Sunday, June 14, 2026
BusinessLatest News

येस बँकेचा जसपेसह हायपरयुपीआय ही युपीआयवर आधारित प्लग इन सेवा लाँच करण्यासाठी करार

मुंबई – येस बँकेने आज जसपे या पेमेंट कंपनीशी भागिदारी केल्याचे जाहीर केले. एनपीसीआयची हायपरयुपीआय ही प्लग-इन सेवा लाँच करण्यासाठी झालेल्या या भागिदारीमुळे मर्चंट अ‍ॅप्ससाठीची इन- अ‍ॅप युपीआय पेमेंट्स सेवा जास्त बळकट होईल. येस बँकेची सेवा वापरणाऱ्या व्यापारीवर्गाला आता त्यांच्या ग्राहकांना अँड्रॉइड आणि आयओएसवर आधारित स्मार्टफोन्स वापरून सुलभ आणि केवळ एका क्लिकने युपीआय वापरण्याचा अनुभव देता येईल. या सेवेमुळे ग्राहकांना युपीआयवर आधारित बाह्य अ‍ॅपची गरज भासणार नाही. ग्राहकांना मर्चंट अ‍ॅपमध्येच युपीआयवर आधारित व्यवहार करता येतील. हा प्लग-इन सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट किट (एसडीके) देशातील अतिशय विश्वासार्ह आणि काही ग्राहक व मर्चंट अ‍ॅप्सवरील युपीआय पेमेंट्ससाठी योगदान देणाऱ्या युपीआय-ऑन-क्लाऊड स्टॅक्सवर तयार करण्यात आला आहे. 

बहुतेक वेळेस युपीआय पेमेंट्समध्ये काही क्लिक्सची गरज असते व व्यवहार पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ लागतो. यामुळे ग्राहक ती प्रक्रिया अर्धवट सोडण्याची जास्त शक्यता असते. युपीआय प्लग- इन एसडीकेमुळे केवळ एकाच क्लिकमध्ये व्यवहार पूर्ण होत असल्याने पेमेंट करणे सोपे होते. या प्रक्रियेत व्यवहाराचा वेग तसेच यश ९० टक्क्यांपेक्षा जास्त असते.

याप्रसंदी येस बँकेचे प्रमुख डिजिटल अधिकारी  नवीन चौलवदी म्हणाले, जसपेसह भागिदारी करून बाजारपेठेत प्लग- इन एसडीके आणताना आनंद होत आहे. हे युपीआय व डिजिटल पेमेंट क्षेत्रातील आमच्या एकत्रित कौशल्याचे प्रतीक आहे. व्यापाऱ्यांना प्रत्येक वेळेस यशस्वीपणे पेमेंट्स मिळवून देण्याचे आणि या क्षेत्रातील सर्वात दर्जेदार युपीआय स्टॅक्सपैकी एक बनण्याचे आमचे ध्येय आहे. ही सेवा व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

भारतीय ग्राहक आणि व्यवसाय डिजिटल पेमेंट्ससाठी युपीआयला पसंती देण्याचे प्रमाण वेगाने वाढत असतानाच येस बँकेच्या सहकार्याने हायपरयुपीआय सुविधा उपलब्ध करताना आम्हाला आनंद होत आहे, असे जसपेचे  शीतल ललवाणी म्हणाले. कंपनी या नात्याने पेमेंटमधील अडथळे काढून टाकत दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. हायपरयुपीआयच्या मदतीने आम्ही व्यवसायांना सक्षम करण्याचे व युपीआय त्यांच्या अ‍ॅपमध्ये सहजपणे समाविष्ट करण्याचे ध्येय ठेवले आहे. यातून ग्राहकांना दर्जेदार पेमेंट सुविधा पुरवण्याचेही आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.

हायपरयुपीआय ही बाजारपेठेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण सेवा आहे, कारण त्यामध्ये आधुनिक सेवांसाठी लागणारी अनुकूलता उदा. मँडेट्स (वारंवार केली जाणारी पेमेंट्स), थर्ड पार्टी व्हॅलिडेशन (टीव्हीपी) आहे. त्याशिवाय यामध्ये व्यापाऱ्यांना नो- कोड प्लॅटफॉर्म दिला आहे, जो त्यांच्या अ‍ॅपची संकल्पना व ब्रँडिंगमध्ये पूर्णपणे मिसळून जाईल असा कस्टमाइज्ड युजर इंटरफेज तयार करून देतो. हायपरयुपीआय व्यापाऱ्यांच्या रिअ‍ॅक्ट- नेटिव्ह, फ्लटर, कॉर्डोवा अशा विविध टेक्नीकल फ्रेमवर्क्स असलेल्या अ‍ॅपमध्ये सहजपणे समाविष्ट करता येतो.

येस बँकेने प्लग- इन एसडीके पायाभूत सुविधांचा वापर करून येस पे नेक्स्ट हे बँकेचे पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर (पीएसपी) अ‍ॅप लाँच करण्याचे ठरवले आहे. हे अ‍ॅप युजर्सना पर्सन-टु-पर्सन पेमेंट्स आणि पुल पेमेंट्ससारख्या युपीआय सेवा सहजपणे वापरणे शक्य करेल.

जसपे सुरुवातीपासून भारताच्या युपीआय प्रवासाचा भाग आहे. युपीआय पीएसपी ऑन क्लाऊड बनवणारी ती पहिली तंत्रज्ञान कंपनी होती, ज्यामध्ये ९९.९९ टक्क्यांचा अपटाइम आणि ५००० चा सर्वोच्च टीपीएस नोंदवण्यात आला. जसपेमध्ये रोज ५० दशलक्ष व्यवहार होतात व त्याचा वार्षिक टीपीव्ही ५०० अब्ज डॉलर्स आहे. येस बँक आणि जसपे यांच्यात झालेल्या नाविन्यपूर्ण भागिदारीमुळे ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना मोबाइल अ‍ॅपमध्येच सुरक्षित, सुलभ आणि वेगवान युपीआय पेमेट्स सेवा वापरता येणार आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading