Monday, August 31, 2026
Latest NewsSports

शि वॉरीयर्स इलेव्हन संघाला विजेतेपद !!



पुणे, ३० ऑगस्टः इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘इकोल रिक्रीएशन एक्सलन्स्‌ करंडक‌’ १९ वर्षाखालील महिला आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मधुरा एस. हिने केलेली अचूक गोलंदाजी आणि आराध्या बोटवे हिच्या अर्धशतकी खेळीमुळे शि वॉरीयर्स इलेव्हनने रॉयल स्ट्रायकर्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

वाघोली येथील राजगड स्पोर्ट्‌स क्लब क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा खेळणाऱ्या रॉयल स्ट्रायकर्स संघाचा डाव हवातसा बहरला गेला नाही. सलामीच्या खेळाडू अनुष्का वाकोडे (१३ धावा) आणि लावण्या देशवंडीकर (१३ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. त्यानंतर कोणताही बॅटर खेळपट्टीवर टिकून धावा जमवू शकला नाही. याचे श्रेय शि वॉरीयर्सच्या गोलंदाजीला जाते. मधुरा एस. आणि स्वराली इंगळे या दोघींनीही अचूक गोलंदाजी करून प्रत्येकी तीन गडी बाद केले आणि रॉयल संघाचा डाव ९१ धावांवर गुंडाळला. हे लक्ष्य शि वॉरीयर्स इलेव्हनने १७.३ षटकात व २ गडी गमावून सहज पूर्ण केले. आराध्या बोटवे हिने ५० चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५२ धावांची खेळी करून संघाचे विजेतेपद निश्चित केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशनचे संचालक शुभेंद्र भांडारकर, दर्शन जिंदाल, अन्शुल शर्मा आणि सायन सेनगुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे संचालक शशांक जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि आभार मानले. विजेत्या शि वॉरीयर्स इलेव्हन संघाला करंडक आणि मेडल्स्‌ देण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान सानिका लोकरे हिला मिळाला.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः
रॉयल स्ट्रायकर्सः २५ षटकात १० गडी बाद ९१ धावा (अनुष्का वाकोडे १३, लावण्या देशवंडीकर १३, मधुरा एस. ३-७, स्वराली इंगळे ३-११) पराभूत वि. शि वॉरीयर्स इलेव्हनः १७.३ षटकात २ गडी बाद ९४ धावा (आराध्या बोटवे नाबाद ५२ (५०, ६ चौकार, १ षटकार), पायल चव्हाण १-९; सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः मधुरा एस.;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading