ना कबुतर, ना फोन, कुछ भी नहीं आया ! काँग्रेसने ऑफर दिल्याच्या बातम्यांवर प्रकाश आंबेडकर यांचं भाष्य
मुंबई – काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली आहे. अशा अश्याच्या बातम्या काही जणांनी दिल्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की,
ना कबुतर, ना फोन, कुछ भी नहीं आया. ही तर काँग्रेसची पेटंट असलेली मोडस ऑपरेंटी आहे. पत्र व्यवहार न करता ते लोकांना सांगत फिरतात. अशी जोरदार टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांनी INDIA आघाडीसोबत यावं, अशी भूमिका काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मांडली आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावं, अशी आपली वैयक्तिक इच्छा असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना अशोक चव्हाण यांच्यामार्फत ऑफर दिली असून ते याबाबत सकारात्मक असल्याची चर्चा रंगवण्यात आली होती. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने ही ट्विट करत ज्या व्यक्तीने ही बातमी दिली, त्याच्या बातमीची खिल्ली उडवली आहे. याआधी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे INDIA युती आणि महाविकास आघाडीसाठी आमचे दार उघड असून आरएसएस – भाजपला हरवण्यासाठी वंचित, बहुजनांना सोबत घेतल्याशिवाय ही लढाई अशक्य असल्याचे म्हटले होते.
अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली. वंचित बहूजन आघाडीलासोबत घेण्यासंदर्भात काँग्रेसची चर्चा सुरू आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर सकारात्मक असल्याचं ट्वीट शशी सिंग नामक व्यक्तीने केलं होतं. जाणीवपूर्वक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून काँग्रेस सकारात्मक असल्याचे चित्र रंगवले जातंय,
कालच वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला विचारण्यात आले होते की, INDIA, आणि महाविकास आघाडीतील वंचित बहुजन आघाडीची इन्ट्री कोण रोखतंय? असा सवाल विचारण्यात आला होता.
ना कबूतर, ना फ़ोन। कुछ नहीं आया।
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 19, 2023
This is the patent modus operandi of the Congress. Without establishing correspondence they go around telling people that it happened. pic.twitter.com/F1wy84sAmP
Yes and our freedom is on a 100-year lease, cow dung can save us in a nuclear attack and Modi works for 26 hours in a day.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) August 19, 2023
Kuch bhi!
Just because you don’t have anything valuable to tweet, don’t use your “political analyst” handle to write fabrications.
No call came. Period. https://t.co/m78IDmtPc1 pic.twitter.com/1q1HOCJjaH
