fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsPUNE

स्वारगेट आगारात एसटी चित्ररथाचे उद्धघाटन संपन्न

पुणे  – एसटी चित्ररथ बस चे उद्धघाटन पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रा. प. स्वारगेट आगार येथे करण्यात आले. या वेळी पुणे विभागाचे विभाग नियत्रक कैलास पाटील हे उपस्थित होते. सदर चित्ररथ अवलिया प्रवासी रोहित धेंडे आणि त्याच्या संघाने साकारला असून सदर चित्ररथ एसटीच्या पुणे विभाग मधील १३ आगारात जाणार असून सदर चित्ररथात एसटीच्या स्थापनेपासून ते आजतागायत ताफ्यात असणारी सर्व प्रकारच्या बसेस यांची माहिती दिली आहे. तसेच एसटी चे सामाजिक कार्यात असणारे योगदान आणि एसटी चा महत्वाचा घटक असलेले प्रवाशांना असणाऱ्या सोयी सुविधा यांची माहिती दिली आहे.या वेळी पुणे विभागाचे वाहतूक आधिकारी सचिन शिंदे साहेब, विभागीय वाहतूक अधिक्षक  गोविंद जाधव साहेब, कामगार आधिकारी  सचिन भुजबळ साहेब,लेखा आधिकारी गायधनी मॅडम,स्वारगेट आगार व्यवस्थापक भुषण सूर्यवंशी साहेब व इतर पर्यवेक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते, 

Leave a Reply

%d bloggers like this: