Monday, August 31, 2026

Day: August 23, 2023

BusinessLatest News

एयर इंडियाची अ‍ॅक्सेसरेलशी भागिदारी, युरोपमधील १००+ शहरांत इंटरमोडाल प्रवास सेवा पुरवणार

गुरुग्राम – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्य आंतरराष्ट्रीय विमानसेवा कंपनीने अ‍ॅक्सेसरेलसह इंटरमोडाल इंटरलाइन करार केला असून त्याअंतर्गत कंपनीच्या प्रवाशांना युरोपमध्ये लहान

Read More
Latest NewsPUNE

हिंगण्यातील नाला चोरीला गेला!

पुणे- तळजाई पचगाव पर्वती वन विभाग मधून उगमस्थान असलेला हिंगणे खुर्द सर्वे क्रं ५ मधील नाला पुढे वाहत हिंगण्यातून मुठा

Read More
Latest NewsPUNE

हातावरील शस्त्रक्रियेसाठी पुण्यात सह्याद्रि हॉस्पिटल्स’मध्ये प्रगत विभाग सुरू

पुणे : हात, मनगट, कोपर व ख्यांद्याच्या दुखापतींवर विशेष उपचारांसाठी पुण्यातील ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’ने ‘प्रगत हँड सर्जरी विभाग’ सुरू केला आहे. हातासंबंधी कोणत्याही आजाराने वा दुखापतीने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर एकात्मिक स्वरुपात विशेष तज्ज्ञांकडून उपचार करून त्यांना दिलासा देणे, हा हे केंद्र सुरू करण्यामागील सह्याद्रि हॉस्पिटल्सचा उद्देश आहे. इमेजिंग व सर्जिकलसंबंधित प्रगत तंत्रांचा वापर या केंद्रामध्ये करण्यात येईल. त्यामुळे अचूक निदान, काटेकोर उपचार, कमीतकमी चीरफाड आणि योग्य तो परिणाम या गोष्टी साध्य होऊ शकतील. या केंद्रामध्ये आपत्कालीन उपचार, सांधे पुनर्बांधणी, लहान सांध्यांची आर्थ्रोस्कोपी, हाडांचे प्रत्यारोपण, टेंडन व लिगामेंट यांची पुनर्रचना, जन्मजात दोष निवारणासाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, सतत हालचालींमुळे उद्भवणाऱ्या दुखापतींवर उपचार, मज्जातंतूंची दुरुस्ती आणि इतर अत्याधुनिक तंत्र असे अनेक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील. या विभागामध्ये शरीराच्या वरच्या अवयवांच्या पुनर्वसनात मदत करण्यासाठी ‘ऑक्युपेशनल थेरपिस्ट’ आणि ‘फिजिकल थेरपिस्ट’ यांच्याद्वारे रुग्णांना विशेष हँड थेरपीदेखील देण्यात येईल. हँड थेरपीमध्ये हाताच्या इजा रोखणे, हाताच्या हालचाली सुरळीत करणे आणि दैनंदिन जीवनात हातांची कार्यक्षमता वाढवणे यांवर भर देण्यात येतो. पुनर्वसनाच्या सेवांमध्ये शस्त्रक्रियेनंतरची काळजी, वेदनांचे व्यवस्थापन, संवेदना जागृत करणे, व्यायाम, कृत्रिम आधार आणि इतर काही उपचार समाविष्ट असणार आहेत. हॅंड सर्जरी विभागाच्या उद्घाटनप्रसंगी सह्याद्रि हॉस्पिटल्स’च्या प्रगत हात शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख व वरिष्ठ तज्ञ डॉ. अभिजीत वाहेगावकर म्हणाले, “सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये प्रगत हात शस्त्रक्रिया विभाग सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या पथकात पाच अत्यंत कुशल व उच्च-प्रशिक्षित असे हँड सर्जन सहभागी आहेत. आमच्या सर्व रूग्णांना सर्वांगीण व उत्तम दर्जाचे उपचार देण्यास ते समर्थ आहेत. मानवी हात किती महत्त्वाचे असतात, हे शब्दांत सांगता येत नाही. अशा या अतिमहत्त्वाच्या अंगाची विशेष काळजी घेण्यासाठी व रुग्णांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी आमचा विभाग समर्पित आहे. नावीन्यता, बहु-अनुशासनात्मक सहयोग आणि दयाळू बुद्धीने रुग्ण केंद्रित काळजी यांवर आमचा भर आहे. उपचार आणि पुनर्वसन यांचा हा प्रवास सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत.” सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे मुख्य कार्यान्वयन अधिकारी डॉ. सुनील राव या प्रसंगी म्हणाले, “प्रगत हँड सर्जरी विभाग सुरू करून आम्ही आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या सीमांपलिकडे नेण्यास सह्याद्रि हॉस्पिटल्स कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्वसमावेशक दृष्टीकोन यांबरोबरच रुग्णांच्या कल्याणासाठी असलेले आमचे अतूट समर्पण या बाबींमधून, हातांवरील शस्त्रक्रियेची मानके पुन्हा परिभाषित होतील. आपल्या समाजाला सुलभ पद्धतीची, उत्तरदायित्व सांभाळणारी आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरवण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत असाच हा आमचा नवीन विभाग सुरू करण्याचा उपक्रम आहे.” ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे हे प्रगत हात शस्त्रक्रिया केंद्र डेक्कन जिमखाना, नगर रस्ता आणि हडपसर येथील शाखांमध्ये कार्यरत असेल. विशिष्ट परिस्थिती असलेल्या रुग्णांसाठी मदत गटांची सत्रे, जनजागृतीच्या योजना व रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी सहयोगी स्वरुपाचे प्रयत्न अशा स्वरुपाची कामेही या विभागातर्फे करण्यात येतील. ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चा ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन अॅडव्हान्स्ड हँड सर्जरी’ हा नवीन विभाग सहकार्य, कौशल्य, करुणा, विश्वास आणि सुलभ आरोग्यसेवा यांद्वारे रुग्णांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे. या हँड सर्जरी विभागामध्ये शल्यचिकित्सक, पुनर्वसन तज्ज्ञ आणि बहु-अनुशासनात्मक तज्ज्ञ यांचा चमू सतत तत्पर असणार आहे. सातत्यपूर्ण प्रगती, तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आणि इष्टतम उपचार करण्यासाठी विस्तार या पद्धतीने भविष्यात काम करण्याचे संस्थेचे नियोजन आहे. ‘इंटरनॅशनल रिस्ट सेंटर्स’ (आयडब्ल्यूसी) आणि ‘एशिया पॅसिफिक रिस्ट असोसिएशन’चे ‘रिस्ट आर्थ्रोस्कोपी’साठीचे मान्यताप्राप्त सेंटर ऑफ एक्सलन्स या संस्थांनी नियुक्त केलेले ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे सेंटर फॉर एक्सलन्स इन अॅडव्हान्स्ड हँड सर्जरी’ हे एकमेव केंद्र आहे. हात आणि मनगटाच्या शस्त्रक्रियेमध्ये विशेषज्ञ बनू इच्छिणाऱ्या देशातील व परदेशातील डॉक्टरांना या केंद्रातून फेलोशिप प्रशिक्षण देण्यात येईल. प्रगत हँड सर्जरी विभागाचा शुभारंभ करून ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’ने आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या सीमा पार करण्यासाठी आणि समाजाला उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठीची बांधिलकी दर्शविली आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच हातांचे आरोग्य, आजारांस प्रतिबंध व विशेष उपचार घेण्याची संस्कृती वाढवण्यासाठी रुग्णालयातर्फे सर्व भागधारकांना आमंत्रित करण्यात येत आहे. हात शस्त्रक्रिया दिनानिमित्त आणि प्रगत हात शस्त्रक्रिया विभागाच्या शुभारंभाच्या निमित्ताने, सह्याद्रि हॉस्पिटलने ‘सेव्ह द वर्किंग हॅंड’ आणि ‘हॅंड इन हॅंड – सेव्ह द ग्रोईंग हॅंड’ या दोन मोहिमा सुरू केल्या आहेत. ‘सेव्ह द वर्किंग हॅंड’ (काम करणारा हात वाचवा) या उपक्रमात कामाच्या ठिकाणी सुरक्षितता व प्रौढांच्या हाताच्या दुखापती आणि ब्रॅचियल प्लेक्ससच्या दुखापतींसाठी सर्वसमावेशक उपचार यांवर भर देण्यात येईल. या मोहिमेद्वारे जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देणे आणि हाताला झालेल्या दुखापतीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत करणे हे सह्याद्री हॉस्पिटलचे उद्दिष्ट आहे. ‘हँड इन हँड-सेव्ह द ग्रोइंग हँड’ (हातात हात – वाचवा वाढता हात) या उपक्रमात लहान मुलांच्या हातात असणारे दोष, विसंगती यांची दखल घेण्यात येईल, तसेच ऑब्स्टेट्रिक ब्रॅचियल प्लेक्सस पाल्सी यांवरही लक्ष केंद्रित करण्यात येईल. आंतरविद्याशाखीय प्रयत्नांच्या माध्यमातून शिक्षण आणि संरचित संदर्भ प्रणालींद्वारे या परिस्थितींचे व्यवस्थापन करण्याचे आणि रुग्णांवरील परिणाम सुधारण्याचे सह्याद्री हॉस्पिटल्सचे उद्दिष्ट आहे.

Read More
Latest NewsPUNE

ऐतिहासिक चांद्रयान लँडिंग नंतर पुणेकरांचा आनंदोत्सव

पुणे : चांद्रयानाचे विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले. या ऐतिहासिक घटनेचा आनंदोत्सव पुणेकरांनी साजरा केला. यावेळी चांद्रयान ३ ची रांगोळी

Read More
Latest NewsPUNE

चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष

पुणे-२३: भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल जंगली महाराज रस्त्यावर फटाके फोडत मिठाई वाटप

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘पुणे-नाशिक रेल्वेमार्ग’ हा मेट्रो कायद्यानुसार करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 23 :- पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा ‘पुणे-नाशिक रेल्वेमार्ग’ पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना

मुंबई : भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे, या

Read More
Latest NewsPUNE

चांद्रयान३ चे यशस्वी लँडींग झाले ही बाब प्रत्येक भारतीयास अभिमानास्पद काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

– अंतराळ संशोधन संस्थेची’ ऊभारणी करणाऱ्या नेतृत्वाची नोंद घेणे, नैसर्गिक न्यायाचे..!पुणे –  स्वातंत्र्योत्तर भारताचे पहीले पंतप्रधान पं नेहरू यांनी ‘इंग्लंडस्थित

Read More
Latest NewsPUNE

Chandrayaan 3 यशस्वीपणे लँड झाल्यामुळे काँग्रेस तर्फे साखर वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

पुणे : इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेली मेहनत व उत्तम कामगिरीमुळे आज भारत देशाने आपला चंद्रयान तीन उपग्रह यशस्वीपणे चंद्रावर उतरवले आहे.आज

Read More
BusinessLatest News

सिंबायोसिस व क्रेडाई महाराष्ट्र तर्फे बांधकाम क्षेत्रात प्रथमच प्रमाणित अभ्यासक्रम सुरू होणार

पुणे :- “बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुण पिढीने केवळ पारंपारिक व्यवसाय पद्धतीत अडकून न राहता कालसुसंगत ज्ञान प्राप्त करावे व व्यावसायिक

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘चांद्रयान-3’च्या चंद्रावरील यशस्वी स्वारीबद्दल इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, देशवासीयांचे अभिनंदन -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- ‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

सर्व प्रकारच्या वाहनांसाठी २५ ऑगस्टपासून वरंधा घाट खुला

पुणे : स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना तसेच उप विभागीय अधिकारी भोर यांचा अहवाल विचारात घेऊन भोर-महाड या मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील

Read More
Latest NewsPUNE

जेआरव्हीजीटीआय आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड यांच्या वतीने चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वी उतरल्याबद्दल ढोल ताशाच्या गजरात जल्लोष

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे जेआरव्हीजीटीआय आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड यांच्या वतीने चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वी उतरल्याबद्दल

Read More
Latest NewsPUNE

डॉ. सुनीता तांदुळवाडकर बनल्या एफओजीएसआयच्या पुण्यातील पहिल्या महिला अध्यक्षा!

पुणे : पुणे आणि देशाच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. सुनीता तांदुळवाडकर, रुबी हॉल क्लिनिकच्या आयव्हीएफ आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख

Read More
Latest NewsNATIONALTOP NEWS

भारताच चंद्रावर यशस्वीरीत्या पाऊल; Chandrayaan 3 ने पाठवला पहिला संदेश

पुणे : भारताचे चांद्रयान 3 (Chandrayaan 3) यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले. अन् बंगळुरुमधील इस्त्रोच्या कार्यालयापासून संपूर्ण भारतात एकाच जल्लोष झाला. भारतीय

Read More
Latest NewsPUNE

दि विश्वेश्वर सहकारी बँकेचा सभासदांना १० टक्के लाभांश

पुणे  : दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे ची ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गोल्डन लिफ लॉन्स, डीपी रोड, एरंडवणे,

Read More
Latest NewsPUNE

गीत रामायणाच्या अखंड स्वरयज्ञात रसिकांना भक्तिरसाची अनुभूती

पुणे : आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर रचित आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीत रामायणाच्या स्वरयज्ञाची पुणेकर रसिकांनी

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

यंदाचा ‘फकिरा पुरस्कार’ अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना जाहीर

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या

Read More
Latest NewsPUNE

स्टेशनरी कटलरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन जोशी

पुणे : स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनच्या अध्यक्षपदी सचिन जोशी यांची निवड करण्यात आली. गंगाधाम चौकातील महा टेÑड मार्केट

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तलाठी भरती परीक्षेबाबत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई :- राज्य शासनाच्या तलाठी भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली

Read More