Sunday, May 10, 2026
Latest NewsSports

‘सिम्बा समर करंडक‌’ १४ वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेचे ११ मेपासून आयोजन !!

पुणे : ट्वेन्टीफोर स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट आणि क्रिकस्टार रायझिंग (सीएसआर) ॲकॅडमी यांच्यावतीने ‘सिम्बा समर करंडक‌’ आंतरक्लब १४ वर्षाखालील गटाच्या २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ११ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत सिंहगड रोडवरील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना ट्वेन्टीफोर स्पोर्ट्‌स मॅनेजमेंट आणि क्रिकस्टार रायझिंग (सीएसआर) ॲकॅडमीचे संचालक उदय म्हात्रे म्हणाले की, १४ वर्षाखालील गटातील मुलांना स्पर्धात्मक सामन्यांचा अनुभव मिळावा यासाठी या २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण १६ क्रिकेट क्लब आणि ॲकॅडमी यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. पिंक चेंडूवर २५ षटकांचे सामने खेळताना युवा खेळाडूंचा खरा कस लागेल आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

यजमान सीएसआर स्पोर्ट्‌स ॲकॅडमी, एके स्पोर्ट्‌स क्रिकेट ॲकॅडमी, स्पेशलाईज्ड क्रिकेट ॲकॅडमी, पराग ठाकूर क्रिकेट ॲकॅडमी, स्ट्रायकर्स क्रिकेट ॲकॅडमी, रॉक २७ क्रिकेट ॲकॅडमी, रन्स्‌ क्रिकेट ॲकॅडमी, क्रिक१८ क्रिकेट ॲकॅडमी, एसएसपी क्रिकेट ॲकॅडमी, ब्रिलीयंट्स क्रिकेट ॲकॅडमी, क्षेत्रम क्रिकेट ॲकॅडमी, एसपी ११ क्रिकेट ॲकॅडमी, पुणे क्रिकेट ॲकॅडमी, एसएआरके क्रिकेट ॲकॅडमी, योगेश इलेव्हन आणि व्हिडीआर क्रिकेट ॲकॅडमी हे १६ संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक आणि ३० हजार रूपये, उपविजेत्या संघाला करंडक आणि १५ हजार रूपये मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात आहेत.

स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना सीएसआर स्पोर्ट्‌स ॲकॅडमी आणि रॉक २७ क्रिकेट ॲकॅडमी यांच्यामध्ये होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading