Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री – बच्चू कडू

 

पंढरपूर  :  रात्री दोन वाजता सर्वसामान्यांच्या समस्येसाठी दार उघडे ठेवणारा एकनाथ शिंदे हा नेता आहे. त्यामुळे तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री व्हावे यासाठी केवळ देवाला साकडे न घालता जनतेच्या दरबारात जाऊन त्यांचा कौल मागणार आहोत, असे प्रहार जनशक्ती पक्षातून शिवसेनेत दाखल झालेले नेते बच्चू कडू यांनी सांगितले.

बच्चू कडू हे पंढरपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकीकडे आपले पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त करताना त्यांनी शिवसेनेने शेतकऱ्यांबाबत आपले धोरण स्पष्ट करणे आवश्यक असल्याने सांगत आपल्याच पक्षाला घरचा आहेर देखील दिला.

एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्त्यातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांची नाव सर्वसामान्य जनतेची जुळलेली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याची त्यांची सतत तयारी असते. सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी त्यांची दार सतत उघडी असतात. त्यामुळे यापुढे तेच मुख्यमंत्री व्हावे, अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे. आजही सर्वेक्षण केले तरीदेखील मुख्यमंत्री पदासाठी सर्वसामान्य जनता एकनाथ शिंदे यांना कौल देईल, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

सत्ताधारी पक्षात दाखल झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांची जुळलेली नाळ कायम असल्याचे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिले. महाराष्ट्रात विविध भौगोलिक आणि वातावरणीय प्रदेश आहेत. या वैद्याचा विचार करून शिवसेनेने आपले कृषी धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. त्या धोरणानुसार सरकारकडे पाठपुरावा करून सरकारचे कृषी धोरण ठरवणे शक्य होईल, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

सरकार आणि मुख्यमंत्री यांच्या शेतकऱ्यांबद्दल चांगल्या भावना असाव्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांच्याकडून घेतले जावे, अशी प्रार्थना विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आपण केल्याचेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केल

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading