fbpx
Saturday, September 30, 2023
BusinessLatest News

या गणेश चतुर्थीला तुमच्या स्वप्नातल्या कारमधून बाप्पांना घरी घेऊन या, कार्स24 सह 

पुणे – भारतातील आघाडीची ऑटोटेक कंपनी कार्स24ला या सणासुदीच्या काळासाठी खास ऑफर्स जाहीर करताना आनंद होत आहे. या ऑफर्स पुणेकरांचा यंदाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करतील. या आकर्षक डील्स जबरदस्त अनुभव देतील आणि त्याचबरोबर आमच्या मौल्यवान ग्राहकांची १.२१ लाख रुपयांपर्यंतची बचत करतील.

सर्व कुटुंब एकत्र येऊन गणेश चतुर्थी साजरी करत असताना स्वप्नातील कार प्रत्यक्षात खरेदी करून बाप्पांना आपल्या कारमधून घरी नेण्याची संधी मिळेल. विश्वासार्ह आणि असामान्य सेवेसाठी प्रसिद्ध असलेली कार्स24 पुणेकरांना कार खरेदीसाठी व अविस्मरणीय आठवणी तयार करण्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. सणांच्या निमित्ताने येणारी समृद्धीची भावना कार्स24च्या प्रवासात नाती नव्यानं दृढ करण्यासाठी झटण्याच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे.

ही उत्सवी विक्री कार्स24चे अप आणि संकेतस्थळ अशा दोन्ही ठिकाणी सुरू असून ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहाणार आहे. यावर्षी एकूण १,२१,००० रुपयांची सवलत देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून २०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, संभाव्य कर्जात ३०,००० रुपयांपर्यंतची बचत, सुलभ ईएमआय आणि आकर्षक झिरो डाउन पेमेंट पर्याय कार्स24च्या सर्व प्रकारच्या वाहनांवर दिले जाणार आहेत. ग्राहकांसाठी त्यांची स्वप्नातली कार खरेदी करण्याचा अनुभव सहज आणि आनंदी असावा असे कंपनीचे उद्दिष्ट आहे. लक्षवेधी ऑफर्ससह कार्स24 कार खरेदीदारांना या सणांच्या काळात खात्रीशीर भेटवस्तू देणार असून त्यात नवीन टीव्ही, वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर, आयफोन यांचा समावेश असेल.

ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेली आकर्षक डील्स पुढीलप्रमाणे –

  • मारूतीअर्टिगा – आता केवळ २,००,००० रुपयांपासून पुढे सुरू. अर्टिगा घेऊन जाण्याच्या संधीचा आजच लाभ घ्या. प्रत्येक कुटुंबाला ड्रायव्हिंगचा खरा आनंद देणारी गाडी.
  • होंडा अमेझ– होंडा अमेझचा थरार अनुभवा, नाविन्य आणि कामगिरी यांचा जबरदस्त मिलाफ साधणारी ही गाडी ३,००,००० रुपयांपासून पुढे.
  • टाटा अल्ट्रोझ– टाटा अल्ट्रोझसारखी नाविन्यपूर्ण व उच्च कामगिरी करणारी गाडी खरेदी करा. ही असामान्य गाडी खरेदी करा ६,५०,००० रुपयांपासून.
  • रेनॉ क्विड: ही वैशिष्ट्यपूर्ण व दमदार गाडी खरेदी करा, केवळ ३,००,००० रुपयांपासून पुढे.
  • ह्युंदाई ग्रँड आयटेन:ह्युंदाई ग्रँड आयटेन खरेदी करण्याचा आनंद अनुभवा ३,३०,००० रुपयांपासून पुढे.
  • ह्युंदाई टस्कन न्यू –नाविन्य आणि कामगिरीचा नवा अनुभव घ्या, केवळ १६,९०,००० रुपयांपासून पुढे.
  • जीप कंपास –नाविन्य आणि कामगिरीचा अनोखा मेळ घालणाऱ्या जीप कंपासची खरेदी करण्याचा थरार अनुभवा, ११,००,००० रुपयांपासून पुढे.

 

‘पुणे शहर गणेशोत्सवासाठी सज्ज होत असताना, कार खरेदी करण्याची उत्सुकता शीगेला पोहोचली आहे. पुण्यातील ग्राहकांसाठी या आकर्षक ऑफर्स जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. सणासुदीच्या या काळानिमित्त ग्राहकांचे आभार मानण्यासाठी आम्ही या ऑफर्स तयार केल्या असून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’ असे कार्स24चे सह- संस्थापक गजेंद्र जांगिद म्हणाले.

कार्स24 मधून युज्ड कार खरेदी करण्याचा अनुभव व्यावहारिक आणि किफायतशीर असून तो सुलभ, पारदर्शक असेल व उत्पादनाची काटेकोर तपासणी करण्यात आलेली असेल यावर कंपनीचा कटाक्ष असतो. कार्स24 सारख्या विश्वासार्ह कंपनीची निवड करून ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील कारमध्ये योग्य गुंतवणूक करता येईल.

कार खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा अनुभव आणखी दर्जेदार व्हावा यासाठी कार्स24 द्वारे विविध प्रकारच्या मूल्यवर्धित सेवा दिल्या जातात. त्यात रोडसाइड असिस्टन्स, वॉरंटी, सीएनजी फिटमेंट, आरसी ट्रान्सफर, विमा पुनर्नूतनीकरण यांचा समावेश आहे.

२०१५ मध्ये पुण्यात लाँच झाल्यापासून कार्स24ने आपली असामान्य सेवा, किफायतशीरपणा आणि युज्ड कार बाजारपेठेतील विश्वासार्ग स्थान यासह इथल्या कार खरेदीदारांचं मन जिंकलं आहे. महाराष्ट्रातील १८ शहरांत कार्यरत असलेल्या कार्स24 ला आपल्या ग्राहकांचा मोठा पाठिंबा लाभला असून त्यावरून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याची कंपनीची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: