एकमेकांच्या जवळ आणत ‘अर्थपूर्ण संबंध’ जोपासायचे.
अनोखे अनुभव: प्रवास विनाअडथळा आणि वैयक्तिकृत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून, अतुलनीय भारतीय आपुलकीसह एकमेवाद्वितीय अनुभव निर्माण आणि वितरित करणे. वेगवेगळ्या प्रदेशातील खासियत असलेल्या विभिन्न पाककृती आणि आरोग्यदायी गरमागरम जेवण देण्यासाठी विमानकंपनीचा पुरस्कार-विजेता इन-फ्लाइट डायनिंग ब्रँड गोरमायर सारख्या सेवांसह उत्पादन योजना आणि सेवा अनुभव भारतीय आदरातिथ्याला अनुरूप मूर्त रूप देईल.
सर्वोत्तम मूल्य: सर्वोत्तमतेच्या मूल्याचा पाठपुरावा खर्च आणि व्यवसाय मॉडेलच्या मूलभूत गोष्टींच्या पलीकडे जातो. प्रत्येक अतिथी आणि प्रवासासाठी त्यांची प्राधान्ये आणि विचारधारा यावर आधारित सातत्य राखून आणि विश्वसनीय कामकाज कार्यक्षमता यांसह त्यांना अनुरूप आणि सुसंगत सेवा प्रदान करते.
या आकांक्षा साध्य करण्यासाठी विशिष्ट प्रकल्प लक्षात घेतले गेले आहेत. त्यात आदरातिथ्य अनुभव उंचावणे, बाजारपेठीय वर्चस्वासाठी नेटवर्क इष्टतम करणे, डिजिटल-प्रथम दृष्टिकोनासह कामकाज सुव्यवस्थित करणे, नाविन्यपूर्ण आणि विजयी संस्कृतीसह प्रतिभा वाढवणे आणि सर्व भागधारकांसाठी शाश्वत पद्धतीं, पारदर्शक निर्णयक्षमता आणि विवेकपूर्ण शासन याद्वारे मूल्य निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, एआयएक्स कनेक्ट आणि एअर इंडिया एक्सप्रेसने युनिफाइड वेबसाइट, airindiaexpress.com सादर केली. त्यामुळे वापरकर्त्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही क्षेत्रातील एअरलाइन्सकडून सेवा नोंदणी आणि व्यवस्थापन सामाईक सोशल मीडिया हँडल (एअरइंडियाक्स) आणि सपोर्ट चॅनेल आणि एकात्मिक प्रवासी सेवा प्रणाली घेता येते. दोन्ही एअरलाइन्सनी इतर सहायक अॅड-ऑन सेवा आणि उप-ब्रँड्सचाही समन्वय साधला आहे. त्यात गॉरमेयर इन-फ्लाइट डायनिंग, एक्सप्रेस प्राइम सीट्स आणि एक्सप्रेस अहेड प्राधान्य सेवा यांचा समावेश आहे. विमानकंपनीने एअर इंडिया सोबत नवीन ग्रेड, नुकसान भरपाई आणि फायदे यांचा ताळमेळ नुकतीच जाहीर केला आहे. त्यामुळे एअर इंडिया समुहामध्ये एकसंध संरचना सक्षम करणे आणि करिअरचे मार्ग सुव्यवस्थित करणे शक्य झाले आहे.
Pingback: एअर इंडिया एक्स्प्रेसने आपल्या ब्रँड सादरीकरणाच्या धावपळीत पुढे जाण्याचा मार्ग आखून आपला दृष्