Chandrayaan 3 यशस्वीपणे लँड झाल्यामुळे काँग्रेस तर्फे साखर वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा
पुणे : इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेली मेहनत व उत्तम कामगिरीमुळे आज भारत देशाने आपला चंद्रयान तीन उपग्रह यशस्वीपणे चंद्रावर उतरवले आहे.
आज काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी टिळक रोड येथील चौकामध्ये पुणेकरांना यानाची प्रतिकृती तयार करून , वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे
हातात तिरंगा झेंडा घेत यानाची प्रतिकृती घेत साखर वाटप कार्यकर्ते आनंदाने रस्त्यावरील येणार जाणाऱ्या लोकांना साखर वाटत होते यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा दिल्या गेल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की साऱ्या देशाला अभिमान वाटेल असे कार्य भारतीय शास्त्रज्ञांनी केले आहे आतापर्यंतच्या कार्यात वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे चंद्रयान तीन उपग्रह यशस्वी लँडिंग मुळे भारताच्या अंतराळ संशोधनाला वेगळी दिशा व बळ मिळाली आहे शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर ही भारताचा बहुमान वाढला आहे आर्यभट्ट चंद्रयान तीन च्या यशस्वी लँडिंग मुळे भारत जगातला पाचवा शक्ति देश बनला आहे
आमदार रवींद्र धंगेकर यावेळी म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी इस्त्रोची स्थापना केली आणि भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी अफाट मेहनत करून 19 एप्रिल 1975 रोजी आर्यगड उपग्रहाचा यशस्वी लँडिंग चंद्रावर झाले
शास्त्रज्ञांचा मी मनापासून अभिनंदन करतो
यावेळी रमेश अय्यर नुरुद्दीन स्वामी सोमजी प्रथमेश आबनावे स्वाती शिदे प्राची दुधाने शानी नौशाद चेतन अग्रवाल सुरेश कांबळे शाबीर खान आयुब पठाण अविनाश अडसूळ राजू नाणेकर बबलू कोळी डॉक्टर गिरीजा शिंदे वैशाली मेहंदळे शाकीब आबाजी गोरख पळसकर राहुल सुपेकर तिलेश मोटा महेंद्र चव्हाण अश्फाक शेख उमेश काची मात्र किरण म्हात्रे नरेंद्र चव्हाण दिपक रेणुसे अनिल धिमधमे भरत सुराणा उपस्थित होते
