Wednesday, May 6, 2026

Day: August 19, 2023

Latest NewsPUNE

डॉ. दाभोलकरांना स्मृतीदिनाच्या पूर्वसंधेला अभिवादन

पुणे : ‘आवाज दो – हम एक है, लढेंगे जितेंगे’, ‘दहा वर्षे खुनाची -कार्यरत विवेकी असंतोषाची’, ‘फुले शाहू आंबेडकर –

Read More
Latest NewsPUNE

महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या (मास्मा) अध्यक्षपदी शशिकांत वाकडे यांची नियुक्ती

पुणे: महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन(मास्मा)ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात पार पडली. यावेळी महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशिकांत वाकडे

Read More
Latest NewsPUNE

आज सर्वत्र मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळा बंद होत असताना  डॉ कलमाडी श्यामराव कन्नड माध्यमिक शाळेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणे अभिमानास्पद

साणेहळ्ळीच्या श्री तरळबाळू जगद्गुरू शाखा मठाचे पट्टाध्यक्षरू श्री पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी यांचे प्रतिपादन पुणे : आज सर्वत्र मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळा

Read More
BusinessLatest News

फोक्सवॅगन इंडियाकडून ६००,००० कार्सच्या निर्यातीचा टप्पा पूर्ण

पुणे : स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल)ने चाकण, पुणे येथील उत्पादन सुविधेत उत्पादित केलेल्या ६००,००० गाड्यांच्या निर्यातीचा एक महत्त्वाचा टप्पा

Read More
BusinessLatest News

एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री, आयएफएससी शाखा आणि एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) तर्फे गिफ्ट सिटी – आयएफएससी मधून नवीन जागतिक प्रस्तावांची घोषणा

भारतातील अग्रगण्य विमा कंपन्यांपैकी एक एचडीएफसी लाइफने त्यांची आंतरराष्ट्रीय उपकंपनी एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री ची परदेशी शाखा आता एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल या ब्रँड नावाखाली गिफ्ट सिटी- आयएफएससी, इंडिया मधून अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) यूएस डॉलर मूल्यांकित जीवन आणि आरोग्य विमा उपाय सुविधा सादर करेल अशी घोषणा केली आहे. एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल एनआरआय आणि जागतिक भारतीय डायस्पोरा (देशांतरीत जनसमूह) यांना सीमांनी मर्यादित नसलेल्या जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांसह विमा उपाय सुविधा सेवा सादर करेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही उत्पादने अमेरिकन डॉलरसारख्या परकीय चलनाचा वापर करून खरेदी करता येऊ शकणार आहेत. एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनलने सादर केलेल्या सुविधांच्या संपूर्ण श्रेणीमध्ये बचत, आरोग्य आणि सेवानिवृत्तीशी संबंधित व्यक्तीच्या आर्थिक गरजा पूर्ण करणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे. पहिले उत्पादन – “यूएस डॉलर ग्लोबल एज्युकेशन प्लॅन”, आता नावनोंदणीसाठी खुले आहे आणि पालकांना त्यांच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी भविष्यातील खर्च पूर्ण करण्यासाठी अमेरिकन डॉलर मूल्यांकित निधी तयार करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. गुंतवणुकीचे चलन आणि खर्चाचे चलन यांच्यातील भविष्यातील विसंगती दूर करणे हे या उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री कंपनी जानेवारी २०१६ पासून कार्यरत असून ही एचडीएफसी लाइफची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही कंपनी संयुक्त अरब अमिराती येथे दुबई मध्ये दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर (“DIFC”) येथे स्थित आहे आणि दुबई वित्तीय सेवा प्राधिकरण (“DFSA”) द्वारे नियंत्रित केली जाते. गिफ्ट सिटी- आयएफएससी मधील परदेशी शाखेला गिफ्ट सिटी-आयएफएससी मधील युनिफाइड रेग्युलेटर, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटी (“IFSCA”) कडून आवश्यक मंजूरी आणि नोंदणीचे अनुदान मिळाले आहे. जागतिक भारतीय आणि अनिवासी भारतीयांच्या विमा गरजा काळजीपूर्वक तपासल्यानंतर खास अशा विशिष्ट ग्राहकांसाठी आणि नाविन्यपूर्ण परकीय चलन मूल्यांकित जीवन आणि आरोग्य विमा उत्पादने आणि उपाय तयार केले गेले आहेत. ही उत्पादने “एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल” ब्रँड खाली www.hdfclife-international.com या नव्याने सुरू झालेल्या वेबसाइटद्वारे उपलब्ध करून दिली जातील. दिशादर्शन करण्यास सोप्या आणि माहितीपूर्ण वेबसाइटवर पहिल्या उत्पादनाची झलक, व्यस्त पालकांसाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची योजना आखण्यासाठी मार्गदर्शक, सर्वसमावेशक शैक्षणिक कॅल्क्युलेटर, प्री-पॅक योजना, आगामी उत्पादन विभाग, अखंड सेवा पर्याय आणि नवीन योजनांसाठी जागा आरक्षित करण्याची तरतूद आहे. इतरांसह. पालकांना अर्थपूर्ण रीतीने दीर्घकालीन नियोजनास पाठबळ देणे हा यामागचा उद्देश आहे. उत्पादने नावनोंदणीसाठी ऑनलाइन उपलब्ध असतील आणि ग्राहकांना कॉलवर आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या सहाय्याने सुरळीत सेवा अनुभवाचा लाभ घेता येईल. गिफ्ट सिटी मधून हे बहु-चलन जीवन आणि आरोग्य विमा उत्पादन आणि उपायसुविधा एचडीएफसी लाइफ द्वारे सादर केलेल्या आयएनआर उत्पादनांच्या विद्यमान संचाला पूरक ठरतील. अशा प्रकारे त्यांच्या सध्याच्या आणि नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध पर्यायांचा विस्तार होईल.     एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) एचडीएफसी एएमसीने त्यांची पूर्ण मालकीची उपकंपनी एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडची आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) येथे स्थापना करण्याची  घोषणा केली होती. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केलेल्या उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी जागतिक स्तरावरील पोहोच विस्तारण्यासाठी आणि नवीन बाजारपेठ खुली करण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल आहे. एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेड ही गिफ्ट सिटी – आयएफएससी कडून गुंतवणूक व्यवस्थापन, गुंतवणूक सल्ला आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा प्रक्रिया करण्यासाठी आयएफएससीए मध्ये “फंड मॅनेजमेंट एंटिटी (रिटेल)” म्हणून नोंदणीकृत आहे. प्रारंभिक उत्पादन रोलआउटचा एक भाग म्हणून एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी)  लिमिटेडने ६ (सहा) फंड सादर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ते विविध एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनांमध्ये भाग घेतील ज्यात इक्विटी (मार्केट कॅपिटलायझेशन अंतर्गत) आणि हायब्रिड धोरणे समाविष्ट होतील. या धोरणांसाठी अंतर्निहित देशांतर्गत योजनांची एकूण सरासरी एयूएम  २० अब्ज अमेरिकन डॉलर (जुलै २०२३ पर्यंत) पेक्षा जास्त आहे. या उत्पादनांची स्थापना जागतिक गुंतवणूकदारांना भारतातील गुंतवणूक सुविधांमध्ये प्रवेश करण्यासाठी एक सोयीस्कर आणि व्यवहार्य मार्ग पुरविते. जागतिक गुंतवणूकदार अशा प्रकारे एचडीएफसी एएमसीच्या दीर्घ आणि प्रतिथयश ट्रॅक रेकॉर्ड, त्यांच्या मोठ्या आणि प्रस्थापित गुंतवणूक संघाच्या क्षमता आणि शिस्तबद्ध प्रक्रिया-प्रणीत गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून लाभ मिळवण्यासाठी सज्ज आहेत. भारतातील गुंतवणुकीचे उपाय पाहणाऱ्या जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांवर प्रारंभिक लक्ष केंद्रित केले जाईल. एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडने आपल्या योजनेचा विस्तार केल्यामुळे ते ऑनशोअर गुंतवणूकदार (एलआरएस/ओपीआय मार्ग अंतर्गत) आणि ऑफशोअर गुंतवणूकदारांना जागतिक धोरणांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पर्याय पुरवतील. ही उत्पादने निवासी गुंतवणूकदारांना त्यांच्या देशांतर्गत गुंतवणुकीला जागतिक वाटपाची जोड देऊन पूरक बनवण्यास मदत करतील. गिफ्ट सिटी हे गेटवे म्हणून उत्तम दर्जाच्या जागतिक व्यवस्थापकांसह निवासी गुंतवणूकदारांना प्रवेश देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेड स्वतंत्रपणे व्यवस्थापित खात्यांद्वारे गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या पात्र जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा देखील पूरवेल. कालांतराने खाजगी मालमत्तेसह पर्यायी धोरणांवर उत्पादन भर घालत उपायसुविधा अधिक सखोल करण्याचा एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडचा  मानस आहे. एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडची भारतातील सुविधांकडे पाहणाऱ्या जागतिक गुंतवणूकदारांसाठी (एनआरआय, भारतीय डायस्पोरा आणि परदेशी) तसेच जागतिक पातळीवरील सुविधांकडे पाहणाऱ्या भारतीय आणि ऑफशोअर गुंतवणूकदार अशा दोन्ही साठी ऑफशोअर दृष्टीकोनातून सर्व गुंतवणूक गरजांच्या समाधानासाठी वन स्टॉप सोल्यूशन बनण्याची आकांक्षा आहे. एचडीएफसी लाइफ आणि एचडीएफसी एएमसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी एचडीएफसी लाइफ आणि एचडीएफसी एएमसीच्या प्रवासातील या मैलाच्या दगडावर भाष्य केले आणि ते म्हणाले, “आम्हाला भारतातील गिफ्ट सिटी मधून आमच्या ग्राहक, गुंतवणूकदार आणि भागधारकांसोबत, आमची आगामी आणि नवीन वाटचाल शेअर करताना आनंद होत आहे. युनिफाइड रेग्युलेटर आयएफएससीए संपूर्ण प्रदेश आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारताला एक मजबूत आणि स्थिर आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यासपीठ म्हणून प्रस्थापित करण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहे. या सहयोगासह, आम्ही भारताच्या विकासगाथेत आणखी योगदान देण्यासाठी आणि एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल द्वारे एनआरआय आणि जागतिक भारतीयांसाठी जागतिक दर्जाचे विदेशी चलनातील विमा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत. जोडीला एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेड द्वारे जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतीय गुंतवणूक उपाय उपलब्ध करून देणे आणि निवासी गुंतवणूकदारांसाठी जागतिक गुंतवणूक उपाय उपलब्ध करून देणे यासाठीही तयार आहोत.” गिफ्ट सिटीमध्ये नव्याने स्थापन झालेल्या एचडीएफसी लाइफ इंटरनॅशनल आणि एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडचे अभिनंदन करून गिफ्ट सिटीचे आयएएस (निवृत्त) व्यवस्थापकीय संचालक आणि ग्रुप सीईओ श्री तपन रे म्हणाले, “एचडीएफसी लाईफ इंटरनॅशनलचे गिफ्ट सिटी मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय विमा कंपनी म्हणून स्थान आणि एचडीएफसी एएमसी ऑफशोअर हब म्हणून एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडची भूमिका म्हणजे  जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक उद्योगांना जागतिक दर्जाच्या व्यावसायिक पायाभूत सुविधांसाठी हब तयार करण्याच्या आमच्या बांधिलकीचे एक उत्कृष्ट प्रमाणीकरण आहे. आम्ही या सहयोगाला  खूप महत्त्व देतो आणि विमा क्षेत्रात भविष्यातील यशासाठी हा उपक्रम एक मापदंड बनवण्याच्या दिशेने एचडीएफसी बँक समूहासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.” आयएफएससीएचे आयएएस, अध्यक्ष श्री के राजारामन म्हणाले, “विविध वित्तीय संस्थांना आकर्षित करत आंतरराष्ट्रीय आर्थिक उपक्रमांचे केंद्र म्हणून आयएफएससीएचा नावलौकिक सतत वाढत आहे.  आयएफएससीए नियामक चौकट पारदर्शकता, स्थिरता आणि नावीन्यपूर्ण वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेली आहे आणि जागतिक आर्थिक समुदायासाठी प्रचंड क्षमता आणि संधी आहेत.” एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या, “एचडीएफसी लाइफ परदेशातील भारतीय समुदायाने भारताच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करते. आम्हाला अभिमान आहे की एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री ही आमची उपकंपनी भारतातील गिफ्ट सिटी आयएफएससी येथील शाखेतून आपली उत्पादने आणि उपाय सुविधांचा विस्तार करत आहे. ही उत्पादने अनिवासी भारतीयांसाठी योग्य असतील आणि उच्च दर्जाचे जीवन आणि आरोग्य विमा उपाय सुविधा देतील. आमच्या वितरण भागीदारांनी गिफ्ट सिटीमध्ये येऊन या योजनांमध्ये आमच्यासोबत भागीदारी करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.”   एचडीएफसी एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत म्हणाले, “एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेडची एचडीएफसी एएमसीसाठी ऑफशोअर हब म्हणून झालेली स्थापना जागतिक गुंतवणूकदारांना आमच्या काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आणि उद्योगातील आघाडीच्या गुंतवणूक क्षमतांपर्यंत पोहोचण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ पुरविण्याच्या आमच्या बांधिलकीला आणखी बळकट करते. जागतिक गुंतवणुक पर्यायांकडे बघणाऱ्या गुंतवणूकदारांना निवड पर्याय उपलब्ध करून देत आपल्या योजनांची व्याप्ती वाढवण्यास यामुळे मदत होईल. एचडीएफसी एएमसी इंटरनॅशनल (आयएफएससी) लिमिटेड जागतिक गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठांशी आणि भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक बाजारपेठांशी जोडणारा पूल म्हणून काम करेल.”

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ३१ ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन

मुंबई : राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी  ६ ते १० या वेळेत

Read More
Latest NewsPUNE

आधुनिक क्रांतीचे जनक राजीवजी गांधीच- मोहन जोशी

पुणे : स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त खुली पुणे जिल्हा टेनिक्वाईट रिंग टेनिस स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड येथे

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : गणेशोत्सव, दहीहंडी तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, त्यादृष्टीने सर्वं संबंधित यंत्रणा आणि मंडळांनी

Read More
Latest NewsPUNE

कार्बन न्यूट्रल भारत या वर्षीच गाठले 2030 चे उद्दिष्ट खासदार प्रकाश जावडेकर

पुणे : ‘कार्बन न्यूट्रल भारताच्या मार्गावरील सन 2030 साठी निश्चित केलेले उद्दिष्ट या वर्षीच पूर्ण करण्यात आपण यश मिळविले असून,

Read More
Latest NewsPUNE

राष्ट्रप्रथम या सूत्राकडे माध्यमविश्वाचे दुर्लक्ष नको शहजाद पूनावाला यांचे प्रतिपादन

पुणे  – समाज माध्यमांच्या प्रभावामुळे माध्यमविश्वाचे लोकशाहीकरण होते आहे. प्रत्येक व्यक्ती माध्यम होत असतानाच्या काळात राष्ट्रप्रथम हे सूत्र नजरेआड होणार

Read More
BusinessLatest NewsPUNE

पुण्यात आसियान ट्रेड (ASEAN Trade ) ची सुरूवात.

पुणे : पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रॅंड येथे इंडियन आसियान  ट्रेड   मीट्स या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद म्यानमारचे राजदूत एच.ई.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ना कबुतर, ना फोन, कुछ भी नहीं आया ! काँग्रेसने ऑफर दिल्याच्या बातम्यांवर प्रकाश आंबेडकर यांचं भाष्य

मुंबई – काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली आहे. अशा अश्याच्या बातम्या काही जणांनी

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘टाटा म्हणजेच ट्रस्ट..विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  : – उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ

Read More
Latest NewsPUNE

माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळतर्फे राज्यव्यापी रक्तदान मोहीम

पुणे : माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ आणि माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ च्या माजी विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली

Read More
Latest NewsPUNE

मूलभूत अधिकारांचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य – न्यायमूर्ती गोखले

पुणे :  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त”अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतून निर्माण झालेले दोन कायदे” या विषयावर आय. एल.एस. विधी महाविद्यालयात

Read More