कामगारांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालसमोर तीव्र निदर्शने
पुणे : ट्रेंड इंडिया टेक्नोलॉजीस कंपनी प्रा. लि. वासुली फाटा, चाकण येथिल खोटे आरोप लावुन बडतर्फ केलेल्या कामगारांना कामावर त्वरित रूजु करून घ्यावे व त्यांना न्याय देणेबाबत तसेच रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर जाहीर आंदोलन करन्याचा इशारा रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरेशभाई देखने यांनी दिला आहे .आज कामगारांच्या विविध मागण्यांसाठी त्जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
तसेच कामगारांना न्याय न देऊ शकत असल्या कारणाने तसेच कामगारांबाबत कोणतेही अधिकार कामगार आयुक्तांना नसल्याने कंपन्यांच्या बाजुने भुमिका घेणारे कामगार आयुक्त कार्यालय पुणे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. ट्रेंड टेक्नॉलॉजिज इंडीया प्रा. लि. चाकण कंपनीतील कामगारांवर खोटे आरोप लावुन बडतर्फ केलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे तसेच मा. सरकारी कामगार अधिकारी साो. सौ. स. रा. धोत्रे मॅडम यांच्या कामगारांच्या बाबत उदासिनते बाबत व कामगारांशी अरेरावीची भाषा करून अर्वाच्य भाषेत कामगारांना हिन वागणुक देवुन कामगारांवर सातत्याने दबाव टाकणा-या अधिकारी सौ. स. रा. धोत्रे यांचेवर निलंबनाची कारवाई क्षरवीयांनी कामगारांचे मानसिक, शारिरीक व आर्थिक छळ केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करने व २००६ ची दप्तर दिरंगाई कायद्याची अमंल बजावणी कराण्यात यावी पुणे जिल्हयातील साईडपट्टीसह खड्डे मुक्त रस्त्याचे काम करण्यात यावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकरी यांना देण्यात आले .या आंदिलनाचे नेतृत्त्व रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष हरेश देखणे यांनी केले .