Tuesday, June 16, 2026

Day: May 17, 2026

Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा पुणे : जगभरातील कोट्यावधी गणेश भक्तांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राचे वैभव असलेल्या

Read More
Latest NewsPUNE

प्रत्येकाला हरवलेला मार्ग दाखवणारी वारी – आयुक्त विजय सूर्यवंशी

पिंपरी : आजच्या युगात प्रत्येक माणूस हरवलेला आहे. “स्व” मधला विठ्ठल शोधण्यासाठी “अंतर्नाद” पहावा. साक्षात विठ्ठल दर्शनाची अनुभूती मिळते. भक्तीरसाने

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न- मुख्यमंत्री

पुणे : पुणे शहराला देशाचे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून ओळख मिळत असून ती पुढे नेण्यासाठी मेट्रोचे जाळे, रस्त्यांची सुधारणा, भूमिगत

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

‘नीट’ परीक्षा पेपर फुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा

  पुणे : ‘नीट’ची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करावी लागली, ही सरकारची नामुष्की आहे. याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

केवळ ‘युद्धजन्य परिस्थिती’मुळे नव्हे, ‘परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याने देशात ‘आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती’..!

  काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची घणाघाती टिका … पुणे  : देशाचे ‘सतत बदलते व अस्थिर परराष्ट्र धोरण’, देशात

Read More
Latest NewsPUNE

प्रतिभेऐवजी सगळीकडे सादरीकरणाचे स्तोम : कौशल इनामदार

पुणे : शब्दांमधून शब्दांपलिकडचे सांगण्याचे कार्य कवी करत असतात. त्यामुळे चांगला गझलकार होण्यासाठी चांगला कवी असणे आवश्यक आहे. प्रतिभावंतांची प्रतिभा

Read More
Latest NewsPUNE

‘आर्ट मॅजिक’मध्ये बालचित्रकार ते हौशी कलाकारांचा कलाविष्कार

  पुणे : निसर्गचित्रांच्या मनोहारी रंगछटा, महादेव, कृष्ण, गणपती यांसारख्या देवी-देवतांची विविध शैलींमधील आकर्षक चित्रे, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची हुबेहूब रेखाटने, चारकोल

Read More
ENTERTAINMENTLatest News

स्टार प्रवाहच्या आनंदी मालिकेत धमाकेदार वळण

स्टार प्रवाहच्या आनंदी मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आनंदी आणि युगंधर यांचं लग्न पार

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना.

सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. पण याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकारांचा सन्मान करण्याची परंपराही या कार्यक्रमाने जपली आहे. येत्या भागात ‘देऊळ बंद २’ चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर उपस्थित राहणार आहे. या विशेष भागात मराठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘सोनी मराठी’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तर्फे मान वंदना देण्यात आली. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील मोहन जोशी आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या प्रभावी भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जेव्हा जेव्हा उद्योगातील ज्येष्ठ कलाकार उपस्थित राहतात, तेव्हा त्यांचा सन्मान करण्याची परंपरा कार्यक्रमाने कायम ठेवली आहे. याच परंपरेचा भाग म्हणून निर्माता-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी ‘सोनी मराठी’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या वतीने मोहन जोशी यांचा विशेष सत्कार केला. यावेळी हास्यजत्रेची संपूर्ण टीम आणि सर्व कलाकार मंचावर उपस्थित होते. सर्व कलाकारांनी मानाचा मुजरा करत मोहन जोशी यांना अभिवादन केले. यावेळी भावना व्यक्त करताना मोहन जोशी म्हणाले, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा एक अल्टिमेट कार्यक्रम आहे. इथले सगळे कलाकार एकापेक्षा एक आहेत. उत्तम कलाकार, उत्तम लेखक आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे देखील तितकेच दिग्गज आहेत. हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आणि या कार्यक्रमाला कधीच पर्याय नाही, हे नक्की.” हास्य, धमाल आणि भावनांनी भरलेला हा विशेष भाग पाहायला विसरू नका — ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, येत्या सोमवार आणि मंगळवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.  

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

सांधे बदलताना कुरकुर होणारच: प्रदीप देशमुख यांचे प्रतिपादन

  पक्षांतर्गत नाराजी अथवा सत्ता स्पर्धेबाबत केला इन्कार पुणे प्रतिनिधी सध्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षांतर्गत नाराजी मुळे

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

पेपरफुटीच्या प्रकरणांचे भिजत घोंगडे हे सरकारचे अपयश : ऍड मिलिंद पवार

  पुणे  : सध्याच्या काळात नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण देशभरात खळबळ माजवणारे ठरले असले तरी देखील सन 2021 पासून

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री – बच्चू कडू

  पंढरपूर  :  रात्री दोन वाजता सर्वसामान्यांच्या समस्येसाठी दार उघडे ठेवणारा एकनाथ शिंदे हा नेता आहे. त्यामुळे तेच जनतेच्या मनातील

Read More
BusinessLatest News

‘टीव्हीएस मोटर कंपनीम’ध्ये रवींद्रन शण्मुगम यांची स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती

बंगळुरू : टीव्हीएस वेणू समूहाचा भाग असलेल्या आणि जागतिक स्तरावर दुचाकी व तिनचाकी वाहन निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘टीव्हीएस मोटर कंपनी’ने (टीव्हीएसएम) रवींद्रन शण्मुगम यांची कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती जाहीर केली आहे. भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून ही नियुक्ती १३ मे २०२६ पासून सलग पाच वर्षांसाठी लागू होणार आहे. रवींद्रन शण्मुगम हे अनुभवी तंत्रज्ञान उद्योजक आणि व्यावसायिक नेते आहेत. ग्राहककेंद्रित व्यवसायांचा विस्तार, डिजिटल परिवर्तन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)

Read More
BusinessLatest News

‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स’तर्फे आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातधोरणात्मक संरक्षण प्रकल्पाची पायाभरणी

पुणे  : ‘भारत फोर्ज लिमिटेड’च्या संरक्षण क्षेत्रातील व्यवसायाशी संबंधित ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ची (केएसएसएल) पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या ‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स लिमिटेड’ने आंध्र प्रदेशात नवा संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या राज्यातील श्री सत्यसाई जिल्ह्यात मदकसिराजवळ या धोरणात्मक प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच करण्यात आली. १,००० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या एकात्मिक प्रकल्पासाठी पुढील २ ते ४ वर्षांत सुमारे १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, उच्च-सुरक्षा चाचणीच्या पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सच्या विशेष क्षमता लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे आधुनिक संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रासाठी महत्त्वाच्या प्रगत एनर्जेटिक्स आणि दारुगोळा प्रणालींमध्ये भारताच्या स्वदेशी क्षमतांना मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ८०० जणांना थेट रोजगार मिळण्याची, तर अंदाजे २,५०० अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळण्यासोबतच एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी आंध्र प्रदेश एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अधिक बळकट होणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या विशेष साहित्याच्या (एनर्जेटिक्स) आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स’ची स्थापना करण्यात आली आहे. स्वदेशी पातळीवर डिझाइन केलेली, विकसित केलेली आणि जागतिक मानकांनुसार तयार केलेली उत्पादने उपलब्ध करून देणे हा या कंपनीचा उद्देश आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेशी सुसंगत असून, आयातीसाठी पर्याय निर्माण करणे, स्थानिक मूल्यनिर्मिती वाढवणे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या साहित्यांमध्ये तांत्रिक स्वावलंबन साध्य करणे यावर त्याचा भर आहे. ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, “प्रगत संरक्षण प्रणाली आणि महत्त्वाच्या साहित्यासाठी जागतिक स्तरावर विश्वासार्ह पुरवठादार म्हणून उदयास येण्याची मोठी संधी भारतासमोर आहे. अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स हा स्वदेशी संरक्षण साहित्य क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने उचललेला महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे भारताची जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी अत्याधुनिक संरक्षण साहित्य विकसित करण्यालाही चालना मिळेल.” संरक्षण उत्पादन, धातुकर्म आणि सिस्टिम्स इंटिग्रेशन क्षेत्रातील कल्याणी समूहाच्या सहा दशकांच्या अनुभवाच्या बळावर अग्न्यास्त्र एनर्जेटिक्स सुरुवातीपासूनच सर्वोत्तम सुरक्षा मानके, अभियांत्रिकी शिस्त आणि औद्योगिक प्रशासन पद्धती अंगीकारणार आहे. भारताच्या संरक्षण उद्योग परिसंस्थेला अधिक बळकटी देणे, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे आणि विकसित भारत २०४७ या दीर्घकालीन उद्दिष्टात योगदान देणे, यामध्ये कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More
BusinessLatest News

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने केली आणखी एका विक्रमी तिमाहीची नोंद

पुणे : इंटर्नल कम्बशन इंजिन, जनरेटर संच आणि कृषी उपकरणांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असलेली, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ठसा उमटविलेल्या ‘किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड‘ (KOEL) (BSE:

Read More
BusinessLatest News

‘गोदरेज’कडून ‘फोर्कलिफ्ट’साठी भारतातील पहिले मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञान सादर

मुंबई: भारतातील मटेरियल हँडलिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’ने (जीईजी) आपल्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट (एमएचई) व्यवसायाअंतर्गत ‘इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’साठी भारतातील पहिले मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञान सादर केले आहे. भारतामध्ये उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग या क्षेत्रांचा वेगाने विस्तार होत असताना अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा उपायांची गरज वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या बॅटरीमुळे मालकीचा एकूण खर्च २५ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास, उपकरणांचा कार्यरत कालावधी वाढण्यास आणि औद्योगिक कामकाज अधिक स्वच्छ व पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे. तसेच ही बॅटरी फोर्कलिफ्टच्या संपूर्ण कार्यकालापर्यंत टिकेल, अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. भारतात औद्योगिक आणि वेअरहाउसिंग यांचा बाजार वेगाने वाढत आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये १.१ कोटी चौरस फुटांहून अधिक जागेचे लीजिंग झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात दुहेरी अंकातील वाढ नोंदवली गेली आहे. थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्री-पीएल), ई-कॉमर्स आणि उत्पादन या क्षेत्रांमुळे पुरवठा साखळीच्या आधुनिकीकरणाला मिळालेली चालना हे यामागचे प्रमुख कारण आहे. गोदामांची संख्या आणि त्यांच्या कामकाजाचा वेग वाढत असताना, ऊर्जा कार्यक्षम, सुरक्षित आणि भविष्यासाठी तयार असलेल्या मटेरियल हँडलिंग उपायांची गरज आता उत्पादकता आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. ‘मल्टी आयन बॅटरी’मध्ये जलद आणि ऑपर्च्युनिटी (कामाच्या मधल्या वेळेत) चार्जिंग, शून्य देखभाल खर्च आणि ऊर्जेची उच्च कार्यक्षमता यांसारख्या सुविधा एकत्रितपणे देण्यात आल्या आहेत. तसेच, यामध्ये दुर्मिळ धातूंवरील अवलंबित्व कमी करण्यात आले असून बॅटरीच्या विल्हेवाटीशी संबंधित अडचणीही कमी होतील, याची काळजी घेण्यात आली आहे. भारतामधील आघाडीच्या ‘डीप-टेक बॅटरी इनोव्हेटर्स’पैकी एका कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान तब्बल ५,००० लाईफ सायकल्स देते. हे प्रमाण सामान्य लिथियम-आयन बॅटरींपेक्षा जवळपास ६० टक्के अधिक आहे. त्यामुळे उपकरणाच्या संपूर्ण कार्यकाळासाठी हीच बॅटरी वापरता येते आणि खर्चही कमी होतो. ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तपमानातही विश्वासार्हरीत्या कार्य करण्यासाठी ही मल्टी आयन बॅटरी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील उष्णकटिबंधीय हवामानासाठी ती विशेष उपयुक्त ठरते. ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट विभागाचे बिझनेस हेड अनिल लिंगायत म्हणाले, “भारतामधील पुरवठा साखळी अधिक व्यापक आणि गुंतागुंतीची होत आहे. अशा वेळी मटेरियल हँडलिंग क्षेत्राला विश्वासार्ह,

Read More
BusinessLatest News

वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसबीआय जनरल इन्शुरन्सतर्फे सर्वसमावेशक आरोग्य विम्याची गरज अधोरेखित

मुंबई : भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सने आपल्या ‘चुनिये भरोसा, अपनों सा’ मोहिमेच्या पुढील भागात पंकज त्रिपाठी

Read More
BusinessLatest News

टीव्हीएस क्रेडिटने कर्जवाटपात 26% आणि निव्वळ नफ्यात (PAT) 19% वाढ नोंदवली

पुणे : भारतातील अग्रगण्य बिगर बँकिंग वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2025च्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2026मध्ये कंपनीने कर्जवितरणात 26% वाढ नोंदवली. टीव्हीएस क्रेडिटने आर्थिक वर्ष 2026 साठी एकूण 7,196 कोटी रुपये उत्पन्न नोंदवले, जे आर्थिक वर्ष 2025 च्या तुलनेत 9% अधिक आहे; तसेच याच वर्षासाठी कंपनीने कर पश्चात

Read More
BusinessLatest News

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सकडून तरुण भारतासाठी अॅक्टिव्ह युवा हा आरोग्य-केंद्रित विमा प्लॅन लाँच

मुंबई: आदित्य बिर्ला कॅपिटलची आरोग्य विमा शाखा असलेल्या ‘आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ने (एबीएचआयसीएल) आज अॅक्टिव्ह युवा लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा आरोग्य-केंद्रित विमा प्लॅन तरुण भारतीयांच्या बदलत्या जीवनशैली आणि आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या ऑफरचा भाग म्हणून एक सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. हा प्रोग्राम एबीएचआयसीएलच्या हेल्थरिटर्न्स™ संकल्पनेवर आधारित एक व्यापक वेलनेस कार्यक्रम आहे, जो पोषण, फिटनेस आणि रिकव्हरी या क्षेत्रांतील दैनंदिन निरोगी सवयींसाठी ग्राहकांना रिवॉर्ड्स देतो. एबीएचआयसीएलने आपल्या हेल्थरिटर्न्स™ मॉडेलद्वारे आरोग्य विम्याची नवी व्याख्या निर्माण केली आहे. यात दररोज १०,००० किंवा त्याहून अधिक पावले चालणे किंवा एकाच व्यायाम सत्रात ३०० कॅलरी कमी करणे यांसारख्या आरोग्यदायी क्रियांद्वारे

Read More