बिझनेस प्रोफेशनल्स् क्लब, युनायटेड इलेव्हन, ट्रोजन्स् क्रिकेट क्लब संघांची विजयी घौडदौड !!
अमित गणपुले याच्या खेळीच्या जोरावर बिझनेस प्रोफेशनल क्लबने एचआरकॅपिटा सोल्युशन क्लबचा ४ गडी राखून पराभव करत पाचवा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एचआरकॅपिटा सोल्युशन क्लबने ११२ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये अभिमन्यु ढमढेरे याने ६४ धावांची खेळी केली. हे आव्हान बिझनेस प्रोफेशनल क्लबने १७.३ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. अमित गणपुले याने नाबाद ६३ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
भावेश पाटील याच्या ९३ धावांच्या खेळीमुळे युनायटेड इलेव्हनने जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबचा १५० धावांनी एकतर्फी विजय मिळवला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबः १८.३ षटकात १० गडी बाद ७९ धावा (देवेन भारतीय १६, आकाश पुरोहीत २-१५, गुरू पदूकोन २-१५) पराभूत वि. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबः ८.२ षटकात १ गडी बाद ८४ धावा (हिरेश टांक नाबाद ४४, यश तौसाळकर नाबाद ३१); सामनावीरः यश तौसाळकर;
एचआरकॅपिटा सोल्युशन क्लबः १९ षटकात ८ गडी बाद ११२ धावा (अभिमन्यु ढमढेरे ६४ (४३, ४ चौकार, ४ षटकार), मल्हार पारगांवकर २१, गिरीष ओक ३-९, अमित गणपुले २-२६) पराभूत वि. बिझनेस प्रोफेशनल क्लबः १७.३ षटकात ६ गडी बाद ११८ धावा (अमित गणपुले नाबाद ६३ (३८, ५ चौकार, ३ षटकार), अभिषेक खंबाटे २३, स्नेहलकुमार कासार ३-१९, मल्हार पारगांवकर २-३१); सामनावीरः अमित गणपुले;
युनायटेड इलेव्हनः १६ षटकात ४ गडी बाद २४१ धावा (भावेश पाटील ९३ (४०, ६ चौकार, ८ षटकार), हुसेन तांबोळी ६३ (३४, ७ चौकार, २ षटकार), हर्षल शिंदे नाबाद २४, गणेश बाभुळगांवकर २-४३) वि.वि. जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबः १६ षटकात ७ गडी बाद ९१ धावा (अक्षय शिंदे २६, योगेश कराचीवाला १६, प्रविण खुटवड ४-२३); सामनावीरः भावेश पाटील.