चांद्रयान३ चे यशस्वी लँडींग झाले ही बाब प्रत्येक भारतीयास अभिमानास्पद काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
– अंतराळ संशोधन संस्थेची’ ऊभारणी करणाऱ्या नेतृत्वाची नोंद घेणे, नैसर्गिक न्यायाचे..!
पुणे – स्वातंत्र्योत्तर भारताचे पहीले पंतप्रधान पं नेहरू यांनी ‘इंग्लंडस्थित डॅा विक्रम साराभाई, सतिश धवन या भारतीय शास्त्रज्ञांना’ फेब्रुवारी १९६२ मध्ये भारतात जाणीव पुर्वक आणले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे व पं नेहरुंच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाने व प्रेरणेने ‘भारताच्या वैज्ञानिक प्रगती’ करीता डॅा विक्रम साराभाई यांनी ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ ईस्त्रो’ची ऑगस्ट १९६९ मध्ये स्थापना केली. ईस्त्रो च्या माध्यमातुन ‘मंगळ व चंद्रावर’ यान पाठवण्याची मोहीम यशस्वी ठरली ही इस्त्रोची ही यशस्वी गाथा’ असुन “भारतीय वैज्ञानिक व शास्त्रज्ञांचे” मनपुर्वक अभिनंदन करत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, १९७२ – १९८४ दरम्यान, सतीश धवन यांनी इस्रोला (भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस) निर्णायक आकार देण्यासाठी विलक्षण वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय नेतृत्व प्रदान केले. त्यांनी भारतास ब्रह्म प्रकाश आणि अणु आणि अंतराळ कार्यक्रमांमध्ये योगदान दिले. धवननंतर, यू आर राव यांच्यासह अध्यक्षांची मालिका आली ज्यांनी इस्रोमध्ये स्वतःचे विशेष योगदान दिले.
इस्रोच्या कर्तृत्वाला नेहमीच स्वावलंबनाचा आधार असतो. या यशामध्ये शास्त्रज्ञांचे अभूतपूर्व सांघिक कार्य व चिकाटी स्पष्ट होते. चांद्रयान१ चे चंद्रावरील प्रस्थापीकरण युपीए१ तत्कालीन पंतप्रधान डॅा मनमोहनसिंग यांचे कारकिर्दीत २००८ मध्ये यशस्वी झाले. त्यावेळीच् चंद्रावर गुकुत्वाकर्षण नसल्याने पृथ्वीवरील १०० कि चे वजन चंद्रावर सु ५-१० कि. असल्याचे समजले व तेथे बर्फाळ भुसभुशीत जमीन व उणे -१००’ डीग्री तपमान असल्याचे ही या यानाच्या माध्यमातुनच कळाले.
(चांद्रयान२ हे २०२१ साली लँड होण्यात अपयशी ठरले होते) मात्र आज चांद्रयान३ चे यशस्वी लँडींग झाले ही बाब प्रत्येक भारतीयास अभिमानास्पद आहे..!
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो)ची ऊभारणी व मुहूर्तमेढ करणाऱ्या स्वातंत्र्योत्तर भारताचे पहीले पंतप्रधान पंडीत नेहरू, शास्त्रज्ञ व संस्थेचे संस्थापक डॅा विक्रम साराभाई, सतिश धवन आदींचे मनस्वी अभिनंदन करणे, त्यांच्या कृतीशील दुरदृष्टीच्या पायाभरणीची नोंद घेणे ही क्रमपाप्त व नैसर्गिक न्यायाचे ठरेल असे ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ने दिलेल्या प्रसिध्दी पत्रात म्हंटले आहे..!
