Sunday, May 17, 2026
BusinessLatest News

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सकडून तरुण भारतासाठी अॅक्टिव्ह युवा हा आरोग्य-केंद्रित विमा प्लॅन लाँच

मुंबई: आदित्य बिर्ला कॅपिटलची आरोग्य विमा शाखा असलेल्या ‘आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ने (एबीएचआयसीएल) आज अॅक्टिव्ह युवा लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा आरोग्य-केंद्रित विमा प्लॅन तरुण भारतीयांच्या बदलत्या जीवनशैली आणि आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या ऑफरचा भाग म्हणून एक सर्वसमावेशक वेलनेस प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. हा प्रोग्राम एबीएचआयसीएलच्या हेल्थरिटर्न्स™ संकल्पनेवर आधारित एक व्यापक वेलनेस कार्यक्रम आहे, जो पोषण, फिटनेस आणि रिकव्हरी या क्षेत्रांतील दैनंदिन निरोगी सवयींसाठी ग्राहकांना रिवॉर्ड्स देतो.

एबीएचआयसीएलने आपल्या हेल्थरिटर्न्स™ मॉडेलद्वारे आरोग्य विम्याची नवी व्याख्या निर्माण केली आहे. यात दररोज १०,००० किंवा त्याहून अधिक पावले चालणे किंवा एकाच व्यायाम सत्रात ३०० कॅलरी कमी करणे यांसारख्या आरोग्यदायी क्रियांद्वारे निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जात आहे. सातत्यपूर्ण सक्रियता आणि मजबूत हेल्दी हार्ट स्कोर™ असलेले ग्राहक त्यांच्या वार्षिक प्रीमियमच्या १०० टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम परत मिळवू शकतात.

नवीन अॅक्टिव्ह युवा प्लॅनमध्ये वर्तणुकीशी संबंधित रिवॉर्ड्स प्रोग्रामचा विस्तार करण्यात आला आहे. हा प्रोग्राम ईट, मुव्ह आणि हिल या तीन स्तंभांवर आधारित आहे. जे ग्राहक किमान अॅक्टिव्ह डेझ™ निकष पूर्ण करतात, त्यांना शारीरिक हालचालींव्यतिरिक्त असलेल्या सर्वांगीण आरोग्यदायी सवयींसाठी हा प्लॅन पुरस्कृत करतो.

ü ईट: जे वापरकर्ते एका महिन्यात २१ दिवस दररोज कोणतेही दोन वेळचे  जेवण अॅपवर नोंदवतात, त्यांना त्यांच्या मासिक हेल्थरिटर्न्स™ मध्ये १० टक्‍के वाढ मिळू शकते.

ü मुव्ह: दरमहा सरासरी ७,५०० पेक्षा जास्त पावले चालणारे किंवा २५० कॅलरी कमी करणारे वापरकर्ते दरमहा ४ बोनस अॅक्टिव्ह डेझ™ मिळवू शकतात.

ü हिल: एका महिन्यात २१ दिवस ७-८ तासांची झोप घेणारे वापरकर्ते मासिक हेल्थरिटर्न्स™ मध्ये १५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ मिळवू शकतात.

अॅक्टिव्ह युवाच्या लाँचबाबत मत व्‍यक्त करत असताना आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मयांक बथवाल म्हणाले, “ग्राहकांची बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या सवयींनुसार आरोग्य विम्यामध्येही बदल होणे आवश्यक आहे. आजचे तरुण ग्राहक आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून स्वतःच्या आरोग्यामध्ये सक्रियपणे गुंतवणूक करत आहेत. यामुळे विम्याला त्यांच्या जीवनपद्धतीशी अधिक सुसंगत बनवण्याची एक स्पष्ट संधी निर्माण झाली आहे.

गेल्या दशकात, आम्ही ग्राहकांना फक्त क्लेमच्या वेळीच नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण आरोग्य प्रवासात साथ देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या अनुभवावरून असे दिसून येते की, या श्रेणीतील वृद्धी फक्त क्लेमला प्रतिसाद देण्यापुरती मर्यादित नसून, दोन क्लेममधील

कालावधीतही ग्राहकांसाठी विमा किती उपयुक्त ठरतो, यावर अधिक अवलंबून असेल. अॅक्टिव्ह युवाची रचना याच बदलासाठी करण्यात आली असून, याद्वारे विमा फक्त वैद्यकीय आणीबाणीपुरता मर्यादित न राहता वर्षभर दैनंदिन जीवनाचा एक सक्रिय भाग बनेल.”

आरोग्याबाबत ग्राहकांचा दृष्टिकोन अधिक सक्रिय आणि निरंतर होत असला, तरी विम्याकडे अजूनही एक वेळचे व्‍यवहारापुरते उत्पादन म्हणून पाहिले जाते, ज्याचा दैनंदिन जीवनात फारसा सहभाग नसतो. अॅक्टिव्ह युवा दैनंदिन आरोग्याशी संबंधित सवयींना प्रत्यक्ष फायद्यांशी जोडून या मानसिकतेतील बदलाला प्रतिसाद देतो, ज्यामुळे तरुण ग्राहकांसाठी विमा अधिक सुसंगत, लवचिक आणि आकर्षक बनतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading